Live Maharashtra Assembly Monsoon Session: संशयित बोट ऑस्ट्रेलियन महिलेची- देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींमध्ये एके ४७ रायफल सापडल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान, यासंदर्भात माहिती बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संशयित बोट ऑस्ट्रेलियन महिलेची असल्याचे म्हटले आहे.
दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं. यावेळी त्यांनी 'उद्धवजींच्या नेतृत्वात अजितदादांचं राज्य अशा शब्दात फडणवीसांनी चोलेबाजी केली.
तुम्ही मंत्री घरी असाल सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही. अस म्हणत सभापती निलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालात याचा मला आनंद झाला. यामागचे कारण हे वेगळंच आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अस झाल आहे की दाढीवाले मुख्यमंत्री झालेत. पण त्याच्यामध्येपण सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव हा इकडेच आहे. पांढऱ्या दाढीचा प्रभाव संपुर्ण हिंदुस्तानावर आहे. असा टोला जिएसटी वरुन छगन भुजबळ यांनी लगावला आहे.
शाळा, अन्नधान्य, आणि रुग्णालयाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आपलं वजन वाढवलं पाहिजेल. उपमुख्यमंत्री त्यांना घेऊन जा . आणि यांना सांगा की यामधील गोष्टींवर थोड काही तरी कमी करा. संपूर्ण देशाच लक्ष तुमच्याकडे लागलं आहे. तुम्ही गंभीरतेने याची दखल घ्या असे भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती केली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान हा राज्यातील सध्याच्या घडीला असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विधानसभेत थोरात यांनी केली.
पालघरमधील जुळ्यांच्या मृत्यूचा मुद्दा अजित पवारांनी मांडला. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरच्या घटनेचा शासन गंभीर विचार करत आहे. असे म्हटले आहे.
पालघरमधील जुळ्यांच्या मृत्यूचा मुद्दा अजित पवारांनी मांडला. पालघरमध्ये अजुनही योग्य आरोग्यसेवा नाही. पालघरमध्ये अजुनही योग्य आरोग्यसेवा नाही. आदिवासी भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दुर्देवाच दुष्टचक्र कधी थांबणार असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. पालघरमध्ये आरोग्यचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यात असे अनेक दुर्गम भाग आहेत ज्यामध्ये अद्यापही आरोग्य सुविधा पोहोचू शकत नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सध्या पालघर जिल्ह्यातील बालकांमधील हत्तीरोगाचा प्रश्न गाजत आहे. याच मुद्द्यावरून आज विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना घेरले. अजित पवार यांनी तानाजी सावंत यांना पालघर जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय जागांबाबत प्रश्न विचारला मात्र सावंत यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे विरोधकांनी त्यांची कोंडी केली. यावर उत्तर देताना हा प्रश्न आपण सोमवारी ठेवू असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.
विरोधक आक्रमक झाले आहेत, राज्य सरकारच्याविरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. विरोधकांच्या या घोषणाबाजीला मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यत्तर दिले आहे. . सध्या विरोधक ज्या घोषणा देत आहेत त्या पोकळ घोषणा आहेत. मला पूर्ण खात्री आहे, सध्या जे लोक तिथे घोषणा देत आहेत, त्यातील अनेक शिंदे यांच्या बाजून आहेत. भविष्यात ते सर्व समोर येईलच. असा मोठा दावा केला आहे. तसेच विरोध करणं हे विरोधकांचं कामच असही सामंत यावेळी म्हणाले.
मुंबई गोवा महामार्ग बारा वर्षे रखडला आहे. तो केव्हा पूर्ण होणार यावर कोकणातील आमदारांनी मंत्री रवीद्र चव्हाण यांना विविध प्रश्न केले. यावेळी भास्कर जाधव बोलत असताना नितेश राणे यांनी अडीच वर्षे वाया गेली असा शेरा मारल्याने जाधव यांनी त्यांना चांगलेच खडसावले. मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा असे भास्कर जाधव म्हणाले.
गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी, चलो गुवाहाटी, अशी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
विरोधकांवर दबाव आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. अशा आरोप जयंच पाटील यांनी यावेळी केला. मात्र, विरोधक दबावाला बळी पडणार नाहीत पूर्वी ज्यांच्यावर आरोप झाले ते आता सत्तेत जाऊन बसले असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्यादिवशीही विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीवरुन विरोधकांनी घोषणाबाजीला सुरूवात केली आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीाल विरोधकांनी जोर धरला आहे.
आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल झाले आहेत.
आमदार नमिता मुंदडा यांची अंबाजोगाईतील अवैध धंद्यांविरोधात कारावाईची मागणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरू, आमदार नमिता मुंदडा यांनी या प्रकरणी पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली, आज लक्षवेधी सूचना माध्यमातून त्यांनी ही मागणी केली.
याप्रकरणी अवैध दारू प्रकरणात पीआय मोरेंना निलंबित करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भाजपचे नेते मोहित कंबोज आणि पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सागर बंगल्यावर वॉशिंग मशीनचं काम असं म्हणत फडणवीसांना चिमटा काढला आहे.
15 सप्टेंबर पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अशी माहिती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, असा आरोप विरोधकांनी केला. विधानभवानाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आजही सरकारविरोधात घोषणाबाजी करत पोस्टरबाजी केली. गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहटी, चलो गुवाहटी, असे पोस्टर विरोधकांनी झळकावले. विधानभवनातील पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन करत घेरण्याचा प्रयत्न केला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares