Mansoon Update: पंजाबरावांचा अंदाज आला रे….! 20 जून पर्यंतचा पंजाबरावांचा मान्सून अंदाज जाहीर, वाचा काय म्हणतायेत डख – Ahmednagar Live24 – Ahmednagarlive24

Written by

Panjabrao Dakh Havaman Andaz: महाराष्ट्रात मान्सूनचे (Monsoon News) आगमन झाल्यानंतर राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे.
दरम्यान अजूनही राज्यात मान्सून (Monsoon) स्थिरावलेला बघायला मिळतं नाही. हवामान तज्ञांच्या मते, मान्सून वारे मंदावले असल्याने अजूनही राज्यात मान्सून स्थिरावल्याचे बघायला मिळत नाही.
शिवाय पेरणीसाठी उत्साही शेतकरी बांधव देखील पेरणी करणे योग्य पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान कृषी विभागाने शेतकरी बांधवांना (Farmers) शंभर मिलिमीटर पाऊस झाला तरच चाढ्यावर मूठ ठेवा असे आवाहन केले आहे.
राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी देखील शेतकरी बांधवांना पेरणी करण्यासाठी घाई करू नये असे आवाहन केले आहे. 100 मिलीमीटर पाऊस (rain) होण्याआधी पेरणी केल्यास शेतकरी बांधवांना दुबार पेरणी करावी लागू शकते.
यामुळे पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च शिवाय शेतकऱ्यांची मेहनत सर्व काही वाया जाण्याची शक्यता असते. शिवाय हातातील वेळ देखील शेतकरी बांधवांच्या हातातून निघून जातो यामुळे जोवर शंभर मिलिमीटर पाऊस पडत नाही तोवर पेरणी करू नये असे आवाहन वारंवार शेतकरी बांधवांना केले जात आहे.
दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपला एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या पंजाबराव डख साहेबांचा 20 जून पर्यंतचा मान्सूनचा अंदाज (Panjab Dakh Weather Report) आता सार्वजनिक करण्यात आला आहे.
पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांच्यामते, राज्यातील अनेक भागात 15 जून पर्यंत म्हणजेच मान्सून दाखल झाल्यापासून 15 जून पर्यंत चांगला समाधानकारक किंवा पेरणीयोग्य पाऊस होणार आहे.
यादरम्यान काही भागात पेरणी देखील आटपली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार 16 आणि 17 जून रोजी मराठवाड्यातील बहुतांशी भागात अति मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे.
याशिवाय 18 जून ते 22 जून या काळात राज्यातील बहुतांशी भागात मान्सूनच्या पावसाची दमदार हजेरी राहणार असून अनेक शेतकरी बांधवांच्या पेरण्या 22 तारखेपर्यंत पूर्ण होतील.
पंजाबराव (Panjabarao Dakh News) यांच्यानुसार, राज्यातील अनेक भागात 20 जून पर्यंत मान्सूनचा दमदार पाऊस बरसणार आहे.
20 जून पर्यंत महाराष्ट्रात भाग बदलून पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. एवढेच नाही तर पंजाबराव यांच्या मते 25 तारखेपर्यंत मान्सून हा संपूर्ण भारत व्यापणार आहे.
यामुळे निश्चितच पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि पेरणीसाठी खोळंबलेल्या शेतकरी राजाला मोठा दिलासा मिळणार आहे.
शिवाय यामुळे कृषी संबंधित उद्योगधंद्यांना देखील आता मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पंजाबराव यांच्या या या सुधारित अंदाजामुळे तसेच मान्सूनचे राज्यात आगमन झाल्यामुळे सर्वत्र प्रसन्न वातावरण बघायला मिळत आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares