Deepak kesarkar: 50 खोकेच काय 50 रुपये जरी घेतले असतील तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल- दीपक केसरकर – TV9 Marathi

Written by

|
Aug 24, 2022 | 11:55 AM
मुंबई : सध्या विधिमंडळाचं अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) होतंय. अश्यात 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पैसे देण्यात आले.  50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलंय. 50 खोके काय 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल, असं दीपक केसरकर (Deepak kesarkar) म्हणालेत. “सत्तेसाठी कोणी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. विधान सभेत पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात तेव्हा मी विधान परिषदेत तो मुद्दा खोदून काढला. साधे 50 रुपये जरी मी घेतलेले असलेले तरी मी राजीनामा देईन. आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो. जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठाव होतो”, असं केसरकर म्हणाले.
“आमदार गप्प आहेत त्यांना गप्पा राहू द्यात. खड्डे मुक्त रस्त्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. शेतकऱ्यांना मदत करण्यात आली, शेतकरी देखील सुखी झालेला आहे. मागच्या वर्षी जे सरकार होतं त्यांच्या पेक्षा जास्त निधी आम्ही दिला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसायचा अधिकार तुम्हाला आहे का?”, असा सवालही केसरकरांनी केलाय.

दीपक केसरकर यांनी राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावरही प्रतिक्रिया दिली. ज्या प्रमाणे उद्धव साहेबांनी काही बोल तर बोलायचं नाही आम्ही ठरवलं आहे. त्यांनी शिवसेनेची बांधणी केली आणि शिवेनेची फळी मजबूत झाली. जेवढं प्रेम उद्धव साहेबांवर होतं तेवढं राज साहेबांवर पण आहे. पुढच्या काळात राजकीय पक्ष म्हणून आमचा विचार असणार आहे.हिंदुत्ववाची व्याख्या राज साहेब देखील पुढे घेऊन आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी राजकारण करत आहेत. काँग्रेसच्या संस्कृतीतुन मी देखील मोठा झालो. काँग्रेसच्या विचार धारेपासून तुम्ही लांब जाता तेव्हा काँग्रेस बोलता येत नाही, असंही केसरकर म्हणाले आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. आजही त्यांनी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. तर त्याचवेळी सत्ताधारी पक्षही तिथे उपस्थित होता. यावेळी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. यावेळी विरोधकांनी गाजर आणले होते. हे गाजर हाती घेत सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares