Maharashtra News Live Update : दहिकाला पथकांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहे, सर्वांनी हा सण उत्साहात… – TV9 Marathi

Written by

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल
Aug 19, 2022 | 9:37 PM
आज दिनांक 19 ऑगस्ट 2022  आपण जाणून घेणार आहोत राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी (Maharashtra News Live Update). सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचे गेले दोन दिवस वादळी ठरले आहेत. आज जरी सुटी असली तरी देखील या पार्श्वभूमीव काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात. अधिवेशनादरम्यान विरोधक आणि सत्ताधारी एकोमेंकांवर आरोप – प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे राज्यात पाऊस (Monsoon Live Update) सुरूच असून, राज्यभरातील जलाशयाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तर काही भागांना दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. तसेच आज राज्यभरात दहीहंडीचा थरार अनुभवयाला मिळणार आहे. गोविंदा पथक सज्ज झाले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षाने राज्यात दहीहंडी साजरी होत  असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
उदयापासुन कोयना धरणातुन पाणी विर्सग आणखी वाढवणार
कोयना धरणात पाणी आवक वाढल्याने उद्या सकाळी 10 वाजलेपासुन कोयना धरणाचे वक्रदरवाजे 4 फुट 6 इंच उचलुन 29900 क्युसेक्स पाणी विसर्ग होणार
नदीपात्रात एकूण 32000 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार
धरण पाणीसाठा 97.18 tmc झाला आहे
नदीकाठांच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राम कदम यांची दहीहंडी 5 थर लावून घाटकोपर मधील बालविकास गोविंदा पथकाने फोडली
घाटकोपर मधील बाल विकास गोविंदा पथकाने राम कदम यांची दहीहंडी 5 थर लावून फोडण्यात आली या गोविंदा पथकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
सिसोदियांच्या निकटवर्तीयांना दारू व्यापाऱ्यांकडून कोट्यावधी रुपये मिळाले
सीबीआयच्या FIR मध्ये धक्कादायक आरोप
अबकारी खात्यातील घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून एफ आय आर दाखल
सिसोदिया यांच्यासह 15 जणांविरोधात एफ आय आर दाखल
आज सकाळपासून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयची धाड
माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह आणि भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी दहीहंडीच्या निमित्ताने महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
दहिसर विधानसभेत भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात पोहोचलेले भाजप नेते आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह आणि आमदार मनीषा चौधरी यांनी यावेळी आपण भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडत असल्याचे सांगितले.
शिंदे भाजप सरकारने गोविंदा पथकांसाठी विमा योजना राबवली, हे कौतुकास्पद आहे, एवढेच नाही तर दहीहंडी गोविंदा पथकांना खेळात घेऊन गोविंदा पथकांसाठी विमा योजना राबविणे हेही कौतुकास्पद काम आहे.
दहीहंडी उत्सवावर मागील सरकारने घातलेले सर्व निर्बंध हटवल्यानंतर यंदा दहीहंडी उत्साहात साजरी केली जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडी कार्यक्रमाला सुरुवात
सांस्कृतिक कार्यक्रमाने होतोय दहीहंडी उत्सवाला सुरुवात
खासदार धनंजय महाडिक माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित
कोल्हापूरच्या दसरा चौकात रंगतोय दहीहंडीचा थरार
कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील दहीहंडी पथक सहभागी
ठाण्यातील वसंत विहार या ठीकानी भाजप माथाडी कामगार विभागाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या दहीहंडी ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली यावेळी फडणवीस यांची प्रतिक्रिया दिली. काल झालेल्या निर्णयाच समाधान वाटते आहे.आतापर्यंत चांगल्या प्रकारे दहीहंडी सण साजरा झाल असून पुढेही निर्विवाद चांगला होणार आहे, सरकार आल्यावर जस मोकळं वाटते तसच ठाण्यात आल्यावर जास्त मोकळं वाटते अशी दिली आहे.
मुख्यमंत्र्याचं अभिनंदन याला खेळाचा दर्जा दिलाय
10 लाखाचं विमा कवच आहे
सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण आहे फारचं चांगला निर्णय आहे
स्वप्नील जोशीनं मुख्यमंत्र्यांच केलं कौतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाला खासदार राजन विचार यांचे प्रतिउत्तर
येणाऱ्या निवडणुकीत कोन कोणाची हांडी फोडतोय हे त्या वेळेला दिसेल या उत्सवामध्ये अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे हा उत्सव एकत्रीत येण्याचा सण आहे यांच्यात कुठल्याही प्रकारचा राजकारण आणू नये प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता त्याच्या पक्षासाठी काम करत असतो
सोलापूर | सोलापुरातील शेकडो वर्षाची परंपरा असलेली वडार समाजाची मानाचा दहीहंडी उत्सव संपन्न; दहीहंडीला आमदार विजयकुमार देशमुखांची हजेरी
कोरोनावर वारकऱ्यांकडून पथनाट्य दाखवली जात आहे..
कोरोना काळात नागरिक किती हतबल झाले होते..
स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी कार्यक्रमात थोड्याच वेळात उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस पोहचले आहेत.
ठाण्यात शिवाजी पाटील ,भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारणी सदस्य यांच्या तर्फे दहीहंडी कार्यक्रमाचा आयोजन.
दहीहंडी कार्यक्रमात मोठं उत्साह पाहायला मिळत आहे.
कोरोनावर वारकऱ्यान कडून पथनाट्य दाखवली जात आहे..
कोरोना काळात नागरिक किती हतबल झाले होते..
स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी कार्यक्रमात थोड्याच वेळात उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस पोहचले आहेत.
ठाण्यात शिवाजी पाटील ,भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारणी सदस्य यांच्या तर्फे दहीहंडी कार्यक्रमाचा आयोजन.
दहीहंडी कार्यक्रमात मोठं उत्साह पाहायला मिळत आहे.
स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी कार्यक्रमात थोड्याच वेळात उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस पोहचणार आहेत.
ठाण्यात शिवाजी पाटील ,भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारणी सदस्य यांच्या तर्फे दहीहंडी कार्यक्रमाचा आयोजन.
दहीहंडी कार्यक्रमात मोठं उत्साह पाहायला मिळत आहे.
यंदाची दहीहंडी वेगळी एकनाथ शिंदेंनी याला खेळाचा दर्जा दिला
दहीहंडीच्या शुभेच्छा देतो
शहाजी बापूंनी गुवाहाटीचा डायलॉग म्हटला
| सोलापूर | अक्कलकोटमध्ये 2 मुलांसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या महिलेला वाचवले; युवकाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
दहिकाला पथकांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहे, सर्वांनी हा सण उत्साहात साजरा करावा, सुरक्षित रहावे, हीच आमची शुभेक्षा आहे.
महापालिकेची हंडी नक्कीच फुटणार आहे
तानाजी सावंत आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांचा गावाकडचा सहकारी जहांगीर रुग्णालयात भरती आहे
त्याला पाहण्यासाठी जहांगीर हॉस्पिटलला आज सावंतांनी अचानक भेट दिली
भेट देत खाजगी रुग्णालयातील व्यवस्थेचा घेतला आढावा
आरोग्यमंत्र्यांनी अचानक भेट दिल्यानं हॉस्पिटल प्रशासनाची तारांबळ उडाली
यावेळी हॉस्पिटलमधील विविध विभागात जाऊन वापरत असलेल्या साधनांचा घेतला आढावा
हॉस्पिटल प्रशासनाला काही मदत लागत असेल तर सांगावं मात्र रुग्णांच्या उपचारात हेळसांड नको अशा सूचनाही यावेळी तानाजी सावंत यांनी दिल्या
आम्ही एक दहीहंडी फोडली त्यात प्रकाश पण एक गोविंदा होत आ
मुंबई, सुरत, गुवाहाटी, कठीण हंडी होती आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे फोडली
त्यातला एक गोविंदा प्रकाशत पण आहे
या राज्यात बाळासाहेब ठाकरे, आनंद दीघे यांच्या विचारांच शिवसेना भाजपाय युतीचं सरकार आहे
भव्य दहिकाला उत्सवात सर्वांचे स्वागत,
तुमचे सरकार आले तर सर्व काही खुले होईल.
दहीहंडी जोरात, नवरात्रीचा जोरात आणि गणपतीचा जोरात,
तुम्ही गोविंदा पथक वादक नाही.
सरकारने 10 लाखांचे विमा संरक्षण दिले आहे
दारू पिऊन त्रास देत असल्याने, मित्राणेच केला मित्राचा खून
Anchor : एपीएमसी मार्केट मध्ये 14 ऑगस्ट रोजी एका रामायण ललसा उर्फ गुरुदेव उर्फ बाबा या व्यक्तीचा मृतदेह एपीएमसी पोलिसांना मिळाला,मात्र या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला याचा शोध लावणे महत्त्वाचे असल्याने,पोलिसांनी काही महत्वाच्या माहितीच्या आधारे,तपास केला असता,त्याच्या सोबतच राहणाऱ्या एका व्यक्तीला उत्तर प्रदेश मध्ये जाऊन ताब्यात घेलते,त्याची कसून चौकशी केली असता,मयत व्यक्ती आपल्याला दारू पिण्यावरून नेहमी बोलत असल्याने त्याच्या डोक्यात पेवरब्लॉक घालून खून केल्याची कबुली दिली.आरोपी अरुण कुमार भरती याला अटक केली असून,कोर्टाने त्याला 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून,अजून काही आरोपी कडून गुन्हा घडला आहे का,याचा तपास पोलीस करत आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
पाऊस सुरू होतोय आणि बघा आपलं सरकार आलं तर काय होतं
दहीहंडी जोरात, गणेशोत्सव जोरात,नवरात्री जोरात
आपले मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलं तुम्ही गोविंदा. नाही खेळाडू आहात
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी छत्रपती संभाजीराजेंची घेतली भेट
भेट घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात केली चर्चा
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भातही केली चर्चा
संभाजीराजेंच्या घरी जाऊन घेतली भेट
– बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचा माजी मंत्री दिलीप सोपल यांना ED कारवाई लावण्याचा इशारा
– आर्यन शुगर या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकवलेले बील देण्याबाबत आमदार राजेंद्र राऊत यांनी माजी आमदार आणि मंत्री दिलीप सोपल यांना इशारा दिला आहे
– लोकांचे पैसे बुडवून आमचा काही संबंध नाही असं म्हणणाऱ्या दिलीप सोपलांवर ईडीची चौकशी लावणार
– शेतकऱ्यांचे पैसे खायचे आणि माझा काही संबंध नाही म्हणायचं ही मग्रूरीची भाषा चालणार नाही
– आता ED, इन्कम टॅक्स आहे, माझा काय संबंध असे म्हणून चालणार नाही.
– यापूर्वीच आम्ही सोलापूर शहर पोलीस आणि पांगरी पोलीस स्टेशनला कारखान्याच्या संचालकांविरुद्ध तक्रार केलेले आहे
– बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलेले पाहायला मिळाले
– बार्शीतील आर्यन शुगर प्रकरणी माजी आमदार दिलीप सोपल यांनी कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांच्या बीलासंदर्भात आमचा काही संबंध नाही असे वक्तव्य केल्यानंतर आमदार राऊत आक्रमक
– यापूर्वी मी वयाचा मान राखून गप्प बसलो होतो मात्र आता ईडीची चौकशी लावल्याशिवाय राहणार नाही
– आमदार राजेंद्र राऊत यांचा माजी मंत्री दिलीप सोपल यांना इशारा
मीरा रोडच्या हॉटकेश परिसरातील समर्थ प्रतिषठानच्यावतीने दहीहंडीचा आयोजन करण्यात आली आहे..
दहीहंडी उत्सवात मोठे संख्येनी गोविंदा पथक सहभाग घेत असताना पाहायला मिळतेय आहे.
गेल्या दोन वर्ष कोरोनाचं सावट असल्याने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला नाही..यावेळी उत्सवमहेश साजरा करण्याचं परवानगी असल्याने मोठं उत्साह पाहायला मिळतेय..
दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांची राज्य सरकारवर टीका
या सरकारची दहीहंडी जनता फोडणार
शिवसेनेची निष्ठेची दहीहंडी असते ती आम्ही कायम राखणार
मात्र या शिंदे भाजपच्या सत्तेची दहीहंडी जनता फोडणार
अंबादास दानवे यांची टीका
राम कदम दही हंडी
फडणवीस आपल सरकार आलं की सगळ कस खुलखुल होतं गोविंदा जोरात, गणपती जोरात आणि नवरात्र पण जोरात होणार खेळांच्या सुविधा आमच्या गोविंदांना मिळणार आपण विकासाची हंडी फोडली त्याची फुले सगळ्यांपर्यंत पोहचणार हे सामान्य माणसांचे सरकार आहे गोविंदांना मनापासुन शुभेच्छा
शिंदे गटातले आमदार किशोर पाटील उद्धव ठाकरेंच्या प्रेमात?
कट्टर शिंदे समर्थक आमदार असूनही किशोर पाटलांचं उद्धव ठाकरेंवरचं प्रेम काही केल्या कमी होईना…
एकीकडं राज्यभर शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरेंचे फोटो, बॅनर काढून टाकलेले आहेत. मात्र, दुसरीकडं किशोर पाटलांनी त्यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे बॅनर कायम ठेवलंय… या संदर्भात पत्रकारांनी विचारणा केल्यावर किशोर पाटील यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आजही आमच्या हृदयात कायम आहेत, पण बाळासाहेबांच्या विचारांवर उद्धव ठाकरे चालले नाहीत म्हणूनच ही वेळ आलीये, असा टोलाही यावेळी आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला… ठाकरे आणि शिंदे गटात टोकाचे मतभेद आहेत, असं असताना आमदार किशोर पाटलांनी मात्र उद्धव ठाकरेंचे फोटो आपल्या कार्यालयात कायम ठेवल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत…
कल्याण नगर महामार्गावरील कांबा गावात गोविंदा पथकाचे अनोखे आंदोलन
खड्डे बुजवण्यासाठी शिव नवतरुण गोविंदा पथकाने भर रस्त्याच्या खड्यात चार थराचा मानवी मनोरे रचत प्रशासनाचा निषेध
खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या नारायण भोईर यान्हा लवकरात लवकर प्रशासकीय मदत मिळावी व महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशा प्रकारचे पोस्टर हातात घेऊन सलामी
लवकरात लवकर कामे सुरू केली नाही तर गोविंदा पथकाचा उग्र आंदोलनाचा इशारा
गिरगाव, मलबार हिल येथे मनसेकडून हिंदुत्वाची दहीहंडी उत्सव
मानाच्या जरिमरी गोविंदा पथकाकडून 8 थरांची सलामी
जरिमरी गोविंदा पथकाकडून मोठा जलोषा
जरिमरी पथकाचा थरार पाहण्यासाठी अलोट गर्दी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम (शुक्रवार, दिनांक 19 ऑगस्ट 2022)
दुपारी 1.30 : दहिहंडी उत्सव-2022, जांबोरी मैदान, वरळी मुंबई
दुपारी 2.15 : दहिहंडी उत्सव-2022, कै. सदाकांत ढवण मैदान, अपना बाजार समोर, गोविंदजी केणी रोड, नायगांव, मुंबई
दुपारी 3.05 : दहिहंडी उत्सव-2022, श्रेयस सिग्नल, घाटकोपर, मुंबई
दुपारी 4.30 : दहिहंडी उत्सव-2022, देविपाडा मैदान, एक्सप्रेस हायवेच्या बाजुला, बोरीवली (पूर्व)
सायं 4.55 : दहिहंडी उत्सव-2022, कोरा केंद्र ग्राऊंड नं. 2 बोरीवली (प.), मुंबई
सायं 5.25 : दहिहंडी उत्सव-2022, शुभ जीवन सर्कल, आय.सी. कॉलनी, बोरीवली (प.), मुंबई
सायं. 5.55 : दहिहंडी उत्सव-2022, अशोकवन, दहिसर, मुंबई
गिरगाव, मलबार हिल येथे मनसेकडून हिंदुत्वाची दहीहंडी उत्सव
मानाच्या जरिमरी गोविंदा पथकाकडून 8 थरांची सलामी देण्यासाठी सुरूवात
अमरावती कृषिमंत्र्यांच्या दौऱ्याआधी शेतकरी संघटनेची बॅनरबाजी..
बुलेट ट्रेनसाठी निधी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी? अशी बॅनरबाजी
कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव धांदे कासारखेड आणि रायपूर या भागात अतिवृष्टी झालेल्या भागाची ते पाहणी करणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी मंत्री अब्दुल सत्तांच्या दौऱ्यावर बॅनरबाजी.
शिंदे फडणवीस सरकारमध्ये बुलेट ट्रेनसाठी निधी ताबडतोब मिळतो पण अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी
दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच धुमधडाक्यात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. वसई, विरारमध्ये आज सकाळपासून गोविंदा पथकांमध्ये दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. दहीहंडीचा कार्यक्रम पहाण्यासाठी नागरिक देखील गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. दोन वर्षानंतर प्रथमच मोठ्या थाटात सर्वत्र भव्य, दिव्य अशा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. टीव्ही 9 मराठीमध्ये देखील दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेशी खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गिरगावमध्ये मनसेकडून भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षांनी कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्यामुळे निर्बंधमुक्त वातावरणात दहीहंडीचे उत्सव पार पडत आहे.

मागाठाण्यात दहीहंडीच्या सलामीला सुरुवात
शिवस्वराज्य पथक देणार पहिली सलामी
सहा थरांची असणार सलामी
मागाठाण्यात शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. थोड्याच वेळात ही दहीहंडी फोडण्यात येणार आहे. गोविंदा पथक मैदानात आले असून, प्रकाश सुर्वे हे देखील कार्यक्रमस्थळी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात मानाच्या सलामीला सुरुवात होणार आहे.
गिरगावमध्ये मनसेच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गिरगावमध्ये मनसेच्या दहीहंडीला राष्ट्र चेतन महिला गोविंदा पथकाने पाच थरांची सलामी दिली आहे. आज दोन वर्षानंतर प्रथमच दहीहंदी उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.
गेले दोन वर्ष राज्यात  कोरोनामुळे निर्बंध होते. त्यामुळे दहीहंडी साजरी झाली नाही. मात्र यंदा निर्बंधमुक्त वातावरणात भव्य दहीहंडीचा उत्सव पहायाला मिळत आहे.  ठाण्यात मनसेच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून,  9 ते 10 थर रचण्यासाठी गोविंदा सज्ज झाले आहेत.

भांडुपमध्ये मनसेच्यावतीने सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  या दहहंडीला 9 थर लावून जय जवान गोविंदा पथक सलामी दिली आहे.
राज्यभरात गोकुळाशाष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात आज दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.  गिरगावमध्ये मनसेकडून भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसैनिकांकडून दहीहंडीची जरोदार तयारी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
कळवा रेल्वेस्थानकातून एसी लोकल न सोडता साधी लोकल सोडण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. मात्र तरी देखील एसी लोकलच सोडण्यात येत असल्याने अखेर प्रवाशांनी आक्रमक होत ही लोकल अडवली. या प्रकरणात  रेल्वे पोलिसांनी 5 आणि स्थानिक कळवा पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले आहे.
आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नागपूर दौऱ्यावर आहेत. सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये नागपुरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या आढावा बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुनील केदार, आ. आशिष जैसवाल, आ. विकास ठाकरे, सलील देशमुख हे देखील उपस्थित आहेत. कृषीमंत्री झाल्यानंतर सत्तार यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे.
देवेंद्र फडणवीसांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी
ब्राह्मण महासंघाचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा  यांना पत्र
राष्ट्रीय राजकारणात देवेंद्र फडणवीस विजयाची घोडदौड कायम ठेवतील
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा दावा
शिर्डी साईबाबाचरणी कोट्यवधींचे दान
सलग सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी
पाच दिवसात 3 कोटी 55 लाखांच दान
दानपेटीत 3 कोटी 22 लाख रुपयांचे रोख दान
33 लाख रुपये किमतीचे सोने तर दिड लाख रुपयांची‌ चांदी अर्पण
देणगी ‌काऊंटर , ऑनलाईन दानाचा यात समावेश नाही
नाझरे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं
नाझरे धरण पाणलोट क्षेत्रात जून ते ऑगस्टदरम्यान 376 मिमी पाऊस
पुरंदर व बारामती तालुक्यातील 56 गावे व वाड्यावस्त्यांचा पाणीप्रश्न मिटणार
धरण क्षेत्रातील 86 छोटे-मोठे पाझर तलाव भरण्याची प्रक्रिया सुरु
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नाझरे धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
संशयास्पद बोटप्रकरणी ‘एनआए’चे पथक हरिहरेश्वरला दाखल
एटीएसचे पथक देखील हरिहरेश्वरला पोहोचले
संशयास्पद बोटी जवळ कमांडो तैनात
बोटीमध्ये आढळून आल्या होत्या तीन एके 47  रायफल्स
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयची छापेमारी
सहा जणांचे पथक सिसोदिया यांच्या घरी दाखल
सीबीआयला पूर्ण सहकार्य करणार
छाप्यानंतर मनीष सिसोदिया यांची माहिती
कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
सकाळी 10 वाजता घेणार कृषी विभागाचा आढावा
अब्दुल सत्तार करणार अतिवृष्टीबाधित  क्षेत्राची पहाणी
कृषीमंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा पहिलाच विदर्भ दौरा
वर्षा आणि अमरावती जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेणार
अतिवृष्टीमुळे रद्द झालेल्या नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांची नवीन तारखा जाहीर
16 ॲागस्टची रद्द झालेली परिक्षा आता 27 ॲागस्टला होणार
17 ॲागस्टची परिक्षा आता 28 ॲागस्टला होणार आहे
परिक्षांची वेळ आधीच्या वेळेवुसार राहणार
21 ॲागस्टची स्थगित केलेली परिक्षा आता 1 सप्टेंबरला होईल
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा दिलासा, स्वाईन फ्लूने वाढवली चिंता
जिल्ह्यात स्वाईन फ्लूने आणखी पाच रुग्णांचा मृत्यू
स्वाईन फ्लूच्या मृतांची संख्या पोहोचली 10 वर
जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे आतापर्यंत 211 रुग्ण
स्वाईन फ्लूच्या डेथ ॲाडीटमध्ये आणखी पाच मृत्यूची नोंद
Published On – Aug 19,2022 7:44 AM
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares