कसबा सांगाव: अवैध गौण खनिज उत्खनन, तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
सांगावमध्ये गौण खनिज उत्खनन थांबवा
ग्रामस्थ, शेतकरी आक्रमक; आंदोलनाचा इशारा
कसबा सांगाव, ता. २१ ः येथील मगदूम मळा, कालवा परिसरात राजरोसपणे अवैद्यरित्या गौण खनिज उत्खनन सुरू आहे. यामुळे शेतीसह पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. शासनाचा लाखोंचा महसूल वाया जात आहे. दरम्यान, प्रशासनाने अवैध उत्खनन थांबवावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील शेतकरी, ग्रामस्थांनी दिला. तलाठी दिगंबर पाटील यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
मगदूम मळा, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि कालवा परिसरात लाल माती, मुरूम, दगडांचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे. अनेक जेसीबी, ट्रॅक्टर ट्रॉली येथे असतात. पहाटे आणि रात्रीच्या वेळेस सातत्याने उत्खनन केले जाते. विरोध केल्यास त्यांच्या अंगावर धावून जाणे, धमकी देणे,
उद्धट भाषेत उत्तरे दिली जातात. उत्खनन करताना ठेकेदार थांबून असतात. शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून वीट भट्टी, खाजगी कामासाठी भराव टाकण्यासाठी अनेक टोळ्या सक्रिय आहेत. पाहणीसाठी गेलेल्या तलाठी दिगंबर पाटील यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरले. कालव्यातील निघालेल्या गौण खनिज पाटबंधारे विभागाकडे असेल तर कारवाईसाठी महसूल विभागाचे कर्मचारी कसे येतात? होत असलेली वाहतूक दिसत नाही का? अशा प्रश्नांची सरबती केली.
या जागेवरती सीसीटीव्ही व २४ तास एखादा सुरक्षा कर्मचारी नेमावा व गौण खनिज चोरून नेणाऱ्या वाहनावर कारवाई करावी. मंडल अधिकारी व तहसीलदार यांना बोलवून घ्या, अन्यथा जागेवरून हालणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
या वेळी महेश कोरे, आनंदा कोरे, दिलीप झांजगे, अर्जुन पाटील राजेंद्र झांजगे, नंदू झांजगे आदी उपस्थित होते.
कोट
अवैध उत्खनन करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येईल. मगदूम मळा येथील ग्रामस्थांच्या सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत केलेल्या मागणीबाबत वरिष्ठांशी बोलणार आहे.
– दिगंबर पाटील, तलाठी कसबा सांगाव
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares