PM Kisan : शेतकऱ्यांनाही मिळणार पेन्शन, असा घ्या योजनेचा लाभ..! – TV9 Marathi

Written by

|
May 04, 2022 | 1:15 PM
मुंबई : शेतकऱ्यांना घेऊन (Central Government) सरकार एक ना अनेक योजना राबवत आहे. यामधून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होत आहे. शेतकऱ्यांना (Pension Scheme) पंतप्रधान किसान मान-धन योजनेच्या माध्यमातून पेन्शन मिळवता येणार आहे. पण ही योजना सरसकट नसून याकरिता काही नियम-अटी घालून दिल्या आहेत. (Farmer) वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. या योजनेत देशातील सुमारे 22 लाख शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी व्हायचे असल्यास वयोमानानुसार दरमहा 55 ते 200 रुपये प्रीमियम भरावा लागेल. अन्यथा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असेल तर त्याच पैशातून थेट शेतकरी पेन्शनचा प्रीमियम कापता येईल. म्हणजे खिशातून पैसे बाहेर पडणार नाहीत. सरकार पीएम किसान योजनेतील रकमेतून तुम्ही जेवढा हप्ता ठरवू घेतला आहे तेवढी रक्कम कापून घेईल. त्यामुळे योजनेचा लाभही घेता येईळ आणि दरवेळी हप्त्यासाठी पैशाची जुळवाजुळवही करावी लागणार नाही.
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा होतात. पण शेतऱ्याने जर पंतप्रधान किसान मान-धन योजनेत सहभाग घेतला तर शेतकऱ्याच्या परवानगीने थेट पीएम किसान योजनेचा निधी या योजनेकरिता घेता येणार आहे. याकरिता कुण्या कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार नाही तर सरकार यासाठी कोणतीही कागदपत्रे मागणार नाही. या पेन्शन फंडाचे व्यवस्थापन भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (एलआयसी) केले जात आहे.
पंतप्रधान किसान मानधन योजना ही मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली पेन्शन योजना आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरवर्षी 36 हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत शेतीयोग्य जमीन आहे अशाच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा पध्दतीने देशभरातील 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पेन्शन घेताना लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर,संबंधिच्या जोडीदाराला मिळणाऱ्या पेन्शनपैकी 50 टक्के रक्कम घेण्याचा अधिकार असेल. परंतु तो आधीच या योजनेचा लाभार्थी नसायला पाहिजे.
कमीत कमी वयाच्या 18 व्या वर्षी आणि जास्तीत जास्त 40 व्या वर्ष्यापर्यंतचे यामध्ये सहभागी होऊ शकतात. २ हेक्टरपर्यंत शेतीयोग्य जमीन असलेले सर्व अल्प भूधारक तसेच अत्यल्प भूधारक शेतकरी यामध्ये सहभागी होऊ शकतात. शेतकरी राष्ट्रीय पेन्शन योजना, कर्मचारी राज्य विमा महामंडळ किंवा भविष्य निर्वाह निधी संघटनेचा सदस्य असेल तर त्याला लाभ मिळणार नाही.
* या योडजनेचा प्रीमियम कमीत कमी 55 ते 200 रुपयांपर्यंत आहे.
* 18 वर्षीय शेतकरी 200 रुपये प्रीमियम तर 40 वर्षीय शेतकरी 200 रुपये प्रीमियम भरु शकणार आहेत.
* शेतकरी जेवढा प्रीमियम देईल, तेवढाच प्रीमियम केंद्र सरकारही देईल.
* जर एखाद्याला पॉलिसी मध्येच सोडायची असेल तर जमा केलेले पैसे आणि त्याचे साधे व्याज मिळेल.
* सीएससीमध्ये अर्ज करता येईल.
शेतकरी व त्याच्या वारसदाराचे नाव व जन्मतारीख. बँक खाते क्रमांक (IFSC/MICR कोड) मोबाइल नंबर आणि आधार क्रमांक . पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला नाही तर खसरा-खतावणीची प्रत मिळेल. 2 फोटो आणि बँक पासबुकही लागणार आहेत. नोंदणी दरम्यान किसान पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड तयार केले जाईल.

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares