Supreme Court : live-in relationship मध्ये जन्मलेला मुलगाही असतो वडिलांच्या संपत्तीत हक्कदार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय – Times Now Marathi

Written by

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) लिव्ह इन रिलेशनविषयी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहाशिवाय (live in relationship) जन्माला आलेल्या मुलांचाही वडिलांच्या संपत्तीत हक्क असल्याचे  न्यायालयाने मानले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर स्त्री आणि पुरुष दीर्घकाळ एकत्र राहत असतील, तर ते लग्न मानले जाईल आणि या नात्यातून जन्मलेल्या मुलांनाही वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळेल.
सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्वाळा देताना केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये तरुणाला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटेकरी मानले नव्हते. कारण त्याच्या पालकांचे लग्न झाले नव्हते. दोघांचे लग्न झाले नसले तरी दोघेही पती-पत्नीसारखे (live in relationship) दीर्घकाळ एकत्र राहत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा देताना स्पष्ट केले. अशा परिस्थितीत मूल दोघांचे असल्याचे डीएनए चाचणीत सिद्ध झाल्यास वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा पूर्ण हक्क असल्याचे मानले आहे.
केरळमधील एका व्यक्तीने वडिलांच्या मालमत्तेत वाटा न मिळाल्याने उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. त्याने याचिका दाखल करताना म्हटले होते की, त्याला अनैतिक मुलगा सांगून वाटा वडिलांच्या संपत्तीत दिला जात नाहीये. केरळ उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते की, ज्या व्यक्तीच्या मालमत्तेवर तो दावा करत आहे, त्याच्या आईने त्याच्याशी लग्न केलेले नाही, अशा परिस्थितीत त्याला कौटुंबिक मालमत्तेचा हक्क समजता येणार नाही.
 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares