१ – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
मत-मतांतरे
———
भारत जगात भारी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हे अभियान देशभर राबविण्यात आले. ही सर्व जनतेसाठी अभिमानाची बाब आहेच, तसेच भावी पिढीला आचरणात आणण्यासाठी आदर्शवत ठरणारी ऊर्जा आहे. देशासाठी वीरमरण पत्करून हुतात्मा झालेले शूर जवान, तरुण क्रांतिवीर यांचे देशकार्य डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या कार्याचा वसा जनता सतत घेईलच. त्याचबरोबर अमृतमहोत्सवात समाजसेवी संस्था, विविध कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांतून झालेली सेवा व सरकारच्या संकल्पनांमधून देशभर होत असलेला अमृतमहोत्सव, तिरंगा अखंड उंच फडकत राहो, हीच सर्वांची अपेक्षा. जय हिंद, जय भारत..!
गजानन लोखंडे, कोल्हापूर
गणेशोत्सव प्रबोधनात्मक असावा
महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या असणाऱ्या सणाला १०० हून अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. लोकमान्य टिळकांनी घरातील गणेशोत्सव हा सार्वजनिक करून त्याला मूर्त स्वरूप दिले. यासाठी सर्वप्रथम पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळातील व आताचा गणेशोत्सव यात खूप फरक पडला आहे. मोठ्या प्रमाणात होणारे ध्वनिप्रदूषण (डॉल्बीचा दणदणाट व कानठळ्या बसविणारे आवाज), वायूप्रदूषण, मिरवणुकीत चिरमुरे उधळून नासाडी करणे, मद्यप्राशन करून हिडीस नृत्य करणे, विसर्जन मिरवणुकीस वेळ लावणे, जलप्रदूषण (उत्सवानंतर निर्माल्य नदी, तलाव व विहिरीत टाकणे) अशा गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे. सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव प्रबोधनात्मक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली पाहिजे. नदीचे वाढते प्रदूषण, वाढती व्यसनाधीनता, शेतकरी, पर्यावरण व आरोग्याच्या समस्या, लोकसंख्येचा भस्मासुर, कोरोनासह नवनवीन येणाऱ्या विषाणूविषयी जनजागृती केली पाहिजे. स्त्रीभ्रूण हत्या, वृक्षारोपण, आध्यात्मिक, पौराणिक व सांस्कृतिक देखाव्यांचा समावेश असावा. निर्माल्य, फुले, हार याचे विसर्जन नदी, तलाव, विहिरीत करू नये. गणेशोत्सवाच्या शिल्लक निधीतून समाजोपयोगी विधायक कामे करण्याचा प्रयत्न करावा. एकूणच, गणेशोत्सव हा तंटामुक्त व समाजप्रबोधनपर करावा.
दीपक पंडित, इचलकरंजी (जि. कोल्हापूर)
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares