Maharashtra News Live Update : हिंदुत्वाचे विचार, बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे गद्दार की हे गद्दार… – TV9 Marathi

Written by

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
Aug 23, 2022 | 5:33 PM
राज्यपाल
– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एक ख्याती आहे,
– विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या माध्यमातून इतर महाविद्यालयांना त्याचा फायदा होतो,
– तंत्रज्ञान आज रोज बदलत आहे, त्यामध्ये आपण अपडेट असणं गरजेचं आहे
– महाराष्ट्र सर्व दृष्टिकोनातून अग्रेसर आहे, देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केलं आहे
– शिक्षकांनाही ध्यान देण्याची गरज आहे
– आताचे विद्यार्थी खूप जिज्ञासू आहेत
श्रीकांत शिंदे
भावना गवळींचं शक्ती प्रदर्शन नव्हतं ते लोकांचं प्रेम आहे
भावना गवळींच्या मागे प्रचंड जनता आहे
याच्याबद्दल राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
शिवसेनेच्या खासदाराच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करेल
भावना गवळी च्या सर्व गोष्टी न्याय प्रविष्ट आहे
न्यायालयाने त्याना दिलासा दिला असेल तर स्वागत आहे
ऑन पहिला मेळावा
शिंदे गट नाही शिवसेनेचे खासदार आले होते
भावना गवळींनी बोलवलं, आम्ही आलो
येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सरकारच्या माध्यमातून सरकारचे काम पोहचविण्याचे काम पुढच्या 2 वर्षात होईल
ऑन आदित्य ठाकरे 5050
मला वाटलं लोकांना या गोष्टीत रस राहिला नाही
लोकांसाठी काय केलं, काय करू शकतो तो उवापोह महाराष्ट्राच्या लोकांसमोर केला पाहिजे
त्या पायऱ्यावरती 50-50 गद्दार खोके हे म्हणून चालणार नाही
अडीच वर्षे तुम्ही काय केलं याचा लेखा जोखा द्या
भावना गवळी ऑन राज ठाकरे
राज साहेब यांनी ही जे मागणी केली महिलांची बाजू राज साहेबानी उचलून धरली मी त्याच अभिनंदन करेल
ऑन आदित्य
त्या गोष्टीला महत्व देत नाही
शिंदे साहेबानी हिंदुत्वाचे सरकार आणले आहे विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या
बचतगटाचे प्रश्न शिंदे साहेब समोर मांडणार आहो
नवी दिल्ली शरद पवार
आज देशातील लोकांमध्ये संभ्रम आहे
भाजप आणि नेत्यांजवळ आज बहुमत आहे, पण हे उचित बहुमत नाहीये
देशातील अनेक राज्यांत भाजपची सत्ता नाही, जिथं नव्हती तिथं आणली गेली
ईडी, सीबीआय यांना सोबत घेऊन सध्या काम केलं जातं आहे
15 ऑगस्टला पंतप्रधान यांचे भाषण, त्यांनी महिला सन्मानबाबत वक्तव्य केलं, पण 2 दिवसांत गुजरातमध्ये काय झालं ?
अनिल देशमुख मेहनत करणारे गृहमंत्री होते
शिक्षणासाठी 100 कोटी घेतले, तरी त्यांच्यावर चार्जशीट दाखल केलं, नंतर ती रक्कम 4 कोटी झाली, नंतर 1 कोटी झाली
नवाब मलिक यांची काय चूक होती ? 20 वर्षांपूर्वी काही व्यवहार झाला होता
संजय राऊत यांना अटक झाली, ते विरोधात लिहीत होते, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली
या पद्धतीने देशात आज कारवाया केल्या जात आहेत
देशात आज सत्तेचा गैरवापर केला जातोय
नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक
राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात
नवी दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक सुरू
अमरावती
मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही; ना बाप ना भैय्या सबसे पैसा रुपया हे या मतदारसंघाच्या आमदाराचं स्लोगण आहे
मी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत छातीठोकपणे उभा आहे
नाव न घेता रवी राणांची अप्रत्यक्षपणे बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका
रुपया म्हटलं तर गुवाहाटीला जावे लागते
सरकारमध्ये असलेल्या रवी राणांची बच्चू कडू यांच्यावर टीका
श्रीकांत शिंदे
कॉग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे गद्दार की आम्ही गद्दार
सावरकरांचे विचार कॉग्रेस राष्ट्रवादीसाठी गुंडाळवून ठेवले मग गद्दार कोण
मुंबई कोणाची बाळासाहेबांची, याच मुंबईत अजाण स्पर्धा भरवली जाते गद्दार कोण
दाऊदसोबत संबंध असलेले मंत्री, मग गद्दार कोण
गद्दार कोण हिंदुत्ववादीचा विचार घेऊन जाणारे गद्दार का हे गद्दार
हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे गद्दार की हे गद्दार
370 कलम हटविल्यावर आपण आनंद साजरा करू शकलो नाही
मुंबईच्या बाहेर माझी पहिली सभा आहे, यापुढे अशा सभा होतील
वाशिम श्रीकांत शिंदे
हा जिल्हा राजमाता जिजाऊचा जिल्हा खऱ्याची भूमी सत्याची भूमी आहे
शिवसेना भाजप युती झाली आहे ती शेतकरी कष्टकरी सरकार आहे,
मुख्यमंत्री सर्व सामान्यांचा आहे, त्यांना कुठंही भेटू शकतात
लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एका जागी बसत नाहीत
माजी मुख्यमंत्री यांना टोला
काम करण्यासाठी 20 तास काम करतात
50 50 आमदार जेव्हा एकत्र येतात तेव्हा आत्मचिंतन करणे गरजेचे आहे
ते गदार गद्दार खोके इतर बोलत आहे
मातोश्रीचे दरवाजे बंद असे दाखवत आहेत
आज महाराष्ट्र फिरत आहेत पदरात घ्या असे म्हणत आहेत
50 आमदार , 12 खासदार शिंदे साहेबांबरोबर उभे राहिले
हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असे झाले तर याचं चिंतन केले पाहिजे
गदार खंजीर खोके असे शब्द सुरू
हे सगळं म्हणायचं आणि शेवटी म्हणायचं की मातोश्री खुले आहे
आज महाराष्ट्र चे दौरे सुरू आहेत मुंबई पुढे कधी गेले नाही ते आज राज्यभर फिरत आहेत
अनैसर्गिक युती केली तेव्हा हे सगळे गप्प बसले
लोकांनी कार्यकर्ते यांनी अपेक्षा ठेवल्या की माझ्या गावाकडचे काम होतील
मात्र हे सरकार आल्यावर राष्ट्रवादीने आमदारांना दाबण्याचं काम केले
एकाच माणसाचं नाव घेतले जाते निधी देणारा एकनाथ शिंदे
निधी दिल्यावर dpdc मध्ये सुद्धा हे काम थांबवले जाते
256 सीट लढविल्या तर किती निवडून आल्या 56 आहे
का नाही आले जास्त निवडून
शेतकऱ्याचा मुलगा रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकत नाही का
आज शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला
दिघे साहेब गेले तेव्हा ठाणे जिल्ह्यातील शिवसेना संपली
मात्र ती शिवसेना शिंदे साहेबांनी सांभाळली
ज्या माणसांनी 40 वर्ष घातलं त्याच्यावर आरोप करत आहे
शिंदे साहेबांच्या आईचं निधन झालं तेव्हा लोकसभा निवडणूक सुरू होत्या
तेव्हा प्रचार अर्धा सोडलं नाही तो प्रचार झाल्यावर ते आले होते
अजून काय पाहिजे पक्षाला
आज मर्सिडीजमधून शिवसेना वाढू शकत नाही
त्यासाठी रिक्षावाला लागतात पान टपरी वाले लागतात
नवी दिल्ली
7 सप्टेंबरपासून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा
महाराष्ट्रात दोन ठिकाणी होणार जाहीर सभा
नांदेड आणि जळगावमध्ये होणार राहुल गांधींच्या जाहीर सभा
कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा
कोल्हापूर
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी
हत्या प्रकारणातील सर्व दहा संशयितांवार आज आरोप निश्चित होण्याची शक्यता
मात्र सुनावणीला एसआयटी आणि एटीएसचे अधिकारी अनुपस्थित
संशयितांच्या वकिलांकडून तपास यंत्रणांना गांभीर्य नसल्याचा आरोप
तर समीर गायकवाड याची रविवारची हजेरीही एसआयटीने घेतली नसल्याचे कोर्टच्या निदर्शनास दिले आणून
एसआयटीकडून तपास एटीएसकडे वर्ग झाल्यानंतर सुनावणीला कोणीच तपास यंत्रणा हजर नाही
एसआयटीचे अधिकारी कोर्टात उपस्थित ठेवण्याच्या कोर्टाच्या सूचना
नवी दिल्ली
पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचा निर्णय
महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये पश्चिम घाट
केंद्र सरकारच्या निर्णयाने पर्यावरण वाचवण्यासाठी होणार मोठी मदत
अमरावती
अमरावतीनंतर परतवाड्यातही आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीकडून भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन
दहीहंडी स्पर्धेला अभिनेता शक्ती कपूर व अभिनेता श्रेयश तळपदे राहणार उपस्थित
दहीहंडी स्थळी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा दाखल
काही वेळातच दहीहंडी स्पर्धेला होणार सुरवात
मागच्या अडीच वर्षात दिलेली वागणूक न विसरणारी
10 रुपये मध्ये शिवभोजन थाळी
एककिडे कॉंग्रेस नेते मोठ मोठ्या संस्था, शाळा दिल्या
सर्वसामान्य शिवसैनिकला काय दिले झुणका भाकर, शिवभजोन थाळी
मागील सरकारमध्ये लाचारी करावी लागली
वाशिम-भावना गवळींच्या मेळाव्याला सुरुवात,
हिंदुत्वाची मशाल प्रजवलीत करून सुरुवात
बंजारा समाजातील महिलांकडून स्वागत
जळगाव
मुक्ताईनगर बऱ्हाणपूर या महामार्गावर अपघात
आयशर आणि ऍपे रिक्षांची समोरासमोर धडक तीन ठार तर 18 जण जखमी.
शाळकरी विद्यार्थ्यांना वाहून जाणाऱ्या ॲपे रिक्षाचा भीषण अपघात अपघातात दोन विद्यार्थिनी जागे ची ठार तर तीन ते चार विद्यार्थिनी गंभीर
दोन शाळकरी विद्यार्थिनी व चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू
भावना गवळी यांची रॅली पाटणी चौकात …
महिला कार्यकर्ते करणार फुलाच्या पाकळ्या टाकून तसेच फटाके फोडून 250 किलोचा हार घालून  स्वागत केलं..
महिला कार्यकर्ते करणार फुलांच्या पाकळ्या टाकून  तसेच फटाके फोडून 250 किलोचा हार घालून  स्वागत केलं..
भाजपच्या नेतृत्वाने शिवसंग्राम प्रमुख दिवंगत विनायक मेटे यांना मंत्री मंडळात समाविष्ट करण्याबाबत आश्र्वासित केले होते
दुर्दैवाने मेटे साहेबांचे निधन झाले
एकूणच मराठा समाजावर आणि बहुजन समाजावरही शोककळा पसरली
मेटे साहेबांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना राज्यपाल नियुक्त जागांवर विधान परिषदेत संधी द्यावी
पुढील मंत्रीमंडळ विस्तारात ज्योतीताई यांना कॅबिनेट पद द्यावे
तसेच वजनदार खाते मिळावे ही मागणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांच्याकडे मागणी करणार
भाजप निश्चितच ज्योतीताई यांना मंत्रिपद देईल यांची खात्री
पुण्यातील दिघीत रात्रीच्या सुमारास बिबट्या वावरताना नागरिकांच्या मोबाईलमध्ये कैद
डीआरडीओ ऑफिसमध्ये बिबट्या घुसल्याने भीतीचे वातावरण
याबाबत वन विभागाला डीआरडीओकडून कळवण्यात आला असून बिबट्यासाठी शोध सुरू
-नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांदा प्रश्न पेटला
शेतकरी संघटने पाठोपाठ प्रहार शेतकरी संघटना उतरली रस्त्यावर
कांद्याला किमान 3 हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्याची केली मागणी
अध्यक्षांना निर्णय घेऊ द्यावा आणि निवडणूक आयोगाला निर्णय घेऊ द्या हे आज दोन्ही मुद्दे कोर्टानं फेटाळले
कोर्टान काही मुद्दे ठेवले त्यावर घटनापीठात निर्णय होईल
आम्हाला जे अपेक्षित होतं ते आजच्या सुनावणीत झालं
आम्हाला जे अपेक्षित होतं ते सूनावणीत घडलं
दोन दिवसात घटनापीठ स्थापन होतं
गुरुवारी घटनापीठात कोणं असेल हे स्पष्ट होईल
दोन दिवस निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे
आम्हाला कल्पना होती की प्रकरण घटनापिठाकडे जाईल,रमण्णांनी आधीच दिले होते संकेत
आम्हाला विश्वास आहे की आमचा विजय होईल, कारण राज्यात जसा पायंडा सरकार स्थापन करायचा बनलाय तोच सगळीकडे पडेल
सत्याचा विजय होणार
शिंदे काय म्हणतात याला अर्थ नाही कारण आम्ही खरी शिवसेना आहोत,
आम्हाला पक्ष म्हणून अधिकार आहेत
जितेंद्र आव्हाड
मी जे बोललो ते प्रवाशांच्या मनातल बोललो
कळव्यातील प्रवाशांच्या मनात पूर्ण रेल्वे प्रवाशांच्या मनातली भावना होती
आंदोलनाची परिस्थिती संपूर्ण मुंबईत निर्माण झाली
कुठलाही आंदोलन पोलिसांच्या लाठ्यांनी चिरडून काढायचं ही हुकूमशाही पद्धती या सरकारने ठेवली आहे.
गरीब माणसांना परवडेल असा प्रवास पूर्वी होत होता मात्र आता फेऱ्या कमी केल्या
ही आग धगधगते आहे तिला पेटू देऊ नका
Ac चा प्रवास प्रवाशांना परवडत नाहीये, तर का सुरू केला
रेल्वेला मुंबई लोकलमधून रेव्ह्यूणू मिळतोय
नाना पटोलेः
महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्याने विदर्भ आणि अनेक भागातील शेतकरी उद्धवस्त
शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम
भरघोस मदत जाहीर करावी
हे सरकार शेतकरी विरोधी
विधान भवनच्या बाहेर एक शेतकऱ्याने स्वतः ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला
अतिवृष्टीमध्ये विदर्भातील आणि अनेक भागातील शेतकरी उधवस्थ झाला आहे. शेतकरीच्या तोंडाला पानं पुसण्याचा काम केले आहे.  75 हजार हेक्टरी मदत जाहीर करावी. हे सरकार शेतकरीविरोधी आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
वाशिम:
युवासेना जिल्हा प्रमुख रवी भांदुर्गे हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात
दोम महिन्याच्या तटस्थ भूमिकेनंतर शिवसेनेचे वाशीम जिल्हा युवासेना प्रमुख रवी भांदुर्गेंनी घेतली भूमिका
आज आपल्या हजारो युवा सैनिकांसह शिंदे गटात सामिल
हिंदुत्वाच्या विचारसरणीला समर्थन देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भावनाताईंचे गवळी यांचे हात बळकट करण्यासाठी घेतला निर्णय
नागपूरातील लता मंगेशकर हॅास्पिटलमधील इन्टर्न्स डॅाक्टर्सने संप पुकारला
– विद्यावेतन वाढीच्या मागणीसाठी इन्टर्न्स डॅाक्टर्स संपावर
– सरकार आणि हॅास्पिटल प्रशासनाला निवेदन देऊन मागणी मान्य न केल्याने पुकारला संप
– निवासी डॅाक्टर्स नियमित सेवा देत आहे, त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम नाही
कुख्यात चैन स्नॅचिंग करण्याऱ्या चोराला अटक
एक दोन नाही तर 19 गुन्हे उघडकीस
नागपूरसह भंडारा, चंद्रपूरमध्ये करत होता चैन स्नॅचिंग आणि चोरी
तहसील पोलिसांनी केली अटक
शाहीद अली अस आरोपीच नाव
विधान भवनाच्या बाहेर कांदळगावच्या व्यक्तीने केला आत्मदहनाचा प्रयत्न
विधानभवनासमोरच राॅकेल ओतून घेतलं जाळून
मुंबईच्या मड सिल्वर बीचवर दुर्मिळ लॉगरहेड समुद्री कासव जखमी अवस्थेत आढळले
दर्शन मुंबईत दुर्मिळ कासवाची पहिली नोंद
सिल्वर बीच मड मालाड पश्चिम मुंबई या ठिकाणी 17 ऑगस्ट  सकाळी 11 च्या सुमारास प्रमोद धाडगे यांना सिल्वर बीच समुद्र किनारी फेरफटका मारताना सर्वप्रथम  दिसले
एक लॉगरहेड कासव या दुर्लभ जातीचा भला मोठा समुद्री कासव जखमी अवस्थेत दिसला
प्रमोद यांनी शनाचा विलंब न लावता प्राणी मित्र आणि वन्यजीव संरक्षक आनंद मोहिते यांना दिली माहिती
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मृत गोविंदाच्या घरी भेट देणार
विलेपार्लेचा मृत गोविंदा संदेश दळवी यांच्या विद्याविहार येथील घरी सांत्वनपर भेट
वेळ – आज दुपारी 12.15 वाजता
वाढवण बंदर रद्द करा, नाहीतर खुर्च्या खाली करा
पालघरचे माकपाचे आमदार विनोद निकोले यांचे आज बॅनर आंदोलन
या प्रकल्पाला विरोध
आमच्या आदिवासींच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत पण त्याचा मोबदला दिला जात नाहीये
जागा दिली जात नाहीये, त्यामुळे आमचा या प्रकल्पाला विरोध आहे…
– जर काम थांबलं नाही तर येत्या काळात आणखी ऊग्र आंदोलन करू
विधान भवनाच्या पासरिवर आज आंदोलक आक्रमक,
50-50 चे बिस्किटचे पुडे दाखवत केलं आंदोलन
आम्ही फक्त दाखवले शिंदे गटातील आमदारांनी ते घेतले अशी प्रतिक्रिया अदित्य ठाकरेंनी आणि एनसीपीचे प्रतोद अनिल पाटील यांनी दिली
छत्रपती शिवरायांनी कोथळा बाहेर काढला हे सत्य आहे,
शिंदे आणि फडणवीसांचं सरकार जर हा देखावा नकारातमअसेल तर हे कसलं सरकार…
हे सरकार कोसळणार, यांच्यात धूसफुस सुरू आहे…
लवकरच दौरा सुरू होईल, अद्याप उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला नाही
परवाच मोदी पर्व संपलं असं ऊद्धवजी म्हणाले, शिवसैनिक जागेवर, नाकातोंडात पाणी हे शिवसेनाच घालेल..
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष  प्रकरण घटनापीठाकडे जाणं आवश्यक
मात्र आज प्रकरण सुनावणीसाठी घेतलं हे महत्वाचं
कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू कोर्टात मांडतील
मात्र प्रकरण घटनापीठाकडे जाणं आवश्यक आहे
कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र सत्ता संघर्ष सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाने आज 10.37 मिनिटांनी आजच्या याचिकांची यादी जारी केली.
यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची यादीदेखील समाविष्ट करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर यादी येणे नवीन आश्चर्यच.
आज या प्रकरणात न्यायाधीश रमण्णा नवीन बेंच स्थापन करण्याची शक्यता
सोबतच विधी तज्ज्ञांच्या मतानुसार या प्रकरणात घटनापीठाचीदेखील स्थापना केली जाऊ शकते.
मात्र, आज सरन्यायाधीश रमण्णा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती कृष्णमुरारी व्हीसी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित राहणार
काल ते आजारी असल्याने सुनावणी पुढं ढकलण्यात आली
आज सरन्यायाधीशांच्या न्यायालयातील यादीतील याचिकांचे सुनावणी झाल्यानंतरच साधारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होण्याची शक्यता आहे
सत्तासंघर्षाची सुनावणी 3 जणांच्या खंडपीठासमोर होणार
एन. व्ही. रमण्णा मुख्य न्यायाधीश
कृष्ण मुरारी, हिमा कोहली यांच्यासमोर होणार सुनावणी
विशेष खंडपीठासमोर होणार सुनावणी
बारा वाजल्यानंतरचं कामकाज झाल्यानंतर प्रकरण सुनावणीसाठी घेतलं जाईल
– दक्षिण सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा गावात शिरले पाणी
– हिप्परगा तलावाच्या काठावर वसलेल्या 40 ते 50 घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे स्थलांतर
-तळे हिप्परगामधील जनजीवन विस्कळीत
-शेतीचेही प्रचंड नुकसान
शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या अमरावतीमधील गोपाल अरबट यांची शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख पदी निवड
तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांची सहसंपर्क प्रमुख पदी नियुक्ती
एक महिन्यापूर्वी दोघानीही शिवसेनेला केला होता जय महाराष्ट्र
वाशिम :
आज शिंदे गटातील खासदार भावना गवळी यांच तब्बल एका वर्षांनी वाशीम जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन
वाशिममधील वटाणे लॉन येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन
मेळावा व रॅली पूर्वी रिठद येथील संत गजानन महाराज मंदिरात खासदार भावना गवळी यांनी दर्शन घेतले आहे.
रिठद येथे फटाके फोडून बँड वाजवत भावना गवळी याचं कार्यकर्त्यांनी केलं स्वागत…
-सर्वोच्च न्यायालयात विजय आमचाच होणार
– आज जर सुनावणीचा निकाल लागला तर जलोश हा वाशिमच्या मेळाव्यात होईल
– सुप्रीम कोर्टात, निवडणूक आयोगाकडे बाजू भक्कम आहे त्यामुळे या न्यायालयीन लढाई आम्ही जिंकू
नंदुरबार :
शिंदे सरकारकडून पाठविण्यात आलेल्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीत जिल्ह्यातील शिंदे समर्थक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाचा समावेश असल्याची चर्चा…
– चंद्रकांत रघुवंशीचे नाव राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत असल्याने जिल्ह्यातील शिंदे गटाची ताकद वाढेल…
– चंद्रकांत रघुवंशी एकनाथ शिंदे यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात….
नवी दिल्लीः
सर्वोच्च न्यायालयात आजच सुनावणी होणार ?
शिवसेना नेत्यांनी याचिका मेन्शन केल्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या पटलावर
आजच सुनावणी होण्याची दाट शक्यता
Tiktok स्टार भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं ह्रदय विकाराच्या झटक्यानं गोव्यात निधन,
भाजपच्या तिकिटावर हरियाणातील अदामपूर विधानसभा मतदार संघातून कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती
शिवसेना नेत्यांकडून याचिका मेंशन
सुभाष देसाई अनिल परब सर्वोच्च न्यायालयात
तात्काळ सुनावणी घ्या शिवसेना नेत्यांची सर्वोच्च न्यायालयाला विनंती
विधानसभेतील हम साथ साथ है च्या मुख्यमंत्र्यांच्या उत्तराला शिवसेना सचिव विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर
हम साथ साथ हे दाखवण्यापुरते
शिंदे सरकारचं औट घटकेचं राज्य
शिंदे गटाचे विसर्जन करण्याचे काम भाजपाच करेल
शिवसेना आणि मनसे एकत्र .येण्याचे संकेत मिळालेले नाही
उद्धव ठाकरे यांच्याकडे असा कुठलाच प्रस्ताव नाही
या संदर्भातील अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील
पक्षाशी आम्ही बांधील त्यामुळे पक्ष घेईल ती भूमिका आम्हाला मान्य असेल- विनायक राऊत
राज्याच्या माजी अतिरिक्त आयुक्त लीना मेहेंदळे यांच्या मुलाच्या नावाने इन्कम टॅक्स विभागाची फसवणूक,
– पॅन कार्डचा वापर करून खोटे आयटी रिटर्न दाखल करून कर जमा करून फसवणूक
याप्रकरणी ताहेर, ब्रजेश, रामकुमार या अज्ञात ई-मेल धारकांसह सर्विस प्रोव्हाइड करणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा
आज शिंदे गटातील खासदार भावना गवळी यांच तब्बल एका वर्षांनी वाशिम जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन
वाशिम येथील वटाणे लॉन येथे आज कार्यकर्ता मेळाव्याच आयोजन
मेळावा व रॅली पूर्वी रिठद येथील संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेणार
मेळाव्या पूर्वी वाशिम शहरातुन भव्य रॅली निघणार.
माजी विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा
– पुण्याजवळील नऱ्हेतील पेट्रोल पंपावर दरोडा,
– काल मध्यरात्री केबिनमध्ये झोपलेल्या कामगारांना धमकावून शस्त्राच्या धाकाने रोकड लुटली,
– 50 ते 60 हजार रुपयांची रोकड लुटल्याचा अंदाज
शिवसेना आज कोर्टात याचिका मेंशन करणार
लवकरात लवकर सुनावणी घेण्याची करणार मागणी
अनिल परब आणि सुभाष देसाई कोर्टाकडे रवाना
24 तासात दोनदा सुनावणी पुढे गेल्यानं मेंशन करणार
अनिल परब यांची माहिती
गडचिरोली जिल्ह्यातील 4 नद्यांना आलेल्या महापुराचे पंचनामे अजून सुरूच
शुक्रवारपर्यंत होणार पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण
महापुरामुळे सर्वात जास्त फटका सिरोंचा, भामरागड, अहेरी या तीन तालुक्यांना बसला
भात, मिरची, कापूस पेरण्या शेतकऱ्यांची पूर्णपणे नष्ट
सध्या अधिवेशन सुरू असून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना व पूरग्रस्त नागरिकांना घोषणा करणार का-? याकडे गडचिरोली पूरग्रस्तांचे लक्ष
अनेक पूरग्रस्त नागरिकांकडे बँक खातेच नाही
साधी लोकल रद्द करून एसी लोकल नकोच..!
एसी लोकलसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करा
बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
राज्यातील बरेच प्रश्न अंधारात
आज सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा पुर्ण प्रयत्न करणार
शेतकऱ्यांचे अनुदान हा मुख्य मुद्दा
मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांना दहशतवाद्यांचे मेसेज येतात
रायगडला शस्त्रसाठा मिळाला, 26/11 चे घाव ओले आहेत
भाजप अधिक इडी सरकारला जाब विचारणे,
शेतकरी गरीबांचे प्रश्न मार्गे लागतील यासाठी बैठकीत चर्चा करणार
हे सरकार चालणार नाही, आधीपासूनच आम्ही सांगतोय, यांच्यातच धुसफूस सुरू
आज संध्याकळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक
बैठकीला उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार
अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ बैठकीत सहभागी होणार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या 2 दिवसांच्या रणनीतीवरही चर्चा होणार
अखेर यशवंत जाधव आणि उदय सामंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी कारवायाचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव आणि सामंत यांची पक्षातून हकालपट्टी केली. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उदय सामंत आणि यशवंत जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता.
सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित 80 टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण
येत्या दोन दिवसात राहिलेले 20 टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण करणार
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
अतिवृष्टीमुळे चार तालुक्यात 22 हजार 904 हेक्टरवरील पिकाचे नुकसान
जिल्ह्यातील 111 गावातील 26 हजार 459 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका
बांधकाम व्यवसायिक माणिकराव पाटील यांच्या हत्येचे गूढ वाढतच चालले असून, पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना ताब्यात घेतले आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये या प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.  हल्लेखोरांनी अतीशय नियोजनबद्ध पद्धतीने माणिकराव पाटील यांची हत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
नागपूर खंडपीठाने काँग्रेस नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
भाजप आ. कृष्णा खोपडे, सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी दाखल केली होती याचीका
काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा होता आरोप
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली याचिका
माजी मंत्री नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे, अभिजीत वंजारी, शेख हुसैन यांना दिलासा
आज दिनांक 23 ऑगस्ट 2022 (23 August 2022) जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी (Maharashtra News Live Update). आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. अधिवेशनाचे तिनही दिवस वादळी ठरले आहेत. त्यामुळे चौथा दिवस देखील वादळी ठरण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. दुसरीकडे आज महाराष्ट्राच्या सत्तासंर्घषणावर सुनावणी देखील आहे. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागल आहे. राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र काही भागात अजूनही पाऊस सुरूच आहेत. जाणून घेऊयात राज्यातील प्रत्येक अपडेटस (Maharashtra Breaking News Live) शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर पक्षाला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेत नाहीये आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार अशोक पाटील यांनी शिंदे गटला समर्थन दिले आहे.
Published On – Aug 23,2022 6:59 AM
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares