भात खरेदीचा बोनस द्या – वैभव नाईक – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
swt२२२५.jpg
४४९५५
मुंबईः भाताला बोनसची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना आमदारांनी विधानभवनासमोर आंदोलन केले.
भात खरेदीचा बोनस मिळावा
आमदार वैभव नाईक यांची मागणी; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ः भाताला बोनसची रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी ‘भात खरेदीचा बोनस द्या’,‘शेतकऱ्यांना न्याय द्या’ची घोषणाबाजी केली.
राज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आली; मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना भात खरेदीच्या वरती देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम मिळालेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो शेतकरी आज बोनसच्या रकमेपासून वंचित आहेत. लवकरात लवकर शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळावी, या मागणीसाठी आज आमदार नाईक यांच्यासह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
कोकणातल्या शेतकऱ्यांना भात खरेदीचा बोनस द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी आमदार नाईकांसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली. यावेळी जोरदार घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला. राज्याच्या माध्यमातून भात खरेदी केंद्रे निश्चित करून शेतकऱ्यांकडून उच्चांकी भात खरेदी केली आहे. भाताला क्विंटलमागे एकूण १९४० रुपये दर देण्यात आला. शेतकऱ्यांच्या भाताला दर वाढवून देण्यासाठी आमदार नाईक यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या भाताला १९४० रुपये वाढीव दर व ७०० रुपये बोनस रक्कम देखील देण्यात आली. गतवर्षीपेक्षा जास्त दर यावर्षी देण्यात आला; मात्र सरकार बदलल्याने बोनसची रक्कम अद्याप जाहीर केलेली नाही. कोकणात भातशेती मोठ्या प्रमाणावर होते. या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळणे गरजेचे असून, लवकरात लवकर ही रक्कम मिळावी, यासाठी आंदोलन केल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares