रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ जवळील टोल नाका रद्द करा; राष्ट्रवादीची मागणी – तरुण भारत

Written by

सांगली/प्रतिनिधी
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे टोलनाका बसवला आहे. सदर टोल नाका वसुलीची 16 ऑगस्ट पासून सुरुवात केली आहे. चार चाकी वाहनांना ७८ रुपये, बसेस ना २२५ रुपये तर अवजड वाहनांना ४७० रुपये असे टोल नाक्यावर मोजावे लागणार आहे.
कवठेमंहाकाळ तालुक्यात टोलनाक्याच्या अवतीभवती शेती आहे. त्या शेतकऱ्यांना ही टोल वसुलीचा फटका बसत आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मोहन खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी सुहास चिटणीस यांना टोल रद्द करा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares