रब्बीत कपाशीची लागवड फायद्याची की नुकसानीची ? शिफारस नसतानाही शेतकऱ्यांचे धाडस – TV9 Marathi

Written by

| Edited By: राजेंद्र खराडे
Dec 08, 2021 | 3:43 PM
औरंगाबाद : यंदा कपाशीच्या क्षेत्रामध्ये कमालीची घट झाली होती. परिणामी उत्पादनातही घट झाली असल्याने कापसाला चांगला दर मिळालेला आहे. मात्र, खरिपात कापसाचे उत्पादन न घेतलेले शेतकरी आता ( rabi season) रब्बी हंगामात ( Cotton cultivation) कापूस लागवड करीत आहेत. एकीकडे फरदडचे उत्पादन घेऊ नका असा सल्ला दिला जात असल्याने दुसरीकडे मात्र, शेतकरी आता रब्बीतच कापूस लागवड करु लागले आहेत. मात्र, यामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढून शेतजमिन निकामी होण्याचा धोका असतो. त्यामुळे उत्पादनवाढीच्या अनुशंगाने हा प्रयोग यशस्वी होईल का नाही याबाबत कृषीतज्ञ शंका उपस्थित करीत आहेत. रब्बीत कापूस लागवड हे प्रायोगिक तत्वावर पाहिले जात असले तरी तशी कोणतीच शिफारस नसल्याचे कापूस संशोधन केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मराठवाड्यात काही वर्षापूर्वी कापूसच खरिपातील मुख्य पीक होते. मात्र, वाढता किडीचा प्रादुर्भाव आणि घटते उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भर देण्यास सुरवात केली होती. 13 लाख हेक्टरावर कापसाची लागवड केली जात होती. यंदा मात्र, कमालीची घट झाली होती. त्यामुळे दर वाढूनही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्याचा एवढा फायदा झालेला नाही. शिवाय आता दर वाढले असले तरी कापसाला बोंडअळीने घेरलेले आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव कापसावर तर होतोच शिवाय फरदडच्या उत्पादनामुळे इतर पिकेही धोक्यात येतात.
कापूस हे खरीप हंगामातील पिक आहे. कापसातील बोंडअळीमुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने आता मराठवाड्यातील शेतकरी हे सोयाबीनवरच भर देत आहेत. तर रब्बी हंगामात कापूस लागवडीची शिफारसच कृषी विभागाकडे नाही. उलट गुलाबी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने इतर पिकांनाही याचा धोका होणार आहे. कापूस हे खऱीपातील पिक आहे. 15 जुलैनंतर जर कापसाची लागवड केली तर उत्पादनात मोठी घट होते. असे असतानाही औरंगाबाद फुलंग्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंग्री तालुक्यातील निमखेडा येथील शेतकऱ्याने 30 गुंठ्यामध्ये कापूस लागवड केली आहे. मात्र, लागवड होताच कपाशीवर कोकड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी मका काढून कापूस लागवड़ केली आहे. मात्र, सध्याच्या वातावरणामुळे किडीची वाढच होणार आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी असे प्रयोग केले जात आहेत का ? असा सवालही उपस्थित राहत आहे. तळेगाव तालुक्यातील 8 ते 10 शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. आता उत्पादनात आणि रब्बी हंगामात कापूस कसा येतो हे पाहता येणार आहे.

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares