Deepak Kesarkar | 50 खोके काय 50 रुपये जरी घेतले असतील तर मी राजीनामा देईल – दीपक केसरकर – Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Written by

दपक केसरकर यांनी 50 खोके काय 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल, असं म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षामधील 50 आमदार गेले होते. तेव्हापासून विरोधी नेत्यांकडून 50 खोक्यांचा ’50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके!’ हा नारा दिला जात आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटात गेलेल्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून पैसे घेतले असल्याचे आरोप त्यांच्यावर केले जात आहे. होणाऱ्या या आरोपांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
50 खोके काय 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. सत्तेसाठी कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. विधान सभेत पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात तेव्हा मी विधान परिषदेत तो मुद्दा खोदून काढला.आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो. जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठाव होतो, असं केसकर म्हणाले आहेत.
तसेच, आमदार गप्प आहेत त्यांना गप्पा राहू द्यात. खड्डे मुक्त रस्त्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. शेतकरी देखील सुखी झालेला आहे. मागच्या वर्षी जे सरकार होतं त्यांच्या पेक्षा जास्त निधी आम्ही दिला. मग आता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसायचा अधिकार तुम्हाला आहे का?, असा सवालही केसकरांनी विरोधकांना केला आहे.
दरम्यान, आज पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी यांच्यामध्ये धक्का-बुक्की झाली. त्यावेळी आई-बहिणींच्या शिव्या देखील देण्यात आल्या असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या  :

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
Login to your account below




Fill the forms below to register



Please enter your username or email address to reset your password.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares