शेतकऱ्यांचे आधारस्तंभ हर्षवर्धन पाटीलसाहेब… – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
शेतकऱ्यांचे आधारस्तंभ
हर्षवर्धन पाटीलसाहेब…
भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतकऱ्यांची प्रगती झाली, तर देशाची प्रगती होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटीलसाहेब हे शेतकऱ्यांचे अडचणी जाणून घेऊन सोडविण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असून, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी शेततळी मंजूर करून घेऊन शेततळी पूर्ण होईपर्यंतचा पाठपुरावा केला. त्यांच्या चिकाटीमुळे तालुक्यात हजारो शेततळी गेल्या पंधरा-वीस वर्षापूर्वीच झाली असून, साहेबांचे हे काम शेतकरी कदापी विसरणार नाहीत.
– मा. श्री. मोहन दुधाळ,
प्रगतशील शेतकरी व कृषिनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी
जगामध्ये पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे ऋतू चक्रामध्ये सातत्याने बदल होत आहे. याचा गंभीर परिणाम पावसावरती झाला असून, पावसाची अनियमित वाढली आहे. पाण्याअभावी शेती करणे अशक्य आहे. पावसाच्या पाण्यावरची शेती बेभरवशाची असते. राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटीलसाहेबांनी सुरवातीपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेततळी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्यामुळे आम्ही शेततळी केली. आज शेततळ्यामध्ये ऐन उन्हाळ्यात आमच्या द्राक्ष, डाळिंब, पेरूच्या बागा बहरत आहेत. भाऊंच्या दूरदृष्टीमुळे शेतकरी प्रगतीच्या शिखरावर पोहचत आहे. इंदापूर तालुक्याचा शेततळ्याचा पॅटर्न संपूर्ण राज्यामध्ये राबवला गेला, याचे श्रेय निश्‍चित साहेबांना आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे
भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटीलसाहेब हे अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. गेल्या सरकाच्या काळामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडण्याचा सपाटा लावला होता. डोळ्यादेखत शेतकऱ्यांची पिके जळून खाक होत होती. अशा गंभीर परिस्थितीमध्ये भाऊंनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी आंदोलन सुरु केले. स्वत: रात्रभर महावितरणच्या कार्यालसमोर थंडीमध्ये झोपून राहिले. आंदोलनामुळे प्रशासनाला दुसऱ्या दिवशी वीज पुरवठा सुरळीत करावा लागला.गेल्या तीन-चार वर्षापूर्वी तालुक्यात दुष्काळ पडला होता. साहेबांनी तालुक्यात चारा छावण्या सुरु केल्या. तालुक्यातील सुमारे ३४०० जनावरे छावणीमध्ये दाखल झाली होती. ऐन दुष्काळामध्ये दिलेला मदतीचा हात शेतकरी विसरू शकणार नाहीत.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares