टू मच डेमोक्रेसी माहितीपट – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
४५४०७
लोकशाहीच्या नजरेतून
शेतकरी आंदोलनाची कहाणी
‘टू मच डेमोक्रसी’ माहितीपटावर रंगला संवाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुमारे दीड वर्षे चालले आणि या आंदोलनावर अनेक अंगांनी चर्चाही झाली. लोकशाहीच्या नजरेतून याच आंदोलनाची कहाणी आज उलगडली. निमित्त होते, ‘टू मच डेमोक्रसी‘ या माहितीपटाच्या प्रदर्शनाचे. राजर्षी शाहू स्मारक भवनात हा माहितीपट दाखवण्यात आला आणि त्यावर संवादही रंगला. येथील बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्र आणि श्रमिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन झाले.
संसदेने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील विविध शेतकरी संघटना एकवटल्या आणि त्यांनी दिल्लीवर धडक दिली. सुमारे दीड वर्षं शेतकऱ्यांचा दिल्लीच्या वेशीवर लढा सुरू होता. याच दरम्यान आलेले विविध चढउतार, निर्माण झालेला संघर्ष, आंदोलनावरून सुरू झालेल्या विविध चर्चा, समाजातील विविध घटकांची या आंदोलनाबाबतची मते आदी विषयांवर भाष्य करत हा माहितीपट साकारला असून तो प्रत्यक्षात आंदोलनावेळी तयार झाला आहे, असे दिग्दर्शक वरूण सुखराज, निर्माते पराग पाटील यांनी सांगितले. यावेळी श्रमिक प्रतिष्ठानच्या मेघा पानसरे, फिल्म सोसायटीचे दिलीप बापट, प्रत्यय संस्थेचे अनिल सडोलीकर, आदित्य खेबूडकर आदी उपस्थित होते.
‘राजर्षींवर लवकरच चित्रपट’
राजर्षी शाहूंच्या जीवनकार्यावर आधारित ‘शाहू छत्रपती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचे दिग्दर्शन वरूण सुखराज करत आहेत. ‘टू मच डेमोक्रसी’ माहितीपट साकारताना हा माहितीपट राजर्षी शाहूंनी पाहिला असता तर ते काय म्हटले असते, असा विचारही डोक्यात होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares