अभिमान: 90 टक्के भारतीयांना आपला देश भावतो; वाटते, अण्वस्त्रे वाढली पाहिजेत, अमेरिकी थिंक टँकच्या अहवालात द… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अमेरिकन लोकांना आपल्या देशाविषयी उच्च स्तरावरील विश्वास आहे, त्याला ‘अमेरिकन एक्सेप्शनलिज्म’ असे म्हणतात. पण भारतीय लोकांच्या आत्मविश्वासाने यालाही मागे टाकले आहे. अमेरिकन थिंक टँक स्टिमसन सेंटरच्या ताज्या सर्वेक्षणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार,90% भारतीयांचा असा विश्वास आहे की भारताची स्थिती इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगली आहे.
सर्वसाधारणपणे अमेरिकन लोकांना इतरांपेक्षा अधिक राष्ट्रवादी मानले जाते. 2014 मधील एका सर्वेक्षणात अशा प्रश्नांवर 70% अमेरिकन लोकांनी सांगितले की त्यांचा देश सर्व बाबतीत चांगला आहे. यानंतर ‘अमेरिकन एक्सेप्शनलिज्म’ ही कल्पना प्रचलित झाली. सर्वेक्षणाच्या निकालांचे विश्लेषण करणाऱ्या तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ही कल्पना अमेरिकेत चांगली समजली आहे. पण भारतात त्याचा फारसा शोध घेतला गेला नाही. देशातील 28 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमधील 12भाषांमध्ये सी व्होटर या मतदान संस्थेच्या सहकार्याने स्टिमसन सेंटरने हे सर्वेक्षण केले. यामध्ये 71% लोकांचा विश्वास होता की, पंतप्रधान मोदींनी कोरोना आणि शेतकरी चळवळीसारख्या समस्या चांगल्या हाताळल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, सर्वेक्षणाच्या निकालावरून असे दिसून आले की, मोदी हे कोणत्याही लोकशाही देशातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. सरकारच्या काही निर्णयांवर लोकांमध्ये नाराजी असली तरी लोकप्रियता कमी झालेली नाही. राष्ट्रवादाची ही भावना भारताच्या शेजारी देशांच्या नकारात्मकतेशीही जोडलेली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सर्व्हेत 67% लोकांनी पाकिस्तानबद्दल नापसंती व्यक्त केली. 65% लोकांनी चीनला नापसंत केले. भारत चांगला असल्याची चर्चाही लोकांच्या मनात पक्की आहे. कारण भारत ‘भारताच्या मार्गावर’ चालेल, अशी कल्पना परराष्ट्रमंत्र्यांनी अनेक जागतिक व्यासपीठांवर स्पष्टपणे मांडली. रशियासोबतच्या भागीदारीबाबत भारताने आपली भूमिका जागतिक राजकारणातही जोरदारपणे मांडली आहे.
अतूट विश्वास… युद्ध झाले तर
सेना पाकिस्तानचा पराभव करेल
सर्वेक्षणात लोकांनी देशाच्या लष्करी सामर्थ्यावरही अढळ विश्वास व्यक्त केला. 90% लोकांना खात्री आहे की जर भारत-पाकमध्ये युद्ध झाले तर भारत त्यांचा पराभव नक्कीच करेल. चीनच्या बाबतीत 72% लोक हेच मानतात. जर या दोन देशांसोबत लष्करी वाद झाला तर अमेरिका भारताला पाठिंबा देईल असे 56% सहभागींना वाटते. 59% लोकांचा असा विश्वास आहे की जर चीनशी युद्ध झाले तर अमेरिका आमच्या पाठीशी उभी राहील. भारताने आपल्या प्रतिस्पर्धी देशांपेक्षा अण्वस्त्रे उच्च पातळीपर्यंत वाढवायला हवीत, अशी भूमिकाही लोकांकडून जोरदारपणे मांडण्यात आली, 68% लोकांनी असे मानले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares