आत्महत्या नाहीच करणार, आम्ही एकमेकांना साथ देऊन लढणार: मुख्यमंत्र्यांच्या निश्चयाला अकोला जिल्ह्यातील शेतकऱ… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही िदवसांपूर्वी व्यक्त केल्यानंतर त्यांच्या निश्चयाला अकाेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून साथ िमळत आहे. बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील शेतकऱ्यांनी पाेळ्याच्या दिवशी आम्ही एकमेकांना साथ देऊन लढणार, मात्र आत्महत्या करणार नाही, अशी शपथ घेतली.
कधी अतिवृष्टी तर कधी अनियमित पाऊस; विविध राेगांचे आक्रमपणासह अन्य कारणांमुळे शेतमालाचे उत्पादन घटत आहे. कर्जाचा डाेंगर वाढतच असल्याने काही शेतकरी आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलतात. मात्र आता बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील शेतकऱ्यांनीच आत्महत्या राेखण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.
आत्महत्या न करण्याची शपथ त्यांनी घेत संकटांशी लढण्याचा निर्धारही व्यक्त केला. याप्रसंगी युवा शेतकरी संजय घंगाळे, पोलीस पाटील ज्ञानदेव रोहनकार, कोतवाल राजू डाबेराव, राजू बेंडे, महेश टाकळकर, गजानन मेहेरे, गजानन अढाऊ, जनार्धन भगत, भगवान गिर्हे, संजय शेळके, संजय नागोलकार, संजय शेगोकार, ज्ञानदेव वडतकार, गणेश माठे, सुमित अग्रवाल, विजय रोहनकार, छोटू बेंडे, धीरज भगत, विजय भगत, गोपाल वराळे, महेश इंगळे, प्रमोद रोहनकार, महादेव इंगळे, अमोल घंगाळे, गोपाल रोहनकार, विश्वनाथ देऊळकार यांच्यासह बहुसंख्य शेतकरी हजर होते.
येथे घेतली शपथ
अंदुरा गावातील शेतकऱ्यांशी युवा शेतकरी संजय घंगाळे यांनी संवाद साधला. आत्महत्या न करण्याची आणि कोणालाही आत्महत्या करू न देण्याची संकल्पना मांडण्यात आली. हनुमान मंदिरासमोर पोळा भरल्यानंतर शेतकऱ्यांनी एकत्र येत आत्महत्या करणार नसल्याची शपथ घेतली.
अंदुरा गावातही प्रचंड नुकसान
यंदा अतिवृष्टीमुळे जून व जुलै महिन्यात 77 हजार 747 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अंदुरा येथे पूर्णा, पानखास, माेर्णा या तीन नद्यांचा संगम आहे. त्यामुळे परिसरात अन्य ठिकाणचे पाणी घुसते. अंदुरा येत असलेल्या बाळापूर तालुक्यातील एकूण 113 गावांतील 44 हजार 878 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानामुळे खचून न जाता शेतकऱ्यांनी संकटाशी सामना करण्याचा निर्धार केला आहे. गावात रस्त्यांचीही समस्या आहे. अन्य ठिकाणचे पाीही शेतशिवारात जमा हाेते. त्यामुळे यावर उपाय याेजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून हाेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares