Monsoon Session : शेवटच्या दिवशी विधानसभेत 3 ठराव मंजूर – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
हॅलो शब्द वापरल्यावरून विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये खडाजंगी पहायला मिळाली.
आज विधानसभेत तीन ठराव मंजूर झाले असून त्यामध्ये औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाचं नाव दि. बा. पाटील असे तीन ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यानंतर आता हे ठराव विधानपरिषदेकडे मंजूरीसाठी जाणार आहेत.
मुंबई गोवा हायवेचं काम सुरू झालं आहे.
आमचं सरकार आल्यानंतर राज्यात उद्योग वाढतायेत
आम्ही गद्दारी केली नाही
अडीच वर्षे खूप चांगलं काम करणार
अजितदादा खूप चांगले काम करतात, त्यांनी काल खूप टोमणे मारले
जे चांगलं आहे त्यांना चांगलंच म्हणा
मोदींच्या नेतृत्वात आपला देश महासत्ता होणार
बाळासाहेबांचं स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलं, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत
आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीत वाढ केली असून ५ हजाराहून १५ हजारांपर्यंत मदत जाहीर केली आहे.
काही निर्णय धाडसाने घेतले आहेत. आमच्या ५० लोकांकडे आमचे लक्ष आहे.
आमच्या सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली
विधीमंडळाच्या पायऱ्यावरील आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांचा टोला…
पोराटोरांसोबत अजित दादाही आंदोलनाला होते, अशी अपेक्षा नव्हती
मी महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे. (उद्धव ठाकरेंना टोला)
माझ्याकडेही टॅलेंट होतं पण मला कामंच करू दिलं नाही, शिवसेनेने नारायण राणेंना जेलमध्ये टाकलं.
बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाखांत घरे मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली आहे.
अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मिश्किल टिप्पणी केली. मी अजितदादांना सर्व सांगायचो…असे मुख्यमंत्री शिंदे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
विधानसभेत तीन प्रस्तावर मंजूर करण्यात आला. तसेत अंतिम आठवडा प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. डान्सबारसंदर्भात योग्य ती कारवाई करणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच अमंली पदार्थांना आळा घालण्याचे काम सुरू आहे.
अपघात कमी करण्यासाठी ITMS प्रणाली राबवण्याात आली.
आदिवासी भागात रस्ते तयार करण्याचा आदेश.
महाराष्ट्र गुन्ह्यात ११ व्या स्थानी; मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती
विधानसभेत नामांतराचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. औरंगाबद छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई विमानतळाला डी बा पाटलांचे नाव, आणि उस्मानाबादला धाराशिव असे करण्यात आले आहे.
सत्ताधाऱ्यांनी विधानसभेच्या अखेरच्या दिवशीही विरोधकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. युवराजांची कायमच दिशा चुकते असे म्हणत सत्ताधाऱ्यांनी आदित्या ठाकरेंनाही डिवचले. यासर्वावरुन जयंत पाटील यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. तर काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला, एकमेंकाना धक्काबुक्की केली. यावरुनही जयंत पाटलांनी संताप व्यक्त केला.
विधानभवनाबाहेर पायऱ्यांवर बसण्य़ाचे काम थांबलं पाहिजे, पायऱ्यांवर कोणताही सदस्य बसला नाही पाहिजे. जनतेने आमदारांना पायऱ्यांवर बसण्यासाठी नाही तर विधिमंडळात बसण्यासाठी निवडून दिले आहे. विधिमंडळाकडे देश आदर्श म्हणून बघतो त्यामुळे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील मारामारी महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही. अशा शब्दात जयंत पाटलांनी सर्वांना सुनावलं.
चॅनेलला देखील शूटिंग करण्यास बंदी घातली पाहिजे. जे पायऱ्यांवर असतात त्यांचे शूटिंग काढू नये असा आपण निर्णय घेतला, आपण आधी पायऱ्यांवर कॅमेरे होते ते बाहेर नेले. येथे शूटिंगवर बंदी घातल्यास कोणाला तिथे आंदोलन करण्याची इच्छाच राहणार नाहीत अशी शब्दात जयंत पाटलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महिला आणि बालकल्याण विभागाच्या बैठका व्हायला हव्यात अशी मागणी आज यशोमती ठाकून यांनी विधानसभेत केली. मागच्या आदिवासी मंत्र्यांनी खूप काम केले. अंगणवाडीवर आपण व्यवस्थित लक्ष द्यायला हवे. सर्व विभागात समनव्य होत नाही तोवर विषय सुटणार नाही. अशी खंतही ठाकूर यांनी व्यक्त केली.
कुपोषणाच्या मृत्यूवरुन विधानसभेत राडा पाहायला मिळाला. आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही हेच उत्तर पुन्हा आज विधीमंडळात दिलं. त्यावरुन विधानसभेच खडाजंगी झाली. विरोधकांनी गावितांना घेरले. त्यानंतर संतप्त झालेल्या विरोधकांनी सभात्याग केली.
कुपोषण मृत्यू होतात हे सरकार मान्य करायला तयार नाही. मी दौरा करून आलो. कुपोषण मृत्यू होतात हे नाकारता येत नाही. हे का नाकारत आहे. आम्ही दोष देत नाही. आम्ही पण सरकार मध्ये होतो हा आमचा पण कमीपणा आहे. सगळ्यांनी प्रयत्न केला पहिजे. तुम्ही धड धडीत सांगता अस झालं नाही. हे कोणत्या आधारावर सांगता. असा सवास अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
मंत्र्यांचं हे अत्यंत असंवेदनशील उत्तर आहे, आदिवासी समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. पुन्हा माहिती घेण्याची संधी दिली होती, तरी त्यांनी नीट माहिती घेतलेली नाही. राज्यात एकही मृत्यू होत नाही असं सरकारला वाटतं आणि ते अत्यंत अशास्त्रीय आहे. मंत्री म्हणतात कमी वजनामुळे मृत्यू झालाय, पण वजन कमी कशामुळे होतं? कुपोषणामुळेच वजन कमी होतं आणि त्यामुळेच मृत्यू होतात. बालमृत्यू का होतात या प्रश्नाकडे त्यांना वळायचंच नाही
आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही हेच उत्तर पुन्हा आज विधीमंडळात दिलं. त्यानंतर विरोधक आक्रमक झाले. मला त्यांच्याविरोधात हक्कभंग आणावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला अजून काही सुधारित उत्तर द्यायचं असेल तर प्रयत्न करावा, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
दिलीप वळसे पाटलांच्या आक्रमक आणि रोखठोक इशाऱ्यानंतरही आदिवासी मंत्री गावितांचा सूर काही बदलला नाही. माझं उत्तर जशास तसं आहे आणि ते तसंच असेल. कुपोषणामुळे राज्यात मृत्यू झालेले नसून ते विविध आजारांमुळे झालेत, जे काही आकडे तुम्ही सांगताय ते कुपोषणामुळे नव्हे, तर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे मृत्यू झालेत, असं अजब उत्तर गावित यांनी दिले.
कुपोषणामुळे एकाही बालकाचा मृत्यू नाही असे मंत्री विजयकुमार गावित यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी घेतला आक्षेप. सरकार सत्य का नाकारत आहे हे कळत नाही. कुपोषणाने मृत्यू होतो हे सरकार मान्य का करत नाही.
देशाला ७५ वर्ष स्वातंत्र्य पूर्ण झाले. आदिवासी समजतील महिला राष्ट्रपती झाले. ज्या परिस्थिती आदिवासी समाज राहतो कुणाला दोष देत नाही. लाज वाटली पाहिजे जे काम झालं पाहिजे ते झालं नाही. मी कुणाला बोट दाखवत नाही आपण न्याय दिला पाहिजे. अशा शब्दात आदिवासी समाजाला न्याय द्या अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
लाज वाटली पाहिजे हा असंसदीय शब्द आहे. हा शब्द मागे घेतला पाहिजे. असे सुधीर मुनगंठीवार यांनी विधींडळता बोलताना सुनावले.
उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना कंत्राटी कामगारांप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्रीही कंत्राटी आहेत. आपण त्या पदावर किती काळ राहणार हे त्यांनाच माहीत नसल्याचं म्हटले. त्या विधानाचा भरत गोगावले यांनी समचारा घेतला. आम्ही कंत्राटी आहोत की पर्मनंट ते कळेल अशा शब्दात गोगावलेंनी उद्धव ठाकरेंवर पटलटवार केला.
सत्ताधाऱ्यांच्या पोस्टरबाजीनंतर आदित्य ठाकरेंनी पलटवार केला आहे. आम्ही खाती दिली आणि आमच्याशी गद्दारी केली असा आरोप त्यांनी केला आहे. मंत्रिपदासाठी किती काय कराव लागत. मंत्रीपदासाठी गळ्यात पोस्टर घालून उभे आहेत. असा टोला त्यांनी लगावला आहे. जे काही चालल आहे ते आपल्या देशासाठी हानीकारक आहे. मंत्रीपदासाठी आमदारांनी लाचारी पत्करली.
सत्ताधाऱ्यांनी आज पुन्हा पन्नास खोकेवरुन विरोधकांना निशाणा साधला. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. काल सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभे राहत विरोधकांवर टोलेबाजी केली होती. आजही त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. खड्ड्यांचे खोके, मोतोश्री ओके अशी घोषणा सत्ताधारी करताना दिसत आहे. त्यामुळे आजचा दिवसही वादळी ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काल सत्ताधाऱ्यांनी कोविडच्या भितीने राजा बसला घरी…अशी घोषणाबाजी करत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तर आज त्यांनी आदित्या ठाकरेंना डिवचले आहे. युवराजांची दिशा चुकली अशी घोषणा विरोधक देताना दिसत आहेत. यामध्ये आदित्य ठाकरेंचे पोस्टरदेखील दाखवण्यात आले आहे.
टोणणे मारण हा उद्धव ठाकरेंचा स्थायी भाव आहे. उद्धव ठाकरेंची वक्तव्य वैफल्यग्रस्त भावनेतून. आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांच ते कार्ट अशी उद्धव ठाकरेची पद्धत अशी टीका दरेकरांनी ठाकरेंवर केली.
काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या जोरदार राड्यानंतर वातावरण अजूनच जास्त तापलेलं आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काल अभूतपूर्व असा गोंधळ घडला. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये होती.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares