Sugarcane News : जळगाव जिल्ह्यात उसावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत – ABP Majha

Written by

By: चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा | Updated at : 25 Aug 2022 12:08 PM (IST)
Edited By: गणेश लटके
Sugarcane
Sugarcane News : सध्या जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील ऊस (Sugarcane) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहेत. जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विशेषतः चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात हजारो हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होत असते. यंदाही मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, या उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला आहे.
 
केळीप्रमाणं ऊस पिकाला विमा कवच द्यावं
दरम्यान, पांढऱ्या माशीचा उसावर प्रादुर्भाव झाल्यानं जवपास पाच ते दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाचं पीक धोक्यात आलं आहे. त्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. एवढ्या मोठया प्रमाणात उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव नियंत्रण करण्यासाठी कृषी विभागाने तातडीनं काही उपाय योजना कराव्यात, अशी अपेक्षा आता शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय ऊस पिकाला सुद्धा केळीप्रमाणं विमा कवच द्यावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विमा कवच नसल्यानं उसाचे शंभर टक्के नुकसान होण्याचा धोका असल्यानं शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडून शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकणार असल्यानं तातडीनं उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून आता व्यक्त केली जात आहे. विमा कवच नसल्यानं उसाचे शंभर टक्के नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडून शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळं याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून आता केली जात आहे.


अतिवृष्टीनं आधीच नुकसान, त्यात आता पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

सध्या राज्यातील शेतकरी विविध संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळं शेती पिकांचे नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत. तर काही ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचून राहिल्यानं पिकं वाया गेली आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला शेतीचा उत्पादन खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे, खते, बी बियाणांच्या किंमती वाढल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशातच नैसर्गिक संकटाचा सामाना देखील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अशातच आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे. 
महत्त्वाच्या बातम्या:
Aurangabad: पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
Rice Farming : कमी पावसाच्या भागात यशस्वी भात शेती, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रयोग
Cow News : दिलासादायक! संकरीत गायीच्या पोटी देशी गाय, राहुरी कृषी विद्यापीठाचा यशस्वी प्रयोग
Abhijeet Patil : अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी, चार कारखान्यांची तपासणी सुरु
Sindhudurg News : तळकोकणात गव्यांचा उच्छाद, शेती पिकांची नासधूस, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी
Maharashtra Corona Update : राज्यात गुरूवारी 1887 कोरोना रुग्णांची नोंद तर 2190 रुग्ण कोरोनामुक्त
Vande Mataram : वनविभागातील अधिकाऱ्यांनी आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावं, परिपत्रक जारी
5G Service : भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
WBC 2022 : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना स्पर्धेबाहेर, तर चिराग-सात्विकसाईराज जोडीची उपांत्य पूर्व फेरीत धडक
Explainer : औरंगाबाद- उस्मानाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी, पुढील प्रक्रिया काय? जाणून घ्या

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares