Long Hair Tips: कमी दिवसात लांब केस हवेत? या ५ टिप्सने १ महिन्यात वाढतील केस – Marathi Hindustan Times

Written by

Monday , 22 August 2022
Sign in
विभाग
मराठीचे तपशील
(1 / 6)

बऱ्याच लोकांना लांब केस आवडतात. येत्या फेस्टिवल सिजनसाठी अनेकांना लांब केस हवे आहेत. जेणेकरून साडी, चुरीदार-कुर्त्यासोबत ते आणखीन छान दिसतील.

(2 / 6)

ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या टाळूवर जे ठेवता त्याचा तुमच्या केसांवर परिणाम होतो, त्याचप्रमाणे तुम्ही जे खातात त्याचाही परिणाम होतो. केसांच्या वाढीसाठी तुम्हाला ते आतून खायला द्यावे लागेल. तुम्ही तुमच्या आहारात संपूर्ण धान्य, नट, मासे, मांस, दूध, एवोकॅडो, ब्रोकोली असे प्रथिनेयुक्त पदार्थ ठेवावेत. तसेच ओमेगा थ्री फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ए, सी, ई, झिंक आणि लोह यांसारखी खनिजे केसांना निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला संतुलित आहाराची गरज आहे.

(3 / 6)

केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केसांना विचारणे खूप महत्वाचे असते. हे टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारते. दिवसातून किमान दोनदा आपले केस पूर्णपणे विंचरून घ्या. पण लक्षात ठेवा की ओल्या केसांवर कंगवा फिरवू नका. उलट त्यामुळे केस गळण्याची समस्या वाढू शकते.

(4 / 6)

मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. आता सकाळी ते पाणी टाकून मेथीची पेस्ट बनवा. पेस्ट बनवताना आल्याचा छोटा तुकडा आणि थोडे पाणी घाला. आता ही पेस्ट गाळून घ्या. त्यानंतर बाहेर येणारे पाणी डोक्याला लावावे. हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे केसांची वाढ होईल तसेच केस रेशमी बनतील.

(5 / 6)

एका सुती कपड्यात १ चमचा मेथी आणि १ चमचा लवंगा ठेवा. आता त्याला बांधा आणि पोटली बनवा. आता हि पोटली कढईवर ठेवून गरम करा आणि हळू हळू टाळूवर लावा. एक पोटली सात दिवस सतत वापरता येते. दररोज ६-७ मिनिटे करा.

(6 / 6)

घरी कॉटन पिलो कव्हर्स वापराताय? मग आता बदला.त्या ठिकाणी सिल्क कापडाचं कव्हरअसलेल्या उशीचा वापर करा. कापसाच्या उशामुळे तुमचे केस त्यातील नैसर्गिक तेल काढून ते कोरडे होतात. केस खडबडीत होतात.

इतर गॅलरीज

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares