Abdul Sattar : ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ कृषीमंत्र्यांच्या अनोख्या उपक्रमाने मिटतील का… – TV9 Marathi

Written by

|
Aug 26, 2022 | 2:26 PM
मुंबई : शेतकऱ्यांचे (Double Increase Income) उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी (Government) केंद्र आणि राज्य सरकारदेखील विविध योजनी राबवत आहे. शिवाय शेती व्यवसायात आधुनिकीकरण असावे यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. पण निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेचा आभाव यामुळे हंगामाच्या शेवटी नुकसान हे ठरलेलेच आहे. परिणामी नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र हे सुरुच आहे. ही परस्थिती बदलण्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. माझा एक दिवस शेतकऱ्यांसोबत या अभिनव उपक्रमाअंतर्गत (Abdul Sattar) राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे राज्यभर दौरा करणार आहेत. एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून त्याच्या समस्या जाणून घेणार आहेत. तर आत्महत्येचे नेमके कारण काय याचाही आढावा घेतला जाणार आहे. शिंदे सरकारची स्थापना होताच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी योग्य ते पाऊल उचलले जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानुसार राज्य सरकारचा हा पहिलाच उपक्रम आहे.
राज्य सरकारच्या अजेंड्यावर शेतकरी आत्महत्या हा विषय आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच राज्यात शेतकरी आत्महत्या होणार ना्हीत, यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या भागात कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील राज्यभर शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या काय ते जाणून घेणार आहेत. 100 दिवस हा अनोखा उपक्रम असून यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.
राज्य सरकारच्या या 100 दिवसांच्या उपक्रमात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. यामध्ये लहानात-लहान बाबदेखील शेतकऱ्यांना शेअर करता येणार. राज्याचे कृषिमंत्रीच या प्रवासात असल्याने स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागतेय याचा अंदाज बांधता येणार नाही. त्यामुळेच मत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट त्यांच्याशीच संवाद साधणार आहेत. यामुळे अधिकारी स्थानिक पातळीवर नेमके काय काम करतात याचा आढावाही घेतला जाणार आहे.
https://youtube.com/watch?v=-6NmzpaoHoE
शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर व्हावी आणि शेतकऱ्यांना मुलभूत सोई-सुविधा मिळाव्यात हाच यामागचा उद्देश आहे. शेतकऱ्यांसह शेतामधील वातावरण, मातीपरिक्षण, पाणी परिक्षण यामधून सेवा दिली जाणार आहे. शेतकरी सुविधांपासून वंचिर राहु नेये हा सरकारचा आग्रह आहे. या मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही नेमणूक असणार आहे. यामध्ये जिल्हााधिकारी व ग्रामपंचायत विभागतील अधिकारी कर्मचारी हे उपस्थित राहणार आहेत. यामुळे स्थानिक पातळीवरील समस्या काय आहेत हे देखील यानिमित्ताने समोर येणार आहे. राज्य सरकराचा अनोखा उपक्रम यशस्वी झाला तर एक वेगळा आदर्श तयार होईल यात शंका नाही.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares