Nanded : जुनं तेच सोनं..! शेती मशागतीचा भार पुन्हा बैलजोडीच्या खांद्यावर, इंधन दरवाढीचा असा हा परिणाम – TV9 Marathi

Written by

| Edited By: राजेंद्र खराडे
May 03, 2022 | 9:46 AM
नांदेड : शेती व्यवसायात (State-of-the-art machine) अत्याधुनिक यंत्र वापरून उत्पादनवाढीचे आवाहन केले जात असले तरी बांधावरची स्थिती ही वेगळीच आहे. (Fuel) इंधन दरवाढीचा परिणाम शेती व्यवसयारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन अनिश्चित झाले आहे पण शेतीमधील खर्च हा टळलेला नाही.सध्या (Rabi Season) रब्बी हंगाम संपल्यानंतर खरीप हंगामपुर्व मशागतीचे कामे करावी लागणार आहेत. दरवर्षी हा कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जात होती पण यंदा इंधन दरवाढीचा परिणाम मशागत खर्चावरही झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा बैलजोडीकडे मार्गक्रमण करीत आहे. पण आठवडी बाजारात बैलजोडीची किंमतही लाखापेक्षा अधिकच असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.
रब्बी हंगाम संपताच खरिपात उत्पादन वाढावे म्हणून शेती मशागतीची कामे केली जातात. यामध्ये नांगरन, मोगडण, शेत जमिनीची लेवल यासारख्या कामांवर शेतकऱ्यांचा भर असतो. ही सर्व कामे ट्रॅक्टरद्वारेच केली जात आहे. पण आता पुन्हा बैलजोडीच्या खांद्यावरच या कामांचे ओझे पडणार की काय अशी अवस्था झाली आहे. कारण इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या मशागत कामाचेही दरवाढ झाली आहे. गावस्तरावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे पण वाढत्या दरामुळे शेतकरी आता बैलजोडीला झुंपूनच शेती कामे करण्यावर भर देत आहे.
शेती मशागतीमध्ये यांत्रिकिकरण वाढले असून त्यामुळे वेळेची बचत होत असली तरी शेतकऱ्यांचा खर्च मात्र दुपटीने वाढला आहे. कारण सध्या शेतजमिनीची नांगरट करण्यासाठी एकरी 2 हजार रुपये तर रोटरण्यासाठीही 2 हजार रुपये मोजावेल लागत आहेत. खुरटणी 1 हजार रुपये, पेरणी 1 हजार 500 रुपये, पालकुट्टी 2 हजार 500 रुपये तर हळद काढणीसाठी एकरी 2 हजार रुपये मोजावे लागत आहेत. प्रत्येक कामामध्ये दर वाढले आहेत.
कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतर आता गावखेड्यामध्ये जनावरांचे आठवडी बाजार सुरु झाले आहेत. त्यामुळे बाजारात जनावरांची संख्या वाढली असली तरी त्या तुलनेत दरही वाढले आहेत. बैलजोडी घ्यावयाची म्हणले तर शेतकऱ्याला 1 लाख रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय खिलार आणि जातिवंत बैल असल्यास वेगळेच दर अशी अवस्था आहे. गेल्या दोन वर्षापासून जनावरांचे बाजार बंद होते. पण आता सुरु झाल्याने जनावरांची संख्या तर वाढली आहे पण खरेदीदारही वाढले आहेत.

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares