Dhule News : तरुणाला फ्री फायर गेमचं व्यसन, शिरपूरमधील 20 वर्षांचा तरुण ठरला सायकोसिसचा बळी – ABP Majha

Written by

By: धनंजय दिक्षित, एबीपी माझा | Updated at : 19 Aug 2022 03:47 PM (IST)
Edited By: स्नेहा कदम
Free Fire Game
Dhule News : तरुणाईमध्ये मोबाईल फोनच्या (Mobile Phone) वापराचे प्रमाण वाढले आहे. यात शाळकरी विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा समावेश आहे. मोबाईल फोनमधील गेमच्या व्यसनात हरवत चाललेली तरुणाई विविध आजारांचे बळी ठरत आहे. यातून सायकोसिससारख्या (Psychosis) आजाराचा धोका बळावत आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात राहणारा एक 20 वर्षीय तरुण सध्या मानसिक आजाराने (Mental Illness) ग्रस्त झाला आहे. शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून काल-परवापर्यंत शहरांपुरतं मर्यादित असणारं हे संकट आता ग्रामीण भागात देखील पोहोचलं आहे.
खासगी रुग्णालयात उपचार
कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात शाळा महाविद्यालय बंद असल्याने शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. यामुळे मोबाईलचे व्यसन लागले असून यातून विविध घटना घडल्याचे समोर आलं आहे. तसंच कोरोनाच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षणासाठी देखील हातात दिलेला मोबाईल हा नंतर विविध आजारांचे कारण ठरला आहे. शिरपूर तालुक्यातील एका खेडेगावातील 20 वर्षाचा तरुण फ्री फायर गेमच्या मोहाने मानसिक आजाराचा शिकार झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. या तरुणाचे आई-वडील शेतकरी असून हा तरुण अचानक घरात हाताच्या इशाराने बंदूक चालवण्याचे हावभाव करत होता. हाच प्रकार गावात देखील सुरु होता. या प्रकाराने भयभीत झालेल्या या तरुणाच्या शेतकरी आई-वडिलांनी जवळच्या खाजगी डॉक्टरांना दाखवलं. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात तिथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आजाराचं कारण लक्षात आल्यावर उपजिल्हा रुग्णालयातून धुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात तरुणाला पाठवण्यात आलं. सध्या शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरु आहेत.
तरुण फ्री फायर गेमच्या आहारी
हा तरुण फ्री फायर गेमच्या आहारी गेल्याने आपण बंदूक चालवत असल्याचा त्याला भास होत आहे. समोर असलेला प्रत्येक व्यक्ती हा शत्रू असून त्याला बंदुकीने मारलं पाहिजे म्हणून तो असं कृत्य करत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मोबाईल फोनच्या अतिवापराने झालेली तरुणाची ही अवस्था आई-वडिलांना अस्वस्थ करणारी आहे. काल-परवापर्यंत शहरांपुरता मर्यादित असणारी ही समस्या आता ग्रामीण भागात देखील येऊन पोहोचल्याने यातून आपल्या पाल्यांचे बचाव करण्याचं आव्हान पालकांच्या समोर उभे राहिलं आहे. धुळे जिल्ह्यातील हा वीस वर्षे तरुण सायकोसिस आजाराचा बळी ठरल्याची ही पहिलीच घटना आहे. मोबाईलच्या अतिवापराने निद्रानाश तसंच विविध आजार जडत असतात. यामुळे मुलांच्या मोबाईल फोनच्या वापरावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
Dhule News : मोबाईलच्या अतिवापराने तरुण ठरला सायकोसिसचा बळी, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील घटना
Dhule Rain : धुळ्यातील दोंडाईच्या रेल्वे स्थानकावर पावसाच्या पाण्यात भिजल्या खतांच्या गोण्या, कृषी विभागाचे दुर्लक्ष
Dhule : महापालिकेच्या शाळेत पाणी साचलं, शिक्षण ‘पाण्यात’; विद्यार्थ्यांवर आली आंदोलनाची वेळ
Dhule : अॅक्टिव्हा परत देण्यासाठी 20 हजारांची लाच मागितली; पोलीस हवालदाराला रंगेहात अटक
Maharashtra Rains : राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, पुढील तीन दिवस पावसाचा इशारा
CBI Raids: मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयची छापेमारी; तब्बल 14 तास झाडाझडती
Dahihandi 2022 : मुंबईच्या दहीहंडीवर आता भाजपचं कंट्रोल? दहीहंडीच्या आडून ‘मिशन महापालिका
Todays Headline 20th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Indurikar Maharaj : कीर्तनाची तारीख अन् वेळ ठरली, पण इंदुरीकर महाराज आलेच नाहीत; फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आख्खं गावच पोलीस स्टेशनमध्ये
Excise policy case : मनिष सिसोदियांवरील आरोप काय? दारु पॉलिसीमध्ये काय बदल केला होता?

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares