Banana : ऐकावे ते नवलंच..! 13 इंच लांब केळी, अंबानींच्या कंपनीलाही मध्यप्रदेशातील केळीची भुरळ – TV9 Marathi

Written by

|
May 24, 2022 | 2:04 PM
मुंबई : आकाराने मोठी व क्षमतेपेक्षा वजनदार अनेक फळे आतापर्यंत पाहण्यात आली आहेत. पण मध्यप्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील (Banana Fruit) केळीची लांबी पाहून (agronomist) कृषीतज्ञही अवाक् झाले आहेत. आतापर्यंत साधारणत: 8 ते 9 इंच लांबीची केळी ही निदर्शनास होती पण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये चक्क 13 इंच लांब असलेल्या (Banana Production) केळीचे उत्पादन घेतले जात आहे. बरवनी जिल्ह्यातील बागुड गावातील शेतकरी अरविंद जाट या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तब्बल साडेसहा एकरावर केळीचे पीक घेतले जाते. जाट यांना देखील 13 इंच लांब केळीचे उत्पादन होईल अशी आशा नव्हती पण हे झाले असून एका केळीचे वजन हे 250 ग्रॅम आहे. विशेष म्हणजे अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीमध्ये देखील येथूनच केळा मागवली जाते.
बरवानी बागुड गावातील शेतकरी अरविंद जाट हे गेल्या 37 वर्षापासून केळीची शेती करतात. त्यामुळे लागवडीपासून ते काढणीपर्यंत या पिकाला काय लागते याचा त्यांना अचूक अभ्यास झाला आहे. लागवडीपासून ते तोडणीपर्यंत सर्वकाही त्यांनाच करावे लागते. त्यानुसार पिकात खताचा वापर करण्यात आला. दिवसेंदिवस उत्पादनात वाढ ही ठीक आहे पण 13 इंच लांब केळी पाहून त्यांना देखील आश्चर्य वाटले होते. पिकामध्ये सातत्य आणि त्यांना झालेला अभ्यास यामुळे हा पराक्रम घडला असावा.
जाट यांच्या शेतामध्ये पिकत असलेली ही केळी थेट अंबानींच्या कंपनीत देखील पुरवली जात आहे. या कंपनीत दिल्ली येथील कर्मचारी असून त्यांच्यासाठी ही केळी मागविण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच ही केळी इराण आणि इराकला 10 ते 12 टन पाठविण्यात आली होती. जेवढा उत्पादनावर खर्च होतो त्यापेक्षा तिपटीच्या दरात ही केळी विकली जात आहे.
स्थानिक बाजारपेठेत व्यापारी हे कमी किंमतीमध्ये या केळीची खरेदी करीत असले तरी परदेशात जाणाऱ्या या केळीला अधिकचा दर हा मिळतोच. येथील व्यापारी केळी काढणीची मजुरीही शेतकऱ्यांकडूनच घेतात तर परदेशात केळी पाठवताना असे होत नाही. शिवाय दरातही मोठी तफावत असल्याने निर्यात केलेलीच परवडत असल्य़ाचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. त्याचबरोबर स्थानिक व्यापारी वेस्टेज केळी शेतावर सोडून देतात, पण केळी परदेशात पाठवणारी कंपनीही मुख्य केळीच्याच किमतीत वाया जाणारा माल खरेदी करते.
स्थानिक बाजारपेठ आणि निर्यातीच्या दरात तब्बल दुपटीचा फरक आहे. जाट यांना मे महिन्यात दोन गाड्या भरुन माल विकला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत 7 रुपये किलो असा दर मिळाला तर परदेशात याच केळीला 15.50 असा दर मिळाला होता. बाजारपेठेमध्ये मोठा फरक असल्याने निर्यातीवरच लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे जाट यांनी सांगितले आहे.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares