किसान सभा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
किसान सभेतर्फे १ सप्टेंबर मागणी दिन
शेतकरीविरोधी धोरणे; शेतकरी हिताच्या मागण्या करणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः अखिल भारतीय किसान सभा व शेतमजूर युनियनच्या वतीने १ सप्टेंबर मागणी दिन व प्रतिरोध दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता निदर्शने केली जाणार आहेत. ही माहिती किसान सभा प्रतिनिधी नामदेव पाटील व गिरीश फोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन केले. नंतर तिन्ही कायदे मागे घेतले. काही मुद्द्यांवर लवकरच चर्चा करण्याचे आश्‍वासनही केंद्र सरकारने दिले. त्याला सहा महिने झालेले तरीही शेतीमाल आधारभूत किमतीत खरेदी ७५० शेतकरी शहिदांना भरपाई ८० हजार शेतकऱ्यांवरील खटले मागे घेणे, सहकारी संस्थांच्या कर्जमाफी विषयी आदींवर अद्यापि अंमलबजावणी झालेली नाही. उलट केंद्र सरकारने २९ सदस्यांची समिती स्‍थापन केली. यात पाच भाजपचे सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शेतकरी संघटना, शेती विद्यापीठाचे कुलगुरू तसेच मंत्रालयीन अधिकारी यांचा समितीत समावेश आहे. यात शेतकरी संयुक्त संघटनेच्या शेतकऱ्यांना घेतलेली नाही हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे.
शेती उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. यातून देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येत आहे. परकीय भांडवलाच्या जाळ्यात देश अडकण्याची शक्यता आहे. त्यापासून वाचविण्यासाठी शेतकरी संघटना व किसान सभा यांच्या वतीने आवाज उठवला जात आहे. त्याचाच भाग म्हणून निदर्शने करण्यात येतील असे ही श्री. पाटील व फोंडे यांनी सांगितले.
मागण्या अशा
शेतीमालावरील खर्च कमी करावा
इंधन दरवाढ कमी करावी
शेतकऱ्यांना अनुदान द्यावे
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा
वीज बिल कमी करा, शेतीला वीज मोफत द्यावी
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares