Maha Metro Nagpur : महा मेट्रोने पिलरवर रेखाटली परंपरा, चितार ओळी चौकात मारबत एकत्र दिसणार – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 26 Aug 2022 10:48 PM (IST)
Edited By: अक्षय गांधी
नागपूरातील कॉटन मार्केट चौकात पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी मेट्रोच्या पिलरवर रेखाटलेल्या पोळ्याच्या कलाकृतीसोबत फोटो काढला.
नागपूर: नागपूर शिवाय संपूर्ण देशात कुठेही साजरा न होणारा उत्सव म्हणजे मारबत. (Marbat) 1885 मध्ये सुरु झालेली मारबत मिरवणुकीची हि अनोखी परंपरा आजही कायम आहे. 138 वर्ष जुनी हि परंपरा महामेट्रो (Maha Metro) ने पिलर वर स्थायी चित्रांच्या माध्यमाने साकारत पुढील 100 वर्षांकरिता जीवंतता प्रदान केली आहे. शहरातील इतवारी, गांधीबाग, महाल, बडकस चौक सारख्या प्रमुख व्यावसायिक भागाला जोडणाऱ्या चितार ओळी चौकातील मेट्रो पिलर वर मारबत उत्सव साकारला आहे. शहरात मेट्रो रेल प्रकल्प राबवताना महा मेट्रो कला आणि संस्कृति (Culture) जोपासण्यासाठी पाऊल उचलले आहे.
मारबत विदर्भाची शान
पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी निघणारी मारबत मिरवणूक विदर्भाची शान (Vidarbha Pride) आहे. या अनोख्या उत्सवाला मेट्रो पिलरवर साकारण्याचा हा प्रयोग अतिशय अनोखा आहे. चितार ओळी आणि कॉटन मार्केट चौकातून जाणाऱ्या नागरिकांच्या मारबत आणि पोळा संबंधीच्या आठवणी हे आकर्षक देखावे बघून ताज्या होतात. प्राचीन संस्कृति जपण्याकरता महामेट्रो द्वारा केलेल्या कार्याची प्रशंसा जागनाथ बुधवारी निवासी वयोवृद्ध देवीदास गभने यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते मारबत उत्सव अनुभवीत आहेत.
महामेट्रो चे कार्य प्रेरणास्पद: गौरकर

पिवळी मारबत उत्सवाचे अध्यक्ष प्रकाश गौरकर यांनी कॉटन मार्केट आणि चितार ओळी चौकात पोळा आणि मारबत उत्सवाचे देखावे साकार केल्याबद्दल कौतुक केले आहे. गौरकर यांनी म्हटले की मेट्रो ने प्रकल्प राबवताना संस्कृति जोपासण्याकरता केलेले काम अव्दितीय आहे. नागपूर (Nagpur) मेट्रोने केलेलं कार्य देशाच्या अन्य शहरात बघायला मिळत नाही. प्रवाश्यांना विश्वस्तरीय आधुनिक परिवहन सेवा उपलब्ध करून देताना शहराच्या परंपरांची माहिती नवीन पिढीला करून देण्याची महत्वाची भूमिका मेट्रो निभावते आहे. इंग्रजांच्या अन्यायाच्या विरोधात एकजुट होत आंदोलन करण्या करता 1885 मध्ये शहराच्या जागनाथ बुधवारी येथून मारबत उत्सवाची सुरुवात झाल्याचे देखील ते म्हणाले.
चितार ओळी येथे होणार भेंट
जागनाथ बुधवारी येथे पूजा अर्चना झाल्या नंतर मारबत मिरवणूक चितार ओळी (Chitar oli) चौकातील मेट्रो पिलर जवळ येतील. कमेटी अध्यक्ष गौरकर यांच्या मते परंपरागत मारबत आणि मेट्रो पिलर वर साकारलेल्या मारबत प्रतिमेची येथे भेट होईल. या चौकात कमेटी तर्फे पूजा अर्चना होणार आहे. या यानंतर मारबत मिरवणूक पुढे रवाना होईल.
नागपूरकर सौभाग्यशाली
मारबत उत्सवाशी संबंधित असलेल्या शेंडे परिवारातील तिसऱ्या पिढीचे सदस्य गजाननराव यांच्या अनुसार पोळा आणि मारबत संबंधी दृश्ये साकार केल्याने आता या दोन उत्सवाच्या आठवणी चिरंतन झाल्या आहेत. येणाऱ्या पिढीला या निमित्ताने या दोन उत्सवासंबंधी माहिती मिळेल.
कॉटन मार्केट चौकातील बैलजोड़ी आणि शेतकरी दृश्य
शहरात पोळा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आहे. कॉटन मार्केट परिसर मोठे व्यावसायिक केन्द्र आहे. कॉटन मार्केट चौक येथे महामेट्रो तर्फे पिलर वर चित्रांच्या माध्यमाने पोळा उत्सव साकारला आहे. बैलजोडी सोबत शेतकऱ्याचे चित्र या सोहळ्याचे जणू वर्णन करते. कॉटन मार्केट परिसरात क्षेत्र शेतकरी बैलगाडी च्या माध्यमाने येथे शेतमाल विकण्याकरता आणत असे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Marbat: दोन वर्षाच्या खंडानंतर मारबत उत्सव प्रचंड उत्साहात साजरा; पिवळ्या अन् काळ्या मारबतीच्या दर्शनासाठी गर्दी  
Devendra Fadnavis : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, फडणवीसांचा टोला
MNS Nagpur : जय भोलेश्वर गोविंदा पथकाने फोडली मनसेची दहीहंडी, भंडारा येथील एक गोविंदा पथक, तर दोन महिला पथक ठरले आकर्षणाचे केंद्र
Nagpur municipal corporation elections 2022 : नागपूर महानगरपालिकेची 15 वर्षांपासून भाजपच्या हाती सुत्रे, जाणून घ्या इतिहास
Baba Tajuddin Urs : बाबा ताजुद्दीन शताब्दी वर्ष ऊर्स निमित्त संदल, दोन वर्षांनंतर भव्य आयोजन
Rohit Pawar On ED Investigation: ‘केंद्रीय तपास यंत्रणांना मी आधीही सहकार्य केलं, आताही करेन’, ईडी चौकशीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Shahaji Patil : उजनीच्या उपकालव्यात पाणी सोडण्यासाठी बापूंनी फोनवर घेतली अधिकाऱ्याची शाळा, सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप व्हायरल
Sambhajiraje Chhatrapati: आमचा आवाज दाबल्याच्या आरोपाला संभाजीराजेंचे उत्तर; राजेंची रोखठोक पोस्ट
Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 1723 कोरोना रुग्णांची नोंद तर 1845 रुग्ण कोरोनामुक्त
Infinix Note 12 Pro: 256 GB स्टोरेज असलेला सर्वात स्वस्त फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares