Saffron Farming: केसरची शेती म्हणजे हमखास उत्पन्न देणारी शेती; वाचा केसर शेतीचे बारकावे – Ahmednagarlive24

Written by

Saffron Farming: भारत हा कृषीप्रधान देश (Agriculture Country) देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या केवळ आणि केवळ शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेतात वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करत असतात आणि देशातील तसेच जगातील अन्नधान्यांची मागणी पूर्ण करत असतात.
मित्रांनो खरं पाहता आज आपण केसरच्या शेती विषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्या देशाच्या अनेक भागात केशरची लागवड केली जातं असते. केशर लागवडीतून (Saffron Farming) शेतकऱ्यांना चांगला मोठा बक्कळ पैसा देखील मिळतो.
बाजारात केशरची किंमत ही लाखोच्या घरात असते. यामुळेच की काय केशरला लाल सोनं म्ह्णून नेहमीच संबोधलं जातं. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, काश्मीरमध्ये सर्वात जास्त केशर लागवड बघायला मिळतं असते.
केशर लागवडीसाठी उपयुक्त शेतजमिन नेमकी कोणती? मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, केशरचे पीक चक्र 3 ते 4 महिन्यांचे असते आणि ते 15-20 सेमी उंचीपर्यंत पोहोचू शकते. या पिकासाठी व त्याच्या चांगल्या दर्जेदार वाढीसाठी आणि त्यापासून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश लागतो.
मित्रांनो या पिकाचे थंड आणि ओल्या हवामानात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. हेच कारण आहे की, उष्ण हवामान असलेल्या ठिकाणी लाल सोन अर्थात केशरची लागवड करण्याचा कृषी तज्ञ सल्ला देत असतात.
याच्या लागवडीसाठी अम्लीय ते तटस्थ, रेव, चिकणमाती आणि वालुकामय जमीन असलेली शेतजमीन सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला जातो. याशिवाय ज्या शेतजमिनीत केशर लागवडीचा विचार असेल त्या जमिनीच्या मातीचा pH अर्थात सामू 6 ते 8 यादरम्यान असायला हवा.
केशराची लागवड नेमकी केव्हा?
मित्रांनो भारतात केशरचे उत्पादन प्रामुख्याने जून आणि जुलै महिन्यात घेतले जाते. मात्र, असे असले तरी काही भागात केशरची लागवड ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यानही केली जात असल्याचे सांगितले जाते. केशरचे पीक ऑक्टोबर महिन्यात उत्पादन देण्यास सुरुवात करते. केशर या पिकाला उन्हाळ्यात कडक उष्णता आणि हिवाळ्यात प्रचंड थंडी लागते.
भारतातील केशराची लागवड नेमकी कुठे
जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश ही दोन राज्य केशरच्या उत्पादनासाठी विशेष ओळखली जातात. या राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून केसरची शेती केली जात आहे. या प्रमुख केशर उत्पादक राज्यात तसेच आता उत्तर प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्येही शेतकरी केशर लागवड करू लागले आहेत.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares