ओतूर येथे आज कांदाप्रश्‍नी आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
ओतूर, ता. २४ : ओतूर (ता. जुन्नर) येथील मोनिका चौकात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. २५) सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अंबादास हांडे, लक्ष्मण शिंदे, संजय भुजबळ यांनी दिली. कांद्यावरील निर्यातबंदी कायमची उठवावी, सी. रंगराजन समितीनुसार बाजारभाव मिळावा, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खराब झालेल्या कांद्याची नुकसान भरपाई प्रति किलो ३० रुपये मिळावी, शेतकऱ्यांनी मागील हंगामातील पीक कर्जाचा व्याजासह भरणा केलेल्या व्याजाचा परतावा मिळावा, या प्रमुख चार मुद्द्याच्या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares