Maharashtra Monsoon Assembly Session 2022 : पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने सरकारने मदत द्यावी- अजित पवार – My Mahanagar

Written by

You subscribed MyMahanagar newsletter successfully.
Something went wrong. Please try again later.
दीपक केसरकरांना शालेय शिक्षण मंत्री दिल्याने मला सुखद धक्का बसला; आदित्य ठाकरेंची विधानसभेत टोलेबाजी
शेतकऱ्यांना छत्रपती शिवरायांची शपथ देत आत्महत्या न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा गदारोळ
शेतकऱ्यांच्या मदतीवरून विधानसभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी; विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा सभा त्याग
शक्ती कायदा मंजूर करण्यासाठी दिल्लीत पाठपुरावा करणार; देवेंद्र फडणवीस यांचे विधान परिषदेत आश्वासन
विधानपरिषदेची विशेष संपली
विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची आज संध्याकाळी 5:30- 6:00 अशी बैठक होणार आहे. अशी अजित पवार यांनी दिली आहे.
50 – 50 बिस्किट हातात घेऊन विरोधकांची ’50 – 50 चलो गुवाहाटी’ विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
आले रे आले गद्दार आले, विरोधकांची घोषणाबाजी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधीपक्ष नेत्यांचे आंदोलन
विकास कामांना स्थगिती देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो
50 खोके खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके,
ओला दुष्काळ जाहीर करा, नाही तर खुर्ची खाली करा,
ईडी सरकार हाय, हाय, सीबीआय सरकार हाय, हाय
जाहीर करा, जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा, विरोधकांची सरकारकडे मागणी
पोलिसांनी पीडितेला शोधण्याचा प्रयत्न करायला हवा होता, बेजबाबदार पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
पीडितेने पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत महिला पोलिसांना कल्पना दिली नाही, खाण्यासाठी पोलीस स्थानकातून बाहेर पडल्यानंतर पीडितेसोबत घडला प्रसंग – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
भंडारा – गोंदियातील सामुहिक बलात्काराची घटना लाजिरवाणी- उपमुख्यमंत्री
भंडाऱ्यातील सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सादर केले निवेदन
सातव्या वेतन आयोगानुसार यांना पगार देतो, निलंबित करा, चुकीच्या उल्लेखावरून अजित पवार यांनी अधिकारी अभिमन्यू पवार यांना झापले
मुंबईतील खड्ड्यांबाबत बोलताना आमदार योगेश सागर यांचे आक्षेपार्ह वक्तव्य
मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुढील 2 वर्षात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे शोधून सापडणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात विभानसभेत चर्चा सुरु
गोविंदाच्या मृत्यूची किंमत पैशात मोजली, अंबादास दानवेंचे शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र
मुंबईतील संदेश दळवी या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू
विधानसभेच्या कामकाजास सुरुवात
पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत पुरवावी, पूरग्रस्तांच्या समस्या आज सभागृहात मांडणार असल्याचे मत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडले.
ते अधिवेशनापूर्वी विधानभवन परिसरात आज माध्यमांशी बोलत होते.
यावेळी जखमी गोविंदांना सरकारने मदत करण्याची मागणी करत गोविंदाच्या मृत्याचा मुद्दाही सभागृहात मांडणार असल्याही मत त्यांनी मांडले.
अजित पवार लाईव्ह
शेतकरी वर्गाचं अतोनात नुकसान झालं, आज पण बरेच लक्षवेधी आहेत
– अजय चौधरी यांनी पण एक मुद्दा मांडला की काही गोविंदा जखमी आहेत त्यांना मदत करावी
– किमान सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या पाहिजे
– मुख्यमंत्री असताना अध्यक्ष यांवर लक्ष टाकू
– पूरग्रस्तांबदल जे काही प्रश्न आहे तर त्या सगळ्यावर बरीच चर्चा झाली आहे
– सगळ्यांचं एकमत नुकसानावर झालं आहे
– शेतकरी पुन्हा उभा कसा राहील याबाबत चर्चा
– आता सरकार यावर काय मदत जाहीर करेल माहित नाही
– आमदारानीं दिलेल्या मागण्यावर न्याय कसा मिळेल यावर चर्चा होईल
– मेळघाटमध्ये 18 तारखेला जे घडलं त्यावर चर्चा केली
– आज त्या चर्चेला आज उद्या वेळ मिळेल
– आज महाविकास आघाडी सरकारची बैठक आहे
– 5:30- 6:00 वाजता ही बैठक आहे
– माझं मत आहे वैयक्तिक कोणीही टीका करू नये
 
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या कामकाजाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांकडून पूरस्थिती, किटकनाशकांमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, विलेपार्लेतील गोविंदाचा मृत्यू, रस्त्यांची दुरावस्था या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारले जाणार आहेत.
 
ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares