Hingoli: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोलीत पुन्हा पाऊस; शेतकरी चिंतेत – ABP Majha

Written by

By: माधव दिपके | Updated at : 18 Jul 2022 12:11 PM (IST)

Hingoli Rain
Hingoli News: आधीच जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यात अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी अडचणीत सापडला असतांना आता पुन्हा एकदा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हिंगोली जिल्ह्यातील 24 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 161 टक्के म्हणजेच 477 मिमी एवढा पाऊस झाला आहे. 
पुन्हा पावसाची हजेरी…
हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. ओंढा,वसमत, सेनगाव या भागामध्ये जोरदार पाऊस बरसलाय. सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे काही ठिकाणच्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीच्या कामांना वेग आला होता .परंतु आज पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यातच कोवळ्या पिकात तुंबल्याने पिके सडण्याची भीती आहे. 
हिंगोलीत 19  हजार शेतकऱ्यांचे नुकसान…

हिंगोली जिल्ह्यातील 24 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. ज्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 477 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रशासनाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार जिल्ह्यात 19 हजार 197 शेतकऱ्यांचे 15 हजार 944 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करायला सुरवात केली आहे. 
Madhya Pradesh Bus Accident: इंदूरहून जळगावकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू
मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात
मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाला असून, 3 लाख 30 हजार 357 शेतकऱ्यांचे अंदाजे 3 लाख 20 हजार 879 हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर 261 हेक्टर जमीन खरडून गेली आहे. परभणी जिल्ह्यात 1500 शेतकऱ्यांचे 1200 हेक्टर नुकसान झाले. जालना जिल्ह्यात 377 शेतकऱ्यांचे 50 हेक्टरचे नुकसान झाले असून, 205 हेक्टर खरडून गेली आहे.
Aurangabad: औरंगाबादचे दरवाजे इतिहासात पहिल्यांदा रोषणाईने सजले; शहराच्या सौंदर्यात आणखी भर
Aurangabad: पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यांना अखेर अटक; सीसीटीव्ही फुटेज तपासून शोधले आरोपी
Aurangabad: औरंगाबादेत ख्रिस्ती प्रार्थना हक्क आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी
Burning Bike VIDEO: चालत्या इलेक्ट्रिक बाईकने घेतला पेट, काही क्षणात जळून खाक
Aurangabad: कंटेनर चालकाची नियत फिरली, 20 लाखांच्या व्हिस्कीसह ट्रकच पळवला
Shivsena : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज होणाऱ्या सुनावणीबाबत अनिश्चितता, अद्याप घटनापीठाची निर्मितीच नाही
Women’s Equality Day : गेल्या 12 वर्षांपासून महिला आरक्षण विधेयक संसदेत प्रलंबित, महिलांना राजकीय न्याय कधी मिळणार?
24 वर्षांनंतर काँग्रेसची धुरा गांधी घराण्याच्या बाहेर जाणार? दिवाळीआधी पक्षाला मिळू शकतो नवीन अध्यक्ष
Todays Headline 25th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Amol Mitkari : अमोल मिटकरींचा गावातच पराभव, काँग्रेस-भाजपच्या पॅनलचा सर्व जागांवर विजय 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares