Solapur : भूसंपादनाच्या मोबदलावरून 12 व्या दिवशीही प्रहार ठाम, प्रशासनाचे दुर्लक्ष – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
मंगळवेढा :- राज्यातील सत्ता बदलामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आ.बच्चू कडू यांच्या प्रहार शेतकरी संघटनेला प्रांत कार्यालयासमोरील महामार्गावरील भरपाई संदर्भातील उपोषणाला 12 दिवसानंतर देखील अद्याप न्याय मिळेना. राज्यातील सत्ता बदलानंतरही संघटनेच्या मागे आंदोलन करण्याचे शक्लकाष्ठ काही केल्या संपेना.
तालुक्यात रत्नागिरी व नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले असून यासाठी भूसंपादीत केलेल्या संपादीत जमिनीच्या मोबादल्यावर शेतकय्रांना वारंवार संघर्ष करावा लागला यासाठी प्रहार संघटनेने महाविकास सरकार असतानाही आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकार मध्ये मंत्री राहिलेल्या आ बच्चू कडूच्या संघटनेला संंघर्ष करावा लागला किंबुहना त्यांची कामे होत नसल्याच्या कारणावरुन राज्यात सत्ताबदल करण्यासाठी आ. कडू देखील अग्रभागी होते.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या संघटनेच्या त्यांच प्रश्‍नासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार नसल्याची खात्री या संघटनेच्या पदाधिकाय्राला होती मात्र ती अपेक्षा फोल ठरल्याने सत्ताबदलानंतरही पुन्हा प्रहार संघटनेच्या वतीने याच प्रश्‍नावर उपोषण करण्यात आले. 12 दिवस दिवसात जबाबदार अधिकाय्रांनी या उपोषणाकडे पाठ फिरवल्याने पदाधिकाय्राचा प्रशासनाबदलचा रोष वाढत आहे अदयापही यावर तोडगा निघाला नाही.
सत्ताबदलानंतरही राज्यातील जनतेला त्यांच्या प्रश्‍नासाठी करावा लागणारा संघर्ष आणि प्रशासनातील अधिकाय्राची मनमानी यावर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आ कडू यांनी शेतकय्राच्या प्रश्‍नावर जोरदार प्रहार करताना त्यांच्याच संघटनेच्या मंगळवेढयातील पदाधिकारी शेतकय्राच्या प्रश्‍नावर 12 दिवस येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे त्यावर महसूलमंत्रीला जाब देखील विचारणे अपेक्षित होते.
पण त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे मंगळवेढा दौऱ्यावर येवूनही त्यांनी देखील या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत त्यांच्या नियमित प्रशासकीय कामकाज करत काढता पाय घेतला. उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी भेट दिली उपोषणकर्त्याच्या मागण्या वर त्यांनी सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे उपोषण अद्याप सुरू आहे
महसूल मधील अधिकाऱ्यांनी काझीचे नाव सांगून अनेक भूसंपादित शेतकऱ्याचा मोबदला अडवून धरला वास्तविक पाहता काझीची हरकत वर्ग तीनच्या जमिनीसाठी आहे परंतु काझीचा वापर करून अधिकाऱ्याने देखील आपले हात ओले केले आहेत. तक्रारदार काझीनी उपोषण स्थळी भेट देत वस्तुस्थिती सांगितली.
-समाधान हेंबाडे,तालुकाध्यक्ष प्रहार संघटना
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares