most polluted cities in the world: ही आहे जगातील सर्वाधिक १० प्रदूषित शहरे; भारताची ही शहरे टॉप २० मध्ये,पाहा फोटो – Marathi Hindustan Times

Written by

Friday , 19 August 2022
Sign in
विभाग
मराठीचे तपशील
(1 / 10)

स्टेट ऑफ ग्लोबल एअर यांनी सादर केलेल्या प्रदूषित शहरांच्या अहवालानुसार जगातील पहिल्या १० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील दिल्ली आणि कोलकत्ता या शहरांचा समावेश आहे. सरासरी वार्षिक लोकसंख्या भार हा सर्वाधिक आहे. येथील हवाही सर्वाधिक प्रदूषित आहे. या यादीत कोलकत्ता पहिल्या क्रमांकावर आहे तर दिल्ली शहर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत मुंबई शहर हे १४ व्या स्थानावर आहे.(HT Photo/Raj K Raj)

(2 / 10)

दिल्ली येथे २०१९ मध्ये करण्यात आलेल्या अहवालात हवेचे प्रदूषण हे वार्षिक सरासरी PM2.5 म्हणजेच प्रति घनमीटर ११० मायक्रोग्राम एवढी नोंदवली गेली. प्रदूषणाची ही पातळी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सर्वाधिक आहे.(AP)

(3 / 10)

कोलकाता शहराचे वार्षिक सरासरी प्रदूषण हे PM2.5 प्रति घनमीटर ११० मायक्रोग्रॅम नोंदवले गेले आहे. स्टेट ऑफ ग्लोबल एअर इनिशिएटिव्हच्या “हवा गुणवत्ता आणि शहरांमध्ये आरोग्य” या अहवालात या शहराच्या प्रदूषणाची माहिती देण्यात आली आहे.(Representative Image)

(4 / 10)

नेजेरियातील कानो शहराची वार्षिक प्रदूषणाची सरासरी ही PM2.5 म्हणहेच ८३.६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली आहे. भारत, नायजेरिया, पेरू आणि बांगलादेशांतील काही शहरात ही पतिळि पीएम २.५ असून ती जागतिक सरासरीपेक्षा अनेक पटीने जास्त आहे, असे या अहवालात म्हटले आहे. जगभरातील शहरे ही झपाट्याने विस्तारत आहेत. या वाढीमुळे येथील रहिवाशांच्या आरोग्यावर वायू प्रदूषणाचे परिणामही दिसू लागले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी लवकरात लवकर यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. या साठी भारतीय शास्त्रज्ञ पल्लवी पंत या महत्वाची भूमिका बजावत आहेत.(Getty Images)

(5 / 10)

पेरू देशातील लिमा शहरात हवेची वार्षिक सरासरी प्रदूषण पातळी ही PM2.5 एवढी आहे. ती ८३.६ मायक्रोग्राम प्रति घनमीटर नोंदवली गेली आहे. WHO च्या वायु गुणवत्ता माहितीचा संदर्भ देत, अहवालात म्हटले आहे की सध्या केवळ ११७ देशांमध्ये PM2.5 या एवढ्या प्रदूषण पातळी मोजण्यासाठी ग्राउंड-लेव्हल मॉनिटरिंग यंत्रणा आहे. तर केवळ ७४ देश हे हेवेतील नायट्रोजनच्या (NO2) पातळीचे निरीक्षण करत आहेत. ग्राउंड लेव्हल एअर क्वालिटी मॉनिटरिंग यंत्रणेतील धोरणात्मक गुंतवणूक आणि लक्ष्यित क्षेत्रांमध्ये उपग्रह आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषणाची आणखी चांगली माहिती घेता येऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे.(REUTERS)

(6 / 10)

बांगलादेशातील ढाका येथील प्रदूषणाची वार्षिक पातळी ही सरासरी PM2.5 एवढी आहे. तर सांद्रता ही ७१.४ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली आहे. बांगला देशातील फक्त चार शहरे तर भारतातील एकाही शहराने २०१९ मध्ये ५ मायक्रोग्राम प्रति घन मीटर (µg/m3) वार्षिक प्रदूषण पातळी ही पीएम २.५ ही हवेची गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण केली नाही असे या अहवालात म्हटले आहे.(Burhaan Kinu/HT File Photo)

(7 / 10)

इंडोनेशियातील जकार्ता शहराची वार्षिक प्रदूषण पातळी ही वार्षिक सरासरी PM2.5 पेक्षा जास्त ६७.३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली. भारत आणि इंडोनेशियामध्ये पीएम 2.5 प्रदूषण पातळीत सर्वात जास्त वाढ झाली आहे, तर चीनमध्ये सर्वात मोठी सुधारणा दिसून आली आहे.(Bloomberg)

(8 / 10)

नायजेरियातील लागोस या शहरात वार्षिक प्रदूषण पातळी ही सरासरी PM २.५ पेक्षा जास्त ६६.९ मायक्रोग्राम प्रति घनमीटर नोंदवली गेली आहे. जगभरातील ७ हजार २३९ शहरांपैकी, २०१० ते २०१९ पर्यंत PM2.5 प्रदूषणात सर्वाधिक तीव्र वाढ झालेल्या २० शहरांपैकी १८ शहरे ही भारतात आहेत. इतर दोन शहरे इंडोनेशियातील आहेत,” असे अभ्यासाच्या लेखकांनी या अहवालात नमूद केले आहे.(REUTERS)

(9 / 10)

पाकिस्तानातील कराचीत वार्षिक प्रदूषण पातळी ही PM2.5 पेक्षा जात ६३.६ मायक्रोग्राम प्रति घनमीटर नोंदली गेली आहे.(BSF Photo)

(10 / 10)

 चीन मधील बीजिंग शहरात वार्षिक सरासरी प्रदूषण पातळी ही PM2.5 पेक्षा जास्त ५५ मायक्रोग्राम प्रति घनमीटर नोंदली गेली. बीजिंगमध्ये २०१९ मध्ये हवेच्या प्रदूषणामुळे मृत्यू दर हा सर्वाधिक १२४ होता.(REUTERS)

इतर गॅलरीज

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares