टुडे २ स पटा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
01239
पोर्ले तर्फ ठाणे ः येथे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांचा सत्कार करताना उपसरपंच शहाजी खुडे व इतर.
गणेशोत्सवात शासन नियमाचे
पालन करा; अरविंद काळे
पोर्ले तर्फ ठाणे ः गणेश उत्सव साजरा करताना शासनाच्या नियमांचे पालन करा, असे प्रतिपादन पन्हाळ्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी येथील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केले. अध्यक्षस्थानी उपसरपंच शहाजी खुडे होते. जीवन खवरे यांनी स्वागत केले. श्री. काळे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार झाला. श्री. काळे यांनी दोन वर्षे कोरोनामुळे गणेश उत्सव साजरा करता आला नाही. गणेश उत्सवासाठीचे कोरोनाचे निर्बंध शासनाने उठविले आहेत; परंतु बाकीचे नियम आहेत तेच आहेत. श्रींची मूर्ती कशी असावी, स्टेज कसे असावे, सिस्टीमचा आवाज किती असावा हे पाहणे गरजेचे आहे. यासाठी मंडळांनी परवानगी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. बैठकीस गणेश पाटील, संतोष वायदंडे, बाजीराव इंगळे, अंगद शेवाळे आदी उपस्थित होते. अंगद चौगुले यांनी आभार मानले.
44354
कोल्हापूर : अलमट्टी धरणाच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलनप्रसंगी सिटिझन फोरमचे पदाधिकारी.
‘अलमट्टी’ची प्रतिकात्मक हंडी फोडून निषेध
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीचे गंभीर संकट निर्माण होत आहे. मागील काही वर्षांत आलेल्या पुरामुळे नुकसान झाले आहे. याचा निषेध म्हणून सिटिझन फोरमतर्फे अलमट्टी धरणाची प्रतिकात्मक दहीहंडी शाहू महाराजांच्या वेशभूषेतील मुलांच्या हस्ते फोडून प्रतिकात्मक आंदोलन केले. पूरग्रस्त नागरिक, शेतकरी, महिला आदींनी अलमट्टी धरणाची प्रतिकात्मक हंडी फोडली. याप्रसंगी सिटिझन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव, सुभाष सुर्वे, राजू जाधव, प्रकाश सरनाईक, निवास ब्रह्मपुरे, मनोहर सोरप, वैभव राजेभोसले, राजेंद्र थोरवडे, नंदू घोरपडे, गजानन नाकिल, रणजित पवार, आकाश शेलार, मनोहर मोरे, गौरव लांडगे, राजवर्धन यादव, संग्राम शिंदे, सचिन घाटगे, आरती दीक्षित, रेखा दुधाणे उपस्थित होते.

सरवडेत गरोदर मातांची ओटी भरणी
सरवडे : येथील ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती यांच्यामार्फत उपकेंद्र सरवडे येथे गरोदर मातांच्या ओटी भरणीचा कार्यक्रम व स्तनपान सप्ताह साजरा झाला. यावेळी सरपंच निर्मलादेवी राजेंद्र पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमात गरोदर मातांना गरोदरपणात घ्यावयाची काळजी, आहार, स्वच्छता, लसीकरण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. स्तनदा मातांना स्तनपानाविषयी माहिती देऊन स्तनपानाचे महत्त्व सांगण्यात आले. उपकेंद्राच्या डॉ. स्नेहलता पाटील, आरोग्य सेविका आशा पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी शोभा पाटील, जानकी पाटील, नंदा मर्दाने, वर्षा कांबळे, शोभा कोपार्डेकर, मनीषा पाटील, वैशाली पाटील यांनी सहभाग नोंदवला.
01021
टिटवे ः येथील शहीद महाविद्यालयात बोलताना डॉ. जाबिन बसडे.
शहीद महाविद्यालयात मुलींना मार्गदर्शन
कसबा वाळवे ः प्रत्येकात एक शक्ती असते. त्या शक्तीला ओळखून येणाऱ्या संकटांना तुडवत आयुष्य समृद्ध करायचे असते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. जाबिन बसडे यांनी केले. त्या टिटवे (ता. राधानगरी) येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात ‘स्वतःमधील अमर्याद शक्तीचा शोध’ या विषयांतर्गत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई सीताराम पाटील होत्या. डॉ. जाबिन म्हणाल्या की, जिल्ह्यातील ११० गावांतील ९०० मुलींना येथे स्वतःच्या पायावर पराक्रमी रणरागिणी होण्यासाठी शहीद शिक्षण संस्था मोलाचे कार्य करते आहे. ही प्रेरणादायी बाब आहे. प्राचार्य प्रशांत पालकर यांनी स्वागत केले. यावेळी विभागप्रमुख प्रा. सागर शेटगे, शिक्षक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सानिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तेजस्विनी परबकर यांनी आभार मानले.
01028
कसबा सांगाव ः येथे रोटरीतर्फे सत्कार करताना विशाल शेटे. सोबत रमेश बेळवी, संदीप दाईंगडे आदी.
रोटरी ग्रामसेवा केंद्र सांगावचा पदग्रहण समारंभ
कसबा सांगाव ः रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलद्वारा पुरस्कृत रोटरी ग्रामसेवा केंद्र कसबा सांगावचा पदग्रहण समारंभ उत्साहात झाला. २०२२-२३ करिता अध्यक्षपदी रमेश बेळवी यांची, तर सेक्रेटरीपदी संदीप दाईंगडे यांची निवड झाली. यावेळी रोटरी क्लब ऑफ सेंट्रल कोल्हापूरचे अध्यक्ष विजयकुमार यवलुजे उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी, मान्यवर व्यक्तींचा सत्कार होऊन बक्षीस वितरण झाले. संतोष मिरजे यांनी स्वागत केले. अध्यक्षांची निवड दुर्गेश तेरदाळे यांनी केली.
विशाल शेटे यांनी आढावा मांडला. डॉ. भूषण शेंडगे, आनंदराव कदम, आत्माराम व्हटकर, संभाजी कोपार्डे, मनीष पटेल, शिव भोसले, हर्षवर्धन धोत्रे आदी उपस्थित होते. संदीप दाईंगडे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासो कोगनोळे यांनी आभार मानले.

जेनेसिस फार्मसीचा निकाल ८८ टक्के
कसबा तारळे : गैबी-राधानगरी येथील जेनेसिस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष डिप्लोमा विभागाचा निकाल ९७ टक्के व अंतिम वर्षाचा निकाल ८८ टक्के लागल्याची माहिती संस्थापक व गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे आणि प्राचार्य शोभराज माळवी यांनी दिली. दोन्ही वर्षांत गुणानुक्रमे पहिले तीन्ही क्रमांक मुलींनी पटकावले. अंतिम वर्षातील मयुरी चौगुले (८८.६०), धनश्री चौगले (८८.२०) आणि सुरेखा चौगले (८५.८०) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविला. प्रथम वर्षातील अमृता सोनगेकर (८४.४०), अंकिता लेंगारे (७९.८०), प्राची सुतार व प्रतीक्षा पाटील (दोघी ७९.२०) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविला. विभागप्रमुख प्रा. इसाक मुजावर, प्रा. श्वेता काळेबेरे, प्रा. प्राजक्ता सावंत, प्रा. रोहन माने, प्रा. वर्षा शेवाळे, प्रा. वेदिजा डोंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
शिव-शाहू महाविद्यालयात रंगनाथन जयंती
सरूड ः भारतातील ग्रंथालय शास्त्राची पायाभरणी डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी केली. त्यांचे हे योगदान महत्त्वाचे आहे. ग्रंथालय शास्त्राचा त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला व या शास्त्राला एक शिस्त लावली, असे प्रतिपादन ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागप्रमुख प्रा. अशोक पाटील यांनी केले. येथील श्री शिव-शाहू महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करताना ते बोलत होते. प्रारंभी उपप्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा. आनंदा पाटील यांनी स्वागत केले. डॉ. के. ए. पाटील, डॉ. सुगत बनसोडे, डॉ. आसमा अत्तार, डॉ. प्रकाश वाघमारे, प्रा. एल. टी. आरगे, प्रा. प्रकाश नाईक, डॉ. नवनाथ गायकवाड, प्रा. डी. व्ही. नलगे आदी उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares