कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देऊ: युवा नेते रुपेश ढवण यांनी कांदा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अहमदनगर – राज्य सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी कटीबध्द शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीचा विचार करून निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अशी माहिती युवा नेते रुपेश ढवण यांनी दिली.
शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ द्यावे
राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कांद्याची खरेदी नाफेडमार्फत करुन 40 रूपये किलोला भाव देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ द्यावे या मागणीसाठी पारनेर तालुक्यातील युवा नेते रुपेश ढवण यांनी बुधवारी ( 24 ऑगस्ट ) सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ढवण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात प्रगतीशील शेतकरी महेंद्र पांढरकर, मेजर माउली शेटे, विक्रम काळे, तानाजी खराडे, नंदू लंके आदिंचा समावेश होता. निवेदनात ढवण यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली.
कांदा निर्यातीबाबत निर्णय व्हावा
कांदा उत्पादन खर्च, आजचे भाव,व शेतकऱ्यांना होणारा तोटा याचा सारासार विचार करता कांदा उत्पादनात शेतकरी पुर्णपणे तोट्यात आहे. कांदा निर्यात केल्यास शेतकरी हिताचा निर्णय होईल. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारशी बोलून तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. कांदा किती खराब झाला आहे.हे एका बॉक्समध्ये घेऊन जाउन त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दाखवला व सविस्तर दहा मिनिटे चर्चा करीत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू मुख्यमंत्री यांच्यापुढे मांडीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती ढवण व त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. जास्त पाऊस झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करुन पेरणी केलेली पिके वाया गेली आहेत. पंचनामे न करता शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपये देण्याची मागणी ढवण यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
विधिमंडळ अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 20 तास कार्यरत असूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी असे दहा मिनिटे दिल्याबद्दल ढवण व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद व्यक्त करत आभार मानले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares