pm fasal bima yojana modi government started new scheme of meri policy mere haath yojana for scheme documents | Latest Business Articles – Lokmat

Written by

Lokmat Business
‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ योजनेंतर्गत पीक विमा योजनेची कागदपत्रे शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचणार, मिळणार अनेक फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 10:57 AM2022-03-02T10:57:21+5:302022-03-02T10:59:33+5:30

नवी दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक योजना आणत आहे. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Yojana) ते फसल विमा योजना (Fasal Bima Yojana) म्हणजेच पीक विमा योजना इत्यादी अनेक योजनांचा समावेश आहे. सरकारने  2016 साली पीक विमा योजना सुरू केली.
आता सरकारने या योजनेत मोठे बदल केले आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांना या योजनेची हार्ड कॉपी मिळत नव्हती. या कारणामुळे, कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यानंतरही, कागदपत्रांच्या अभावामुळे लोकांना विमा दावा  (PM Fasal Bima Yojana Claim) करता आला नाही. आता शेतकऱ्यांच्या कागदपत्राशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.
केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ योजना सुरू केली आहे. या नवीन योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना योग्य वेळी कागदपत्रे न मिळण्याच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना विम्याची कागदपत्रे लवकरात लवकर मिळावीत, यासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी ही योजना सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री म्हणतात की, या नवीन योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत होईल आणि दलाल आणि मध्यस्थांचा प्रभाव कमी होऊ शकेल.
कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत देशातील 36 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा (PM Fasal Bima Yojana) लाभ घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांना सुमारे एक लाख कोटी रुपयांचा विमा विम्याच्या स्वरूपात दिला आहे. या विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पीक नुकसान झाल्यास सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना विम्याची कागदपत्रे योग्य वेळी मिळत नसल्याची समस्या दिसून येत होती. यामुळे कोणत्याही प्रकारचा तोटा झाल्यास विमा दावा करण्यात मोठी अडचण येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने ‘मेरी पॉलिसी, मेरे हाथ’ सुरू केली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना आता घरपोच पॉलिसीची कागदपत्रे मिळणार आहेत.
ऑनलाइन अर्ज करू शकता
या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अगदी सहजपणे ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://pmfby.gov.in/ वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तेथे ऑनलाइन फॉर्म भरा.
Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares