Monsoon Update: आला रे..! पंजाबरावांचा मान्सून अंदाज आला..! राज्यात ‘या’ भागात आज पावसाची जोरदार बॅटिंग, वाचा पंजाबरावं काय म्हणलं – Ahmednagarlive24

Written by

Monsoon Update: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोसमी पावसाचा (Monsoon News) जोर वाढत आहे. राजधानी मुंबईत रोजच मुसळधार पाऊस (Rain) बघायला मिळत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवस राजधानी मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार तसेच अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) पडणार असल्याचे सांगितले आहे.
यामुळे राज्यातील नागरिकांना या वेळी भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. राज्यात सध्या सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असल्याने पेरणीची कामे प्रगतिपथावर असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी अनेक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली आहे. दरम्यान काही भागात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची उघडीप बघायला मिळत आहे. यामुळे शेतकरी बांधव पिकाच्या जोमाने वाढीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तसेच राज्यात पेरणी झाल्यानंतर अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली होती. त्या ठिकाणी आता शेतकरी बांधव दुबार पेरणीसाठी पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.
एकंदरीत राज्यात सर्वत्र मोसमी पाऊस बघायला मिळत असून काही ठिकाणी मोसमी पाऊस शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होत आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले नाव अर्थातच पंजाबराव डख यांचा नवीन मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) आता सार्वजनिक करण्यात आला आहे.
पंजाबराव डख साहेबांनी (Panjabrao Dakh) यावेळी केलेल्या नवीनतम मान्सून अंदाजानुसार, आज दहा जुलै रोजी राज्यातील अनेक ठिकाणी मोठा पाऊस बघायला मिळणार आहे. राज्यात विशेषतः पंढरपूर व आजूबाजूच्या परिसरात अति मुसळधार पावसाची हजेरी राहणार आहे. आज आषाढी एकादशी असल्याने पंढरपुरात वारकऱ्यांची अफाट गर्दी राहणार आहे.
अशा परिस्थितीत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने डख साहेबांनी यावेळी वारकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा देखील दिला आहे. हवामानात अचानक बदल झाल्याने पंढरपूर मध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी स्पष्ट केले.
पंढरपूर व्यतिरिक्त राज्यातील लातूर, सोलापूर, बीड, अहमदनगर, सातारा, सांगली, पुणे, तसेच कोकण किनारपट्टी, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सर्वत्र आज मोठा पाऊस होणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.
पंजाब रावांनी नव्याने वर्तवलेल्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report) उद्या अर्थात 11 जुलै रोजी पावसाची उघडीप बघायला मिळणार आहे. 11 व 12 जुलै पावसाची उघडीप राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी या दरम्यान आपली शेतीची कामे करून घ्यावीत असा सल्ला देखील यावेळी पंजाबराव यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares