Kisanputra Andolan : 18 जूनला पुण्यात किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं पदयात्रा निघणार, 'या' शेतकरी – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 11 Jun 2022 02:51 PM (IST)
Edited By: गणेश लटके
Kisanputra Andolan
Kisanputra Andolan : येत्या 18 जूनला पुण्यात पदयात्रा काढली जाणार आहे. शेतकरी पारतंत्र्य दिनानिमित्त हातात काळे ध्वज घेऊन ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यात किसान पुत्रांसोबत महाराष्ट्रातील स्वतंत्रतावादी शेतकरी नेते आणि चांदवड येथील शेतकरी आंदोलक नेते सहभागी होणार आहेत. या यात्रेचा समारोप महात्मा फुले वाड्यात होणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी देखील शेतकरी गुलाम आहेत, असा दावा किसानपुत्र आंदोलनाच्या वतीनं करण्यात आला आहे.
पहिला घटना बिघाड
18 जून 1951 रोजी, पहिला घटना बिघाड करुन भारतीय राज्य घटनेत नसलेले परिशिष्ट-9 जोडण्यात आले. तेव्हा घटना स्वीकारुन फक्त दीडच वर्ष झाले होते. पहिली निवडणूक देखील झाली नव्हती. या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेल्या कायद्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाता येणार नाही, अशी लोकशाही विरोधी तरतूद करण्यात आली. आज या परिशिष्टातील 284 कायद्यांपैकी 250 कायदे थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. सीलिंग, आवश्यक वस्तू आदी कायद्यांमुळं शेतकरी गुलाम बनला व आत्महत्या करु लागला आहे. या कायद्यांना परिशिष्ट-9चे संरक्षण मिळाले आहे. हे कायदे विषारी साप आहेत. परिशिष्ट-9 हे या सापांचे वारुळ आहे. संविधान विरोधी असलेले हे कायदे रद्द व्हावे, शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावं, म्हणून किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने दरवर्षी 18 जूनला ‘शेतकरी पारतंत्र्य दिवस’ पाळला जातो.
‘या’ शेतकरी नेत्यांचा सहभाग

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील आणि ललित बहाळे, माजी अध्यक्ष अनिल घनवट, विचारवंत विनय हर्डीकर, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे विष्णुपंत भुतेकर (वाशीम), लिबर्टी लीगचे मकरंद डोईजड, किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब आदी मान्यवर पुण्याच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. बालगंधर्व चौक ते अलका टॉकीज मार्गे महात्मा फुले वाडा (भवानीपेठ) अशी ही पदयात्रा काढली जाणार आहे. 
सरकारे बदलली पण शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे तसेच कायम राहिले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी देखील शेतकरी गुलाम आहेत. गळफास असलेल्या कायद्यांविरुद्ध कोणी आवाज उठवीत नाही. स्वातंत्र्याचा संकोच करणारे, संविधान विरोधी परिशिष्ट-9 रद्द करण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. इतिहासाने ही जबाबदारी तुमच्या आमच्यावर टाकली आहे. शेतकरी स्वातंत्र्याच्या बाजूने असलेल्या सर्वांनी आता पुढे आले पाहिजे. 18 जून 22 रोजी होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केलं आहे.
 
Maharashtra Rain : राज्यात पुढील दोन दिवस पावसाची उघडीप, तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
village does not sell milk : महाराष्ट्रातलं असं गाव जिथं दुधाची विक्री केली जात नाही, वाचा नेमका प्रकार काय?
Sangli Crime : ब्रम्हनाळमध्ये कृष्णा काठी आढळलेल्या १४ फुटी मगरीचा मृत्यू, वनविभागाकडून अंत्यसंस्कार
Aurangabad: कपाशींवर माव्याचा प्रादुर्भाव, फुल गळतीमुळे शेतकरी संकटात
Wheat Production : गव्हाचं उत्पादन तीन टक्क्यांनी घटणार, तर कडधान्यासह ऊस, मका, हरभऱ्याचं उत्पादन वाढणार 
DOLO 65O गोळ्यांची विक्री वाढण्यासाठी डॉक्टरांना कंपनीकडून 1000 कोटींची गिफ्ट, सुप्रीम कोर्टात याचिका
Dahi Handi 2022 : दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हायअलर्ट जारी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ
Mumbai Corona Update : मुंबईत पुन्हा कोरोनाचा धोका वाढतोय, दोन दिवसात चारपटीने वाढले रुग्ण
पाकिस्तानात अडकलेल्या कुटुंबाला मायदेशी आणा,बॉलिवूडच्या दिग्दर्शकाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
Mumbai : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares