Big News: बिहारमध्ये सत्तांतरानंतर सीबीआयची पहिली छापेमारी, बहुमत चाचणीआधी नितीश-तेजस्वींना घेरण्याचा… – TV9 Marathi

Written by

|
Aug 24, 2022 | 9:36 AM
पटना : नुकतंच बिहारमध्य सत्तांतर झालंय. नितीश कुमार (Nitish Kumar) आणि तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलंय. अश्या सगळ्या परिस्थितीत सीबीआयकडून पहिली छापेमारी करण्यात आली आहे. आरजेडी नेते सुनील सिंह (Sunil Singh) यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे नितीश-तेजस्वी यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी आहे. मात्र त्याआधीच ही कारवाई करण्यात आली आहे. नोकरभरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. नोकरभरती घोटाळ्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. लालू यादव रेल्वेमंत्री असताना नोकरी भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप आहे. नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयने लालू यादव, राबडी देवी, मिसा यादव, हेमा यादव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हे सारं सूड बुद्धीतून केलं जातंय. सत्ता हातातून गेल्यामुळे भाजप हे सगळं करतंय. पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही काहीही केलेलं नाही. तपासातून सारंकाही समोर येईलच, असं सुनील सिंह यांनी म्हटलंय.
सुनील सिंह यांच्या घरावर छापे टाकण्यात आल्यानंतर त्यांचे समर्थक त्यांच्या घराजवळ जमले. त्यांनी आरजेडी जिंदाबाद,सुनील सिंह तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अश्या घोषणा दिल्या आणि त्यांच्या पाठीशी जनता आहे. त्यांना लोकांनी निवडून दिलंय. बिहारचा शेतकरी त्यांच्यासोबत आहे. असं त्यांच्या समर्थकांनी सांगितलं. आता आम्ही भाजपच्या विरोधी आंदोलन छेडणार आहोत, असंही त्यांच्या समर्थकांनी सांगितलं.
तर दुसरीकडे ईडीने 17 ठिकाणी छापे टाकलेत. झारखंड, तामिळनाडू, बिहार आणि दिल्लीतील 17 ठिकाणी ईडीने छापेमारी केलीय. अवैध खाणकाम आणि खंडणी प्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रेम प्रकाश यांच्याशी संबंधित ठिकाणांवर हे छापे टाकले जात आहेत. प्रेम प्रकाश यांचे राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळचे नेते पंकज मिश्रा यांची चौकशी केल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares