Shivsena Kolhapur : शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान न देणारे भिकारी सरकार, शिवसेनेकडून महापूजा – ABP Majha

Written by

By: विजय केसरकर, एबीपी माझा | Updated at : 18 Aug 2022 03:43 PM (IST)
Edited By: परशराम पाटील
Shivsena Kolhapur
Shivsena Kolhapur : महाविकास आघाडी सरकारकडून जाजा जाता राज्यात नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रस अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, एकनाथ शिंदे सरकारकडून अजूनही त्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने शिवसेनेकडून आज कोल्हापूरमध्ये महापूजा घालून निषेध करण्यात आला. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 
शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी देओ आणि शेतकऱ्यांना अनुदान मिळू दे अशी मागणी केली. मंजूर करण्यात आलेल्या पुरवण्या मागण्यांमध्येही या पैशाची तरतूद केली नसल्याचे ते म्हणाले. विधानसभेतही शिवसेनेकडून हा मुद्दा आज उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे यांना सुबुद्धी देण्यासाठी लक्ष्मीकडे प्रार्थना केल्याचे ते म्हणाले. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. 
दुसरीकडे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार जमा झालेले नाहीत. याच्या निषेधार्थ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने महापूजा घालून निषेध करण्यात आला. 
शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ अनुदान जमा करण्याची सुबुद्धी मिळो याच्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण 1 लाख 72 हजार शेतकरी या अनुदासाठी पात्र होणार आहेत. याची अंदाजे रक्कम 550 कोटीपर्यंत जाईल असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 
satyapal singh baghel : कोल्हापूरचे दोन्ही खासदार भाजपचे असणार का? कायदा मंत्री सत्यपालसिंह बघेल म्हणाले…
शेंदुराचा थर हटवल्याने बिनखांबी मंदिरातील इच्छापूर्ती गणेश तब्बल 190 वर्षांनी मुळ रुपात!
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील 410 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना ओबीसी आरक्षणासह जाहीर
Kolhapur News : भाजपकडून लोकसभा प्रवास योजना, केंद्रीय कायदा मंत्री सत्यपालसिंह बघेल उद्या कोल्हापूर दौऱ्यावर
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रेची सांगता कोल्हापूरच्या बिंदू चौकात, पण बाळासाहेब तेथूनच प्रचाराचा नारळ फोडत!
Mumbai Ganeshotsav : मुंबईत गणेशोत्सवाची ओढ! पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर, ‘या’ मुर्तींना मागणी अधिक
Monkeypox : मंकीपॉक्समुळे HIV होत नाही, ICMR च्या शास्त्रज्ञाने काय केला दावा? जाणून घ्या 
High Court : औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी
Horoscope Today, August 23, 2022 : मेष, कर्कसह ‘या’ राशींसाठी दिवस ठरणार फलदायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Todays Headline 23rd August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares