पूर ओसरल्याने नाला परिसरातील शेतकऱयांना दिलासा – Tarun Bharat – तरुण भारत

Written by

मार्कंडेय नदी-बळ्ळारी नाल्याच्या परिसरातील पाणी झाले कमी : पिकांना पोषक वातावरण, पावसाचा काही पिकांना फटका
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाने गेल्या 8 दिवसांपासून बऱयापैकी उघडीप दिली आहे. यामुळे नदी-नाल्यांना आलेला पूर ओसरला आहे. बऱयाच ठिकाणचे भातपीक पाण्याखाली गेले होते. ते आता दिसत आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही भातपीक पाण्याखाली आहे. त्यामुळे ती पिके वाया जाणार, अशी भीती शेतकऱयांतून व्यक्त होत आहे. सध्या शेतकरी वाया गेलेल्या भात शिवारात पुन्हा भात लागवडीचे काम करत आहे. सध्या त्यांना पोषक वातावरण मिळाले आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे बाजारपेठेतही गर्दी वाढताना दिसत आहे.  
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने संपूर्ण जिह्यालाच झोडपले होते. खानापूर, बेळगाव तालुक्मयात तर सर्वाधिक पाऊस झाला होता. या मुसळधार पावसामुळे  बळ्ळारी नाला. मार्कंडेय नदीला पूर आला होता. हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली होती. याचबरोबर खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीसह दूधगंगा, वेदगंगा, कृष्णा आणि घटप्रभा नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी आले होते. कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगेला महाराष्ट्रातील धरणातूनही पाणी सोडल्यामुळे नदीतील पाणी पात्राबाहेर आले होते. काही पूल पाण्याखाली गेली होते. मात्र आता पाऊस ओसरल्यामुळे नदींचे पाणीही कमी झाले असून बऱयाच दिवसानंतर पिके पाण्याखालून वर आली आहेत.
राकसकोप जलाशय तुडुंब
या झालेल्या दमदार पावसामुळे राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे. यामुळे बेळगावच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. आता पावसाने उघडीप दिल्याने शहराकडे येणाऱया नागरिकांचा ओढा वाढला आहे. तर शेतकरी पावसाने उघडीप दिल्यामुळे काही उरलेली कामे पूर्ण करण्यात गुंतला आहे. पावसामुळे सोयाबिन आणि भुईमूग पिकाला फटका बसण्याची शक्मयता वर्तविण्यात येत होती. मात्र आता पावसाने उघडीप दिल्यामुळे ही पिकेही तरली आहेत. काही पाणथळ जमिनीमध्ये मात्र अजूनही पाणी साचून राहिल्याने त्या पिकांना मात्र फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाच्या उसंतीमुळे सर्वांनाच दिलासा
पावसामुळे वाहनचालक रेनकोट व जॉकेटचा वापर करत होते. ते सांभाळताना त्यांची नाकीनऊ येत होती. आता पावसाने काहीशी उसंत घेतल्यामुळे काहीसे मोकळे मोकळे वाटू लागले आहे. पादचाऱयांनाही हातामध्ये छत्री घेऊनच बाहेर पडावे लागत होते. विद्यार्थ्यांना भिजतच शाळा गाठावी लागत होती. यामुळे थोडासा सर्वांनाच वैताग आला होता. पण आता उघडीप दिल्याने थोडेसे उल्हासदायक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या भातातील भांगलणीचे काम आणि रोप लागवडीचे काम आटोपले आहे.
दुबार भातलागवडीला प्रारंभ
सध्या शेतकऱयांनी खताची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. सोयाबिन पीकही बऱयापैकी आले आहे. यावषी पावसाने आतापर्यंत चांगली साथ दिल्यामुळे शेतकऱयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. एकूणच यावषी वरुणराजाने दिलासा दिला आहे. मात्र मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील शिवाराला फटका बसला आहे. याचबरोबर मार्कंडेय नदीला लागून असलेल्या शिवारातील काही पिकेही कुजून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱयांना त्या ठिकाणी दुबार भात लागवड करावी लागणार असून काही शेतकऱयांनी भात लागवडीला सुरुवातही केली आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares