अग्रलेख: उत्पादन नव्हे, उत्पादकता वाढवल्याने योग्य विकास – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
काही वेळा अतिउत्पादन ही मोठी समस्या होते. मध्य प्रदेशातील मंडईत लसूण एक रुपया किलोने विकला गेला. संतप्त शेतकरी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातील लासलगाव मंडईत कांद्याची किंवा उत्तर प्रदेशच्या फरुखाबाद मंडईत बटाटा किंवा आंध्र प्रदेशातील मिदनापल्ली मंडईत टोमॅटोची आवक झाली, तर भाव जमिनीवर येतात, म्हणजेच पीक चांगले आले तर शेतकऱ्यांची शोकांतिका वाढते. देशातील शेतीवर अवलंबून ७०% लोकांना विकासाचे फायदे द्यायचे असतील तर उत्पादकता वाढवण्यासाठी नवी क्रांती करावी लागेल.
केवळ काही पिकांचे उत्पादन वाढवल्यास समस्या आणखी वाढेल. गहू, तांदूळ, ऊस, फळे, दूध व भाजीपाला हे भारतातील अतिउत्पादनाचे बळी आहेत, तर डाळी व तेलबिया आयात कराव्या लागतात. म्हणजेच पारंपरिक शेतीतून शेतकरी बाहेर पडू शकत नाही. गरजेपेक्षा जास्त उत्पादन झालेल्या धान्याच्या किमतीच्या घसरणीचे संकट टाळायचे असेल तर निर्यात हाच एकमेव पर्याय आहे. परंतु, या उत्पादनांचा खर्च ही मोठी समस्या आहे, त्यामुळे ती जागतिक बाजारपेठेत स्पर्धेत नसतात. उदा. आपले प्रति हेक्टर गव्हाचे उत्पादन चीनपेक्षा ४०% व अमेरिकेपेक्षा ३५% कमी आहे. आपल्या गायी दररोज सरासरी ४.८७० लिटर दूध देतात, तर जागतिक आकडेवारी ७.३९० लिटर आहे. त्यामुळे उत्पादकता वाढवणे हा एकमेव उपाय आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares