मागणी: तुकडाबंदी हटवा, दर्यापुरात ‘मनसे’चे एसडीओंना साकडे – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
तुकडाबंदी कायद्याअंतर्गत कमीत-कमी ०.८१ आर जमिनीची विक्री करावी लागते. ही बाब अनेकांसाठी अडचणीची ठरत असल्याने ती कमी करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली असून त्यांनी एसडीओ मनोज लोणारकर यांच्यामार्फत सरकारला साकडे घातले असून कायद्यात बदल करावा, अशी मागणी केली आहे.
सद्यस्थितीत शेती व प्लॉटचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे साधारण शेतकऱ्यांकडून जास्त क्षेत्रफळाची शेती विकत घेणे शक्य होत नाही. शिवाय एखाद्या शेतकऱ्याला आपल्या कौटुंबीक कामाकरिता काही शेती विकून घरगुती समस्या सोडवायच्या असतील तर तुकडाबंदी असल्यामुळे त्यालाही सदर शेतीची विक्री करता येत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास संबंधित शेतकऱ्याची इच्छा नसतानासुद्धा त्याला जादा शेतजमिनीची विक्री करावी लागते. विभक्त कुटुंब पद्धती तसेच भाऊबंदकीमुळे प्रत्येकाच्या वाट्याला कमी क्षेत्रफळाची जमीन येत आहे. त्यामुळे अशा जमिनीचे व्यवहार अडचणीत आले आहे. ही वास्तविकता एसडीओ लोणारकर यांच्या लक्षात आणून देण्यात आली. मनसेने केलेल्या मागणीनुसार तुकड्याची मर्यादा ही ०.४० आर व ०.२० आर केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शिवाय कोणत्याही शासकीय दरबारी परवानगीसाठी चकराही माराव्या लागणार नाहीत.
सदर शेतकरी स्वतःच्या उदरनिर्वाहकरिता शेती राखून ठेवून कुटुंबात उद्भवलेल्या समस्या दूर करु शकतील. त्यामुळे १ जून २०२१ आधीचे जे प्लॉटचे किंवा शेतीचे तुकडे पडले आहेत, त्यांना मान्यता देऊन खरेदीखत तयार करण्यास मान्यता द्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मनोज तायडे, जनहित तालुकाध्यक्ष गोपाल तराळ, उप तालुकाध्यक्ष पंकज कदम, शहराध्यक्ष लकी गावंडे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रथमेश राऊत, संदीप सोळंके, अनिकेत सुपेकर, राम शिंदे, शुभम चौखंडे, शुभम रायबोले, संदीप राणे, रोशन कावडकर, सुरेशआप्पा कुल्ली, संतोष रामेकर, प्रणित डाबेराव, भूषण टेकाडे, अंकुश भडांगे आदी मनसैनिक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares