कंग्राळीतील विद्युत अदालतीला प्रतिसाद – Tarun Bharat – तरुण भारत

Written by

ग्रामस्थांच्या विविध समस्या सोडविण्याचे अधिकाऱयांचे आश्वासन
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
हेस्कॉम खात्यातर्फे ग्रामीण भागातील नागरिकांना सिंगल फेज व थ्री फेज विजेबद्दल माहिती व येणाऱया अडचणी जाणून घेण्यासाठी शनिवारी कंग्राळी बुद्रुक येथे विद्युत अदालत कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील होत्या.
व्यासपीठावर ग्रा. पं. उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, हेस्कॉम रुरल सबडिव्हीजन अधिकारी चिकार्डे, यमनापूर सेक्शन अधिकारी शिवानंद गलगली, माजी ग्रा. पं. सदस्य हभप भरमा पाटील, पीडीओ जी. आय. बर्गी उपस्थित होते. ग्रा. पं. कर्मचारी यल्लाप्पा पाटील यांनी प्रास्ताविकमध्ये हेस्कॉम खात्यातर्फे आयोजिलेल्या विद्युत अदालत कार्यक्रमाचा उद्देश सांगून मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी हेस्कॉम अधिकाऱयांचे ग्रा. पं. तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
गौंडवाड कैवल्यनगर नागरिकांना प्रकाश कधी मिळणार?
गौंडवाड येथील कैवल्यनगरमधील अनेक रहिवाशांना विद्युत खांब उभारण्यासाठी जागेची परवानगी मिळत नसल्याने येथील लोकांना अंधारातच दिवस काढावे लागत आहेत. तेथील रहिवाशांसाठी भूमिगत विद्युत पुरवठा करुन द्यावा, अशी मागणी ग्रा. पं. सदस्य बाबू दोडमनी, रेखा सुतार, कल्पना पवार यांनी हेस्कॉम अधिकाऱयांकडे केली. यावेळी तक्रारी ऐकून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन हेस्कॉम अधिकारी चिकार्डे व गलगली यांनी दिले.
यावेळी ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, प्रदीप पाटील, सुरेश राठोड, मल्लेशी बुड्री, बाबू दोडमनी, तानाजी पाटील, संध्या चौगुले, अर्चना पठाणे, मेनका कोरडे, भारता पाटील, वंदना चव्हाण, कल्पना पवार, रत्ना व्हन्नपन्नावर, रेखा सुतारसह ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. प्रशांत पवार यांनी आभार मानले.
हेस्कॉमकडून दखल न घेतलेल्या तक्रारींची बरसात
यावेळी उपस्थित नागरिक व शेतकऱयांकडून शिवारातील विद्युत पंपसेटसाठी ओढलेल्या तारा लोंबकळत असतात त्या दुरुस्त करत नाहीत, खंडित वीजपुरवठा केव्हा सुरळीत होणार याबाबत लाईनमनला विचारल्यास उद्धट उत्तरे मिळतात. तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यास भाजीपाल्यासाठी पाणी सोडण्यात व्यत्यय येतो. वरील समस्या लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. अशा तक्रारी यावेळी मांडल्या.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares