Hindu Rituals : हिंदू धर्मात महिला पूजेचा नारळ का फोडत नाहीत? 'ही' आहेत कारणे – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 17 Jun 2022 10:33 AM (IST)
Edited By: ज्योती देवरे
Hindu culture
Hindu Rituals : विशेष पूजा, यज्ञ, हवन आणि अनेक शुभ कार्ये नारळाशिवाय अपूर्ण मानली जातात. पण स्त्रिया पूजा किंवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ फोडू शकत नाहीत. ही परंपरा नवीन नसून अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. स्त्रिया पूजेत नारळ देऊ शकतात, तेव्हा त्या तो का फोडू शकत नाहीत? शेवटी महिलांना नारळ फोडता येत नाही असे काय आहे? याचे कारण जाणून घेऊया.
‘या’ कारणांमुळे महिला नारळ फोडत नाहीत
-पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन वस्तू आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात.
-नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे निवासस्थान मानले जाते. तीन देवतांच्या उपस्थितीमुळे नारळ महिलांपासून दूर ठेवला जातो.
-नारळ हे भगवान विष्णूने पृथ्वीवर पाठवलेले फळ मानले जाते. जो देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच देवी लक्ष्मीशिवाय कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही.
-नारळ हे बीजस्वरूप मानले जाते आणि स्त्री बीजस्वरूपात अर्भकाला जन्म देते, म्हणून महिलांनी नारळ फोडू नये असे मानले जाते.

महिलांना गर्भधारणेत समस्या येतात
असं म्हटलं जातं की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येतात. एकेकाळी विश्वामित्रांनी भगवान इंद्रावर कोपून वेगळा स्वर्ग निर्माण केला होता आणि त्यानंतरही महर्षींचे समाधान झाले नाही, तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम मानवाच्या रूपात नारळ बनवला, अशी धार्मिक धारणा आहे. ज्या नारळाला मानवी रूप देखील मानले जाते. नारळात तीन डोळे बनतात, या तीन डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप मानले जाते असे शास्त्रात मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 
हेही वाचा :
 
 
 
 
 
Shani Dev: निराधारांचा आधार बना, ‘शनिदेव’ उघडतील तुमच्या नशिबाचे कुलूप!
Surya Grahan 2022: वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचा या दिवाळी आणि गोवर्धन पूजेवर काय परिणाम होईल? जाणून घ्या
Horoscope Today, August 23, 2022 : मेष, कर्कसह ‘या’ राशींसाठी दिवस ठरणार फलदायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Ekadashi Born Girl : एकादशी तिथीला जन्मलेल्या मुली भाग्यवान असतात, लक्ष्मीची कृपा राहते
Astrology :  31 ऑगस्टपर्यंत ‘या’ राशींचे भाग्य चमकेल, शुक्राच्या कृपेने होणार धनवान!
Bhavna Gawali : आम्हाला गद्दार म्हटलं जातं, पण शिवसेना आमच्या बापानं उभी केली; भावना गवळींचा उद्धव ठाकरेंना टोला
चर्चित ‘रामटेक’ला मंत्री मिळाला, बंगल्यात आतापर्यंत कोण कोण राहिलं? त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली?
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअप यात्रेचा 26 ऑगस्टपासून शुभारंभ
Maharashtra Political Crisis : नबाम रेबिया केसच्या निकालामध्ये प्रथमदर्शनी विरोधाभास, या 11 मुद्द्यांवर होणार निवाडा
Mumbai Police : मुंबई पोलिसांना 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागे कतारमधील अनिसचा हात, गृहमंत्र्यांनी घेतला तपासाचा आढावा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares