धक्कादायक! विधानभवनासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर रॉकेल ओतून घेतले पेटवून – Dainik Prabhat – Dainik Prabhat

Written by

मुंबई : राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात येत आहे. तर दुसरीकडे विधानभवानाबाहेर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित व्यक्ती साताऱ्यातील कांदळगावचा शेतकरी असून त्यांनी व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी विधीमंडळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. विधानभवनाबाहेर अंगावर रॉकेल ओतून घेतल्यानंतर त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. दरम्यान, या घटनेनंतर  घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली त्यामुळे अनर्थ टळला. तसेच देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतीच्या वादातून हा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळत आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. तसंच शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दाही सध्या गाजत आहे. आ
ज पुन्हा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात निदर्शने केली. ‘ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत करा..’अशा घोषणा देत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.
ईपेपरराशी-भविष्यकोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

Copyright © 2022 Dainik Prabhat
Login to your account below
Please enter your username or email address to reset your password.source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares