लातूर : कारखान्यांकडे ३९ कोटींची एफआरपी थकली – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
कळंब : मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस सरकारमधील राजकीय पक्षाच्या शिवसेना-भाजप आमदारांच्या संबधित असलेल्या साखर कारखान्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे ३९ कोटी रुपये एफआरपी थकली आहे. एफआरपी प्रमाणे बिले द्यावीत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विष्णू काळे यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना कायद्यानुसार ऊस दिल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी अदा करण्याचे बंधन साखर कारखान्यांवर आहे. मात्र, कारखान्यांकडून विविध कारणे पुढे करून एफआरपी थकवली जाते. त्यामुळे राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जावे लागते. अर्थात, आंदोलने टाळण्यासाठी एफआरपी वसुलीच्या प्रक्रियेत साखर आयुक्तालयाची भूमिका मोलाची ठरते. शासनाने साखर सम्राटांचे लाड पुरविणे बंद करून एफआरपी प्रमाणे बिले देण्यास भाग पाडावे. शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे निर्माण झाली आहेत. उस गाळप झाल्यापासून चार आठ महिने उस बिले नसतील तर उसाचे उत्पन्न घेण्यात अर्थच उरत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
या’ कारखान्यांकडे थकली एफआरपी
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वाशी तालुक्यातील साखर कारखान्याने ३ लाख १५ हजार मेट्रिक टन गाळप केले आहे. साखर उतारा ९.२० असून १ हजार ९९३.२५ एफआरपी असून ६ कोटी २ लाख एफआरपी थकली. तसेच रांजणी येथील एनसाई साखर कारखान्याने १२ लाख ६६ हजार मेट्रिक टन गाळप केले असून ११. ८४ आहे. २ हजार ७७५ रुपये एफआरपी असून ९ कोटी १४ लाख एफआरपी व चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याकडे १५ कोटी २८ लाख तर हावरगाव येथील डी. डी. एन. शुगर युनिट दोन कडे २ हजार ३०२ असून ८ कोटी २८ लाख रुपये एफआरपी थकली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares