४५ दिवसांत १३७ शेतकरी आत्महत्या;काहीही करा पण शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखा ! – ELokmanya News Portal

Written by

टीम ई-लोकमान्य | मुंबई- राज्यात झालेली अतीवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने विधानसभेत नियम २९३ अन्वये प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.मागील महिन्यात अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ज्या गोष्टी निदर्शनास आल्या त्याबद्दल सभागृहात माहिती देऊन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,असा इशारा दिला.
राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत.मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून मागील ४५ दिवसांत १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी काय करायचं? शेतकऱ्यांना हे सरकार आपल्या जवळचे वाटत नाही. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा, अशी सूचना मा. अजितदादांनी केली.कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले पाहिजे.तसेच पवार साहेबांप्रमाणेच इतरही कृषितज्ज्ञांना भेटावे आणि उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागले तरी काढा, पंतप्रधानांना भेटा, केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटा, काहीही करा पण शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
अतिवृष्टीबाबत बोलत असताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांना पिकांसाठी ७५ हजार रुपये आणि फळबागांसाठी दीड लाखांची हेक्टरी मदत करावी, अशी मागणी पुन्हा केली. तसेच इतरही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधले. राज्यात मागील दोन महिन्यात अतिवृष्टी झाली आहे. अजूनही पाऊस पडत आहे. राज्यातली सर्व धरणे भरलेली आहेत. हवामान खात्याने यापुढेही पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर मोठा पाऊस झाला तर धरणातील पाणी ओव्हरफ्लो होऊन नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. धरणातून पाणी सोडण्यात थोडी जरी चूक झाली तर त्याचा फटका खालच्या बाजुच्या लोकांना भोगावा लागू शकतो. त्यामुळे पाऊस संपेपर्यंत पाटबंधारे खात्याचा अधिकारी रात्रीच्या वेळी धरणावर असला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्रातील अनेक भागात नद्यांमध्ये अतिक्रमण होत आहे. नदीत राडारोडा टाकला जातोय. त्यामुळे नदीचे पात्र उथळ होत आहे. चंद्रपूर शहरात तर ही समस्या गंभीर झाली आहे. नदीमधील अतिक्रमण रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. तसेच पुरामुळे खचलेल्या विहिरी दुरुस्त करुन देण्यासाठी मनरेगा म्हणून मदत दिली पाहीजे. अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांबाबत एनडीआरएफचे निकष जाचक आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेले जनावर कसे काय शोधणार? याबाबतीत निकष बदलून मदत करावी. पीक कर्ज माफ केले पाहिजे. ज्या घरांचे नुकसान झाले त्यांनाही मदत दिली पाहिजे. घर पूर्ण पडले किंवा अंशतः पडले तरच मदत दिली जाते. पण काही घरांना ओलावा येऊन भेगा पडतात. अशा घरांनाही मदत देण्यासाठी पंचनामे केले पाहिजेत. या अतिवृष्टीच्या काळात गोगलगायींचा प्रादुर्भाव मराठवाड्यात पाहायला मिळाला. आपल्या मदतीच्या निकषांमध्ये गोगलगायीने पिकांचे नुकसान केल्यास मदतीची तरतूद नाही. त्यामुळे या बाबीचा वेगळा निर्णय सरकारने घ्यावा,असे अजित पवार म्हणाले.

टीम ई-लोकमान्य | मुंबई – महाराष्ट्राच्या समाजमनावर आपल्या कामाच्या धडाडीने प्रभाव टाकणारे नेतृत्व म्हणून दिवंगत आमदार विनायक मेटे यांना महाराष्ट्र लक्षात ठेवेल, त्यांच्या रुपाने अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारा नेता…
टीम ई-लोकमान्य | मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लूटली… त्या सुरतेला तुम्ही शरण व्हायला गेलात…तुमची सुरतेवर स्वारी झाली परंतु त्याने महाराष्ट्राची बदनामीच झाली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे…
टीम ई-लोकमान्य | मुंबई- राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली….
टीम ई-लोकमान्य | मुंबई- महाराष्ट्रातील विकसित झालेल्या शहरांमध्ये पोलिस विभाग असायला हवा तेवढा मोठा नसून शहरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कमी पडत आहे.त्यामुळे,पोलिस भरती कधी करणार,असा प्रश्न विधानसभेचे विरोधी…
टीम ई-लोकमान्य | मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मविआमधील नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार,बाळासाहेब थोरात आणि इतर नेते…
Your email address will not be published.






We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

© 2021 ELokmanya Media’s -Designed By Shubham Nadhavale(7757910341)
© 2021 ELokmanya Media’s -Designed By Shubham Nadhavale(7757910341)

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares