नाशिकच्या कल्याणीचे संशोधन ठरतेय कांदा उत्पादकांसाठी वरदान, कांदा सडतोय सांगणारे शोधले उपकरण – Lokmat

Written by

Lokmat Sakhi
नाशिकच्या कल्याणीचे संशोधन ठरतेय कांदा उत्पादकांसाठी वरदान, कांदा सडतोय सांगणारे शोधले उपकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 05:57 PM2022-08-22T17:57:36+5:302022-08-22T18:30:36+5:30

शेतकऱ्यांच्या आणि विशेषत: कांदा उत्पादकांच्या समस्या अनेक आहेत. कांद्याच्या भावातील चढ उतार सर्वांनाच माहिती आहे. मात्र, त्या पलिकडे साठवण केलेला कांदा सडणे ही शेतकऱ्यांची आणखी एक बिकट समस्या आहे. बाहेरील वातावरणाचा चाळीत साठवलेल्या कांद्यावर परीणाम होतो आणि त्यामुळे कांद्याचे नुकसान होते. मात्र, कांदा सडत असतानाच शेतक-यांना कळाल्यास असा सडणारा कांदा बाजुला ठेवून अन्य कांदा सडण्यापासून वाचवता येऊ शकतोे. त्यासाठीच नाशिकच्या एका युवा अभियंता असलेल्या कल्याणी शिंदे यांनी संशोधन करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या गोदाम इनोव्हेशन्स या स्टार्टअपने शेतक-यांना मदत झाली आहेच, ग्रामीण भागातील युवतीही संशोधनात मागे नाही आणि सर्वसामान्यांना उपयुक्त असे संशोधन त्या करू शकतात हेच सिध्द केले आहे. कल्याणीचं हे अनोखं काम शेतकऱ्यांना मदत तर करते आहेच पण ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्रश्न कसे कमी होऊ शकतात याचं एक उदाहरणही आहे.

नाशिक जिल्हा कांद्याच्या उत्पादनासाठी परीचीत आहे. त्यातही निफाड तालुक्यातील लासलगावची बाजारपेठ ही आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी
बाजारपेठ मानली जाते. याच लासलगावच्या शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या कल्याणीने हे संशोधन केले आहे. कांद्याचे भाव कधी वाढतील आणि कधी कोसळतील
याचा अंदाज नसतो. कांद्याच्या लागवडीपासून त्याची पूर्ण वाढ होईपर्यंत साधारणत: चार महिने कालावधी जातो. त्यानंतर सहा ते आठ महिने तो
गोदामांमध्ये साठवला जातो. त्याच ठिकाणी कांदा सडतो. वातावरणातील बदलामुळे ४० ते ५० टक्के कांदा सडल्याचे प्रकार अनेकदा होत असल्याने
कल्याणी शिंदे यांनी त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवलं आणि त्यात त्यांना यशही मिळालं.
अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असताना कल्याणीची निवड टाटा कंसल्टन्सी सर्व्हीसेसच्या नाशिकमधील डिजीटल इनक्युबेशन सेंटर मध्ये झाली. त्याचवेळी
कांद्याच्या समस्येकडे तिचे लक्ष वेधले गेले होते.वय केवळ २३ वर्षे, पण आपल्या अवतीभोवतीच्या समस्यांची जाण, कळकळ आणि संशोधनासाठी लागणारी मेहनत-जिद्द यासह कल्याणीने आपल्या कामाला गती दिली.

कल्याणीने शोधलेल्या early -stage startup leverages Internet of Ting(IoT) technology तंत्रज्ञानामुळे सडलेल्या कांद्यातून बाहेर पडणारे गॅस शोधून त्याची पूर्वकल्पना देऊन शेतकऱ्यांना सावध केले जाते.
८० टक्के शेतकऱ्यांकडे पारंपारीक साठवण गोदामे आहेत. मात्र कल्याणीने विकसीत केलेले आयओटी उपकरण बसवल्यास कांदा सडू लागला तर त्याची त्वरित आणि आगाऊ कल्पना शेतकऱ्यांना मिळते. शेतकरी हा सडणारा कांदा बाहेर काढत असल्याने उर्वरीत कांदा सडत नाही. त्यामुळे साठवलेला कांदा
सडण्याच्या प्रमाणात २० ते २५ टक्के घट होते.  कल्याणीने आपले संशोधन सिध्द केल्यानंतर लासलगावच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना ही सेवा उपलब्ध करून दिली.

२०१८ मध्ये त्यांनी संशोधन केल्यानंतर कोरोना संकट आड आले परंतु आतापर्यंत २५० डिव्हाइस त्यांनी लावले आहेत. आणि १५०० टन पेक्षा जास्त कांदा त्याद्वारे मॉनिटर केला जातो. कल्याणी यांच्या संशोधनाची दखल घेऊन डीओजीआर, एनएएफईडी आणि नाबार्ड या केंद्रशासनाच्या अंगीकृत संस्थांनी या तंत्रज्ञानासंदर्भात त्यांना भागीदारी केली आहे.
खरंतर इंजिनिअर  झाल्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी सहज मिळू शकली असती पण नोकरी न करता शेतीला उपयुक्त संशोधन करून त्यात करीअर करण्याचे कल्याणीने ठरवलं. ते अर्थात सोपं नव्हतं. बरीच आव्हानं होती. कुटूंबांचे मनही वळवावे लागले. मात्र, आता त्यांच्या संशोधनाची सर्वत्र चर्चा होत आहे. 
कल्याणीचा संपर्क : Kalyani@godaaminnovations.com
What is Tomato Flu : वेगानं पसरणाऱ्या टोमॅटो फिव्हरचा जास्त धोका कोणाला? समजून घ्या लक्षणं, उपाय
गणपतीसोबत गौराईंच्या खरेदीची लगबग सुरू आहे? गौरीच्या दागिन्यांचे एक से एक पर्याय…
How to Make Clothes Smell Good : कुबट वास येऊ नये म्हणून  कपडे धुताना ५ वस्तू वापरा; कपड्यांना नेहमी येईल सुंगध
How to Sleep Fast in 5 Minutes : डोक्यात सतत विचार, रात्री लवकर झोपच येत नाही? ५ उपाय करा, पडल्या पडल्या शांत झोपाल
पावसाळ्यातल्या संसर्गजन्य आजारांना दूर ठेवणाऱ्या गुणकारी रानभाज्या, यंदा खा-बघा ५ फायदे
फक्त १० रुपयांत आणि १० मिनिटांत मिळेल उजळ- चमकदार त्वचा, करा शुगर स्क्रबचा जादुई उपाय
बाप्पासाठी घरच्याघरी सुटसुटीत डेकोरेशन करायचे तर ७ सोप्या आयडीया…सुंदर आणि स्वस्त-मस्तही!
पाेटावरची चरबी कमी करणारे ८ पदार्थ, बेली फॅट नको असेल तर हे पदार्थ नियमित खा
जन्माष्टमी सोहळ्याचा देखावा कसा करावा समजेना? बघा काही खास टिप्स आणि सजवा तुमचा लड्डूगोपाल
How to Clean Brass Utensils : तांब्या पितळाची कळकट भांडी झटपट होतील चकचकीत; 5 टिप्स, पुजेची भांडी पटकन चमकतील
घरच्या घरी Summer Facial कसे करायचे | Skin Lightening Tomato Facial at Home | Lokmat Sakhi
Dark Circles कायमस्वरूपी घालवण्यासाठी ३ घरगुती उपाय | Get Rid Of Dark Circles |Dark Circle Treatment
गुलाबी गालासाठी लावा गाजराचा फेस पॅक | Skin Whitening Home Remedies | Skin Whitening Face Pack
झटपट केस वाढवण्यासाठी ग्रीन टीचा रामबाण उपाय | Home Remedies for Faster Hair Growth | Lokmat Sakhi
चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा फेस सीरम | Homemade Face Serum for Glowing skin | Lokmat Sakhi
चेहऱ्याच्या समस्यांवर दह्याचे ४ घरगुती फेस पॅक | Curd Face Pack for Skin Whitening | Curd Face Pack
चला जाऊयात पेंच व्याघ्र प्रकल्पात | Pench Tiger Reserve | Pench Tiger Reserve Nagpur | Lokmat Sakhi
चेहऱ्यावर खाज येत असेल तर करा हे उपाय | 3 Best Home Remedies for Itchy Skin | Itchy Skin Remedies
कोरड्या केसांसाठी Easy Hair Mask | Dry Hair Mask Home Remedies | Hair Mask for Dry Frizzy Hair
उरलेल्या कापडा पासून बनवा Trending Kaftan Top | Kaftan Top Designs | Cutting and stitching of Kaftan
Allu Arjun Video: “ये तिरंगा है, कभी झुकेगा नहीं”, अल्लू अर्जुनच्या डायलॉगने जिंकली भारतीयांची मनं
'बॉयकॉटने माझे आयुष्य संपणार नाही, माझ्याकडे खूप काम आहे'; बॉयकॉट ट्रेंडवर अनुराग स्पष्टच बोलला…
PHOTOS: सोनम कपूरच्या लेकाचा पहिला फोटो आला समोर, बाळाला पाहताच मावशीला कोसळलं रडू
देशात ‘सुपरफ्लॉप’ ठरलेल्या ‘Laal Singh Chaddha’नं विदेशात केली कमाल; वाचा, वर्ल्डवाइड बिझनेस
जयवंत वाडकर यांच्या लेकीनं जिंकला ‘मिस पर्सनॅलिटी’चा खिताब, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares