Maharashtra Breaking News 21 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर… – ABP Majha

Written by

By : स्नेहा कदम, एबीपी माझा वेब टीम | Updated: 21 Aug 2022 10:56 PM (IST)
पोलिसांच्या व्हॅनमध्ये गुंडाने केक कापून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. ठाणे पोलीस अधीक्षक विक्रांत देशमाने यांनी चौकशीचा आदेश काढला आहे. त्यामुळे संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. रोशन झा या कारागृहात असलेल्या गुंडांचा कल्याण नायायाल्याच्या आवारात त्याच्या समर्थकांनी वाढदिवस साजरा केला होता. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे देव दर्शनासाठी गेलेल्या पाच जणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील इकबालनगर येथील पाच जणांचा कंधारच्या जगतुंग तलावात बुडून मृत्यू झालाय. हे सर्व जण कंधार येथील बडी दर्गा येथे दर्शनासाठी गेले होते. दरम्यान यातील एक तरुण पोहण्यासाठी म्हणून गेला असता, तो बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी इतर चारजण गेले असता पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला. 
Devendra Fadanvis : हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचं सरकार आता आलं आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. राणा दाम्पत्याकडून अमरावतीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
Ratnagiri News : चिपळूणमधील कोळकेवाडी धरणातून 25 ऑगस्टला 10 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. कोळकेवाडी धरणातील अवजल सोडण्याची दुसरी चाचणी गुरुवारी घेण्यात येणार आहे. पूरनियंत्रणाचा एक भाग म्हणून ही चाचणी आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत धरणाचे वक्रद्वारे उघडून 10 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी बोलादवाडी नाल्यातून वाशिष्टी नदीत सोडून त्याचा प्रवाह आणि पातळीचा अभ्यास करण्यात येणार आहे. 
Mumbai:  दहिहंडीत डोक्याला मार लागून दोन गोविंदा गंभीर जखमी झाल्याप्रकरणी आयोजकांवर विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयोजकांनी सुरक्षेची पुरेशी व्यवस्था न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दोन्ही गोविंदांवर कूपर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 
Nilesh Rane: वेळ आणि दिवस ठरवा आपण चर्चा करूयात, अशी मवाळ भूमिका निलेश राणे यांनी रिफायनरी आंदोलकांसोबत बोलताना घेतली. रिफायनरी सर्वेक्षण ठिकाणी निलेश राणे आले असताना रिफायनरी आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. शनिवारी पोलिसांनी आंदोलक महिलांना मारहाण केली असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला. 
Nilesh Rane: रिफायनरी विरोधकांनी निलेश राणे यांचा ताफा अडवला, पोलिसांनी महिलांना मारहाण केल्याचा आरोप
Nashik News : नाशिकमधील सातपूर-अंबड लिंक रोडवरील प्लास्टिक भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. 
Ratnagiri News : माजी खासदार निलेश राणे रत्नागिरीतील बारसू सोलगाव इथल्या माळरानावर रिफायनरी संदर्भात सुरु असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. निलेश राणे हे रिफायनरीसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. रिफायनरी विरोधकांनी सर्वेक्षणासाठी विरोध केला होता. “तुमच्या अडचणी समजून घेऊ, त्यांचं म्हणणं मांडावं. विरोधाला विरोध करु नका. प्रकल्प किती महत्त्वाचा आहे हे सांगण्यासाठी आलोय, रिफायनरीला मोठ्या संख्यने समर्थन आहे,” असं निलेश राणे यावेळी म्हणाले.
Ratnagiri News : रत्नागिरीमधील भाट्ये समुद्रात बोट बुडाली. या बोटीवरील दोन खलाशी बेपत्ता तीन खलाशांना वाचवण्यात यश आलं आहे. बेपत्ता झालेल्या दोन जणांचा आद्यपही शोध सुरु आहे. ही बोट मासेमारीसाठी निघाली होती.
Mumbai News: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर जे. जे. रुग्णालयात दाखल, प्रकृती अस्वास्थयामुळे रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती
Bhandara News : कोळसा भरलेला ट्रक आणि जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना भंडारा तुमसर राज्यमार्गावरील खापा इथे घडली. अपघातात मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. अपघातात बोलेरो वाहनाचा दर्शनी भाग पूर्णत: चेंदामेंदा झाला असून इथे बोलेरो वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर कोळसा भरलेला भरधाव ट्रक चक्क महार्गालगत असलेल्या धानपिकाच्या शेतात शिरल्याने दोन्ही मालवाहू वाहनाचे चालक जखमी झाले आहेत. वाहनचालकांनी मार्गावरील खड्डे वाचवण्याच्या नादात आणि राज्यमार्गालगत असलेल्या राईस मिलमधील ट्रकच्या रांगा संबंधित अपघातास कारणीभूत असल्याचे सांगितलं जात आहे. जखमी दोन्ही वाहनाचा चालकांना तुमसर इथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनास्थळी तुमसर पोलीस दाखल होत घटनस्थाळाचा पंचनामा करुन पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.
Mumbai News : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खुशखबर आहे. एसटी महामंडळाकडून यंदा कोकणात जाण्यासाठी 2 हजार 310 गाड्या सोडण्यात येणार आहेत. अतिवृष्टी, दरड कोसळणे अशा घटना घडल्यास अथवा रेल्वे प्रवासात अडचणी निर्माण झाल्यास कोकणातील प्रमुख स्थानकात 100 अतिरिक्त गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. महाड, चिपळूण आणि रत्नागिरी इथे महामंडळाकडून आपत्कालीन परिस्थितीसाठी 100 अतिरिक्त गाड्या ठेवण्यात येतील.
Aurangabad News : औरंगाबाद पैठण तालुक्यातील ढाकेफळ हे गाव धरणग्रस्त असून, गावापासूनच येलगंगा नदी वाहते. गावातील बहुतांश शेतकऱ्यांची शेतजमीन नदीच्या पलिकडे आहे. मात्र, या नदीत जायकवाडी प्रकल्पाचे पाणी येत असल्याने वर्षांतील सहा महिने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना नदीपलिकडील शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या भागात ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने असून, कारखान्याला ऊस देण्यासाठीही त्यांना कसरत करावी लागते. सध्या नाथसागर प्रकल्पात 95 टक्क्यांवर जलसाठा झाला आहे. त्यामुळे येलगंगा नदीपात्र दुथडी भरुन वाहत आहे. शेतात खते, फवारणीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना तराफ्याचा आधार घेत शेत गाठावे लागत आहे.
Mumbai Half Marathon : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आज मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे हाफ मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी या हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली. या मॅरेथॉनमध्ये 13 हजार 500 हून अधिक धावपटू सहभाग नोंदवला, ज्यात भारतीय नौदलाचे 2000 हून अधिक धावपटूही सहभागी झाले होते. 4 हजार धावपटू 21 किमी, 7000 धावपटू 10 किमी आणि 2500 धावपटू 5 किमी धावले. “मागील दोन वर्षे सगळ्यांसाठीच खूप आव्हानात्मक होती, तरीही आजच्या हाफ मॅरेथॉनमध्ये 13 ते 14 हजार जणांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे या शर्यतीत भारतीय नौदलाचे 2000 हून अधिक जवान सहभागी झाले आहेत. आजच्या या शर्यतीत 75 टक्के पुरुष आणि 25 टक्के महिला सहभागी झाल्या आहेत. मला असं वाटतं की, आपल्याला एक बदल हवा आहे जिथे खेळांची आवड असणारे लोक जास्त आहेत पण त्यांनी खेळात देखील भाग घेतला पाहिजे. बजाज आलियान्झ लाईफ इन्श्यूरन्सने आज मुंबई हाफ मॅरेथॉनचे आयोजन केलं, मी त्यांचं अभिनंदन करतो. मागील दोन वर्षे लोकांचं लक्ष त्यांच्या तब्येतीकडे होते, पण तरीही लोकांनी हार मानली नाही, बरेच लोक जिमला जायचे होते, परंतु केवळ जिमच नाही तर लोकांनी फ्री हँड एक्सरसाईज देखील करायला हवी, अशी प्रतिक्रिया यावेळी सचिन तेंडुलकरने यावेळी दिली. तसंच आशिया चषकासाठी भारतीय खेळाडूंना त्याने शुभेच्छा देखील दिल्या.
 
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड आणि मंडणगड या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आजी-माजी आमदार समोरासमोर उभे ठाकले आहेत. दहीहंडीसाठी बक्षिसाची रक्कम वाढवली, त्यापेक्षा विकास कामासाठी माझ्यापेक्षा एक रुपया तरी जास्त आणून दाखवा, असं खुलं चॅलेंज शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना दिलं आहे. दापोली दहीहंडी उत्सवादरम्यान त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना हे खुलं आव्हान दिलं आहे. शिवाय, कोकणाला उद्योगमंत्रीपद मिळालं असून आपल्या तालुक्यात आणखी एक मिनी एमआयडीसी लवकरच उभी राहणार असल्याचं कदम यांनी बोलून दाखवलं आहे. 
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी…  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
आरे मेट्रो कारशेडला विरोध: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर आज काँग्रेसचे आंदोलन
Aarey Mumbai Metro Car Shed : मुंबई
मेट्रो कारशेडचं आरे जंगलात सुरु असलेलं काम थांबवावे यासाठी आता राजकीय पक्ष मैदानात उतरत आक्रमक भूमिका घेत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी पर्यावरणप्रेमींसोबतच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातील सत्तेतून महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आरेतील मेट्रो कारशेडचे काम सुरू करण्यावरील बंदी हटवली. महाविकास आघाडीच्या सरकारने आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती. आरेऐवजी कांजूर येथे कारशेड उभारण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या होत्या. 
‘हे गद्दारांचं सरकार आहे, त्यामुळे हे कोसळणारच’ आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर टीका
Aaditya Thackeray :  हे सरकार म्हणजे गद्दारांचं सरकार आहे, बेईमानांच सरकार घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच अशी टीका
आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर काल जळगावात केली. शिवसेनेला संपवण्याचाच नव्हे तर ठाकरे कुटुंबीयांना संपवण्याचा घाणेरडे राजकारण सध्या महाराष्ट्र सुरू आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबालायुक्त पडून देऊ नका आम्हाला सांभाळून घ्या असं भावनिक आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनतेला केल्याचं पाहायला मिळालं. बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात आदित्य ठाकरे यांची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होते, मात्र यावेळी या सर्व गद्दारांनी मस्ती करत महाराष्ट्राची लाज घालवली असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिंदे गटात सहभागी बंडखोर आमदारांवर केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी माझा भाषण नीट ऐकलं नाही किंवा त्यांना समजलेलं नाही!
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून यापूर्वीच रणशिंग फुंकले आहे. आज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सत्कार कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जोरदार पलटवार करत घणाघात केला. फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली दिल्याचा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला. आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंनी माझा भाषण नीट ऐकलं नाही किंवा त्यांना समजलेलं नाही असे म्हटले आहे. मी एवढंच सांगितलं की बाळासाहेबांनी मुंबईसाठी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न त्यांच्याच लोकांनी चुरचूर केला आहे, पायदळी तुडवल आहे. ते फक्त भ्रष्टाचारामध्ये गुंतून राहिले आणि स्वप्न पूर्ण करू शकले नाही. 

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर, पूर आणि भूस्खलनात 22 जण ठार, अनेक जण बेपत्ता
Himachal Pradesh Landslide : हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे भूस्खलन झाले. राज्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पूर आणि ढगफुटीच्या घटनांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण बेपत्ता झाले. तर 12 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) कांगडा, चंबा, बिलासपूर, सिरमौर आणि मंडी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. राज्याचे आयएमडीचे उपसंचालक बुई लाल म्हणाले, “पुढील 5 दिवसांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. संपूर्ण राज्यात पुढील 12 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, 24 ऑगस्टपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Shivsena : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता 
ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू करण्याची सरकारची मागणी
UPI : यूपीआय किंवा डिजिटल पेमेंटवर कोणतंही शुल्क लावण्याचा विचार नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
Nagpur : राष्ट्रवादीने अनिल देशमुखांचा राजकीय वारसदार निवडला? सलील देशमुखांची काटोल मतदारसंघात सक्रियता
IND vs ZIM, Head to Head Record : भारत-झिम्बाब्वे सामन्यांमध्ये कोणाचं पारडं जड? कसा आहे आजवरचा इतिहास?

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares