गटसचिवांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट: विविध कार्यकारी सोसायट्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची मुख्यमंत्र्यांकड… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
गटसचिवांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील गटसचिवांनी आमदार किशाेर पाटील यांच्या नेतृत्वात मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांना गटसचिवांची बैठक बोलवण्याचे आदेश दिले.
विविध कार्यकारी सोसायटींना राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या माध्यमातून कृषी आणि कृषी पूरक कर्ज पुरवठा राज्य सहकारी बँक,जिल्हा सहकारी बँक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अशा त्रिस्तरीय पतसंरचनेकडून होतो. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.
बँका आर्थिक अडचणीत
शेतकऱ्यांना पीक कर्ज देणारी विकासो ही ग्रामीण भागातील एक महत्वपूर्ण संस्था आहे. ही संस्था बळकट होणे आवश्यक आहे. विकासोना कर्ज उपलब्ध होईपर्यंत राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वर्षात दोन वेळा व्याज आकारणी करण्यात येते. त्यामुळे विकासो अनिष्ट तफावतीत जात आहेत. जिल्हा बँकेने बिगर शेती कारणासाठी केलेले कर्ज वाटप सुरक्षित नाही. कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत आहे. त्यामुळे बँका तोट्यात व आर्थिक अडचणीत आल्या आहेत.
शेतकऱ्यांचा रोष
जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करत आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज पुरवठा होत नाही. कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण राहते. याबाबत शेतकरी रोष व्यक्त करत आहेत. परिणामी ही ग्रामीण भागातील पतपुरवठा करणारी यंत्रणा बंद पडण्याच्या मार्गावर होती. विविध कार्यकारी सोसायटिंना थेट कर्ज केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून नवीन उपविधी तयार करण्यात येत आहे. त्याची प्रक्रिया सुरु आहे.
मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
विकासोंना वाचवण्यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या माध्यमातून थेट पीक कर्ज विविध कार्यकारी संस्थांना उपलब्ध होणार आहे. यासाठी शासनाने धोरण राबवावे, राज्य शासनाने गट सचिवांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी गटसचिव संघटनेच्या संयुक्त कृषी समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ निकम, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, राहुल बोरसे, गुलाब पाटील आदी प्रतिनिधींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares